माझे स्वप्न निबंध मराठी । Maze Swapna Essay in Marathi
मित्रांनो आपल्याला माहितच आहे की, प्रत्येक व्यक्ती हा जीवनात काहीतरी होण्याचे स्वप्न घेऊन जगत असतो. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही महत्त्वकांक्षा असते. आयुष्यात मोठे होऊन काय करायचे, काय मिळवायचे आहे आणि काय बनायचे आहे इत्यादी गोष्टींचा विचार करून प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगत असतो.
काहींची स्वप्ने इंजिनियर बनण्याचे असतात तर काहींना शिक्षक बनायला आवडते. कोणाचे स्वप्न वैज्ञानिक बनायचे असते तर कोणाची पोलीस…
अशाच प्रकारे सर्वसामान्य मनुष्य प्रमाणे माझेही स्वप्न आहे डॉक्टर बनायचे…..
माझे स्वप्न निबंध मराठी । Maze Swapna Essay in Marathi
जीवनात स्वप्न पाहणे हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु ते स्वप्न हे योग्य असले पाहिजे. स्वप्नामधून आपल्या जीवनाला योग्य अर्थ मिळेल आपले जीवन सार्थक होईल असे स्वप्न पाहणे गरजेचे आहे.
जीवनात स्वप्न पाहणे गरजेचे आहे कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट साध्य करण्याची इच्छा बाळगतो, तेव्हा ती इच्छा किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण अतोनात कष्ट घेतो, कठोर परिश्रम करतो. म्हणून स्वप्ना शिवाय आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी आवश्यक तेवढी प्रेरणा मिळत नाही.
आपण पाहिलेले स्वप्न हे आपल्याला वेळोवेळी आपण काय होणार? यांची जाणीव करून देतात. त्यामुळे आपण आपला मार्ग न भटकता योग्य त्या मार्गाने वाटचाल करतो.
“जेव्हा आपण एखादे स्वप्न पाहतो तेव्हा ते स्वप्न सत्यात उतरण्याची क्षमता देखील बाळगतो”, असे मला वाटते.
म्हणून माझे स्वप्न हे एक चांगले व्यक्तिमत्व घडवून एक चांगला डॉक्टर होण्याचे आहे.
डॉक्टर होणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे. कारण मला डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे. डॉक्टर हा जरी देव नसला तरी सुद्धा डॉक्टरांच्या हातात जन्म आणि मृत्यू चा निर्णय असतो अर्थात माणसांमध्ये देवाचे स्वरूप म्हणून डॉक्टर असतो.
डॉक्टर जरी मृत्यू पावलेल्या रुग्णाला जिवंत करू शकत नसला तरी कठीण परिस्थिती मधून रुग्णांची सुटका करून देण्यासाठी मदत करतो.
म्हणूनच मी लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत आहे. मी पाहिले आहे की, काही डॉक्टर खूप इमानदारी पणाने रुग्णांची सेवा करतात पण काही डॉक्टर हे केवळ पैशांसाठी काम करतात.
परंतु माझ्या जीवनाचे स्वप्न हे पैसे कमवण्याची नाही. आयुष्य जगत असताना पैशांची खूप गरज असते हे बरोबर पण गरीब आणि लाचार लोकांकडून पैसे घेणे हे चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मला पैसे कमविण्याकरिता डॉक्टर बनायचे नसून मला मनोभावाने लोकांची सेवा करायची आहे.
ज्या लोकांची परिस्थिती हालाखीची आहे जे लोक गरीब आहे व त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी पुरेसे पैसे नाही अशा लोकांशी मला मदत करायची आहे.
जाती गरीब लोक पैशाच्या अभावामुळे मोठ-मोठ्या आजाराने ग्रस्त असतात ते उपचार करू शकत नाही म्हणून अशा लोकांची मला डॉक्टर बघून सेवा करायची आहे.
मी लहान असताना बाबा मला नेहमी सांगायचे, ” बाळ, तुला मोठे होऊन काहीतरी असे करायचे आहे की, ज्यामुळे तू अधिकाअधिक लोकांची मदत करू शकेल आणि गरीब लोकांची मदत करू शकेल.”
म्हणून मी तेव्हाच मनामध्ये निश्चय केला होता की, मोठे होऊन मला डॉक्टर बानायचे आहे आणि गरीब लोकांची सेवा करायची आहे. म्हणून लहानपणापासूनच माझे स्वप्न आहे की, मी डॉक्टर व्हावे.
समाजातील अधिकाधिक लोकांची सेवा मला केवळ डॉक्टर बनूनच करता येईल असे मला वाटते. डॉक्टर बनून मी विविध रोगाने ग्रस्त असणाऱ्या लोकांची सेवा करीन त्यांच्यावर मुक्त उपचार करेल.
जे लोक परिस्थितीने खूपच गरीब आहेत अशा लोकांचा उपचार मुक्तपणे कारायला मला आवडेल. आपल्या समाजाला निरोगी बनवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. आज आपल्या देशामध्ये विविध रोग आणि महामारी पसरत आहे. यामध्ये कित्येक रुग्ण हे उपचाराविना मरत आहेत. त्यामुळे मी डॉक्टर झालेले मला अशा रोगांवर नियंत्रण करण्यासाठी फार आवडेल.
आज आपल्या अवतीभवती असे खूप रुग्ण आहेत जे कमी वयामध्ये मोठमोठ्या आजाराने ग्रस्त झाले आहेत. माझे स्वप्न आहे की, मी डॉक्टर बनून अशा रुग्णांवर उपचार करावा. त्यांना गोळ्या औषधांचा पुरवठा करून द्यावा.
मी डॉक्टर झाल्याने समाजातल्या अशा लोकांकडे विशेष लक्ष देईल. मी सर्वांना निरोगी आहार आणि व्यायामाचे महत्व पटवून सांगेल. जास्तीत जास्त रुग्णांना आयुर्वेदिक पद्धतीने नियंत्रित करण्यास मदत करेल.
आठवड्यातून एकदा मी गरीब वस्तीच्या ठिकाणी जाऊन बैठक घेऊन येथील लोकांना स्वच्छतेचे आणि निरोगी शरीराचे महत्त्व पटवून देईन.
अशाप्रकारे माझे स्वप्न आहे की मी डॉक्टर होऊन देशसेवा करावी यासाठी मी खूप प्रयत्न करेन आणि त्याच दिवशी माझे स्वप्न सत्यात उतरवून दाखविन.
माझे स्वप्न निबंध मराठी । Maze Swapna Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi
- गणेश चतुर्थी मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi । Ganesh Utsav Nibandh in Marathi
- फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi
- माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी । My Favourite Animal Dog Essay in Marathi
- पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi