फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi

मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी “फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी” घेऊन आलोत.

आज माझा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला. उद्यापासून उन्हाळ्याची सुट्टी लागणार होती. म्हणून मी अगदी आनंदामध्ये रात्री झोपलो सकाळ सकाळी उठून मी खेळायला जाणार तेवढ्यात आई ने आवाज दिला, आणि म्हणाली, ” अरे रवी!! परीक्षा संपल्यात ना तुझ्या, मग ते सर्व वह्या पुस्तके रद्दी वाल्याला घाल.” मी आईला हो म्हणून माझ्या खोलीत परत आलो.

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi

मी माझी सारी पुस्तके काढीत होतो त्यामध्ये एक जुने फाटके पुस्तक होते ते मी कोपऱ्यात फेकले, आणि बाकीची पुस्तके आवरण्यात मग्न झालो. तेवढ्यात माझ्या कानावर कसला तरी आवाज आला. मी घाबरून इकडे तिकडे पाहिले तर मला कोणीही दिसले नाही. म्हणून मी आवाज दिला कोण??

” अरे मित्रा, मी आहे, बघ जरा माझ्याकडे, इथे, येथे कोपऱ्यात आहे मी”

असे म्हणत ते कोपऱ्यातील फाटके पुस्तक माझ्याशी बोलू लागले. फाटके पुस्तक स्वतःचे आत्मवृत्त सांगू लागले.

ते पुस्तक मला म्हणाले, ” माझा जन्म एका कारखान्यांमध्ये झाला. त्याच कारखान्यांमध्ये माझ्या पांढर्‍याशुभ्र पानांवरती विविध भारतीय लोकांनी मिळून माझ्या अंगा वर भारताचा इतिहास लिहिला होता त्यामुळे कारखाना मध्ये असताना मला स्वतःवर अभिमान वाटायचा हे एवढ्या मोठ्या भारताचा प्राचीन इतिहास हा माझ्या पानांवरती लिहिण्यात आला. सुरुवातीला एवढे मोठे माझे भाग होते असे मला वाटले.

माझ्यामध्ये सामावलेल्या भारताच्या इतिहासाची माहिती तुमच्यासारखे विद्यार्थी घेऊन ज्ञान प्राप्त करतील, यामुळे आता माझ्या जीवनाचे सार्थक होईल असे मला वाटले. माझ्या मधील सर्व पानांवर लिहून झाल्यानंतर मला त्या कारखान्यातून एका ग्रंथालयात आणण्यात आले. एका सुंदरशा काचेच्या कपाटातील सुंदर ठिकाणी मला ठेवण्यात आले.

आता मी वाट बघत होतो, मला कोणीतरी घ्यायला येईल आणि माझी विक्री होईल जेणेकरून माझ्या प्रत्येक पानातील आपल्या इतिहासाची माहिती ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. माझ्या मध्ये असलेले ज्ञान अमृत पिईल. परंतु मी पाहिलेले स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही, कारण मला कोणत्याही ग्राहकाने खरेदी केलेल्या कित्येक वर्षे त्या दुकानातील कपाटामध्ये पडून होते.

मला वाटले लोकांना माझ्या पानांवरती लिहिलेल्या इतिहास वाचण्यासाठी जराही रुची नाही. भारताचा इतिहास हा फार महान होता, येथे अनेक शूर वीर, क्रांतिकारी, महान पुरुष, होऊन गेले पण आज याच भारताच्या इतिहासाची माहिती वाचण्याची इच्छा कोणालाही इच्छा नाही हे बघून मला खंत वाटली….

म्हणून मी निराश होऊन कित्येक दिवस त्या कपाटामध्ये चा पडून राहिलो.माझ्या अंगावर धुळीचे साम्राज्य पसरले होते, आणि मी आता मला कोणीतरी ग्राहक विकत घेईल अशा सुद्धा सोडून दिली.

तेव्हा एके दिवशी तु तिथे आला तो मला विकत घेण्याचे ठरवले ते पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. एवढ्या दिवसांनी का होईना परंतु कोणीतरी मला खरेदी करायला आले आहे हे पाहून मी अगदी खूश होतो. तू मला खरेदी करून तुझ्या घरी घेऊन आला. तू नियमितपणे माझ्यामधे असलेल्या इतिहासाला वाचत असते. माझ्या मध्ये असलेल्या सर्व माहितीचा पुरेपूर फायदा घेत आहे हे पाहून मला खूप आनंदी वाटले. तेव्हा मला वाटले माझे जीवन सार्थक झाले.

तू माझ्या पानांमध्ये लिहिलेला भारतीय इतिहास वाचनामध्ये इतका मग्न झाला की, तुला दुसरे कशाचेही भान राहत नव्हते. आणि तू असे मनसोक्त पण आणि मला वाचत आहे हे पाहून माझे मन तृप्त झाले. परंतु काही दिवसांनी तो मला परत त्या ग्रंथालयांमध्ये घेऊन गेला, तेव्हा मला वाटले क, मी पुन्हा या ग्रंथालयाच्या धुळे मध्ये पडून राहिल. परंतु तसे झाले नाही तु त्या ग्रंथालया मधून मला विकत घेतले. मला तू विकत घेतले आहे हे पाहून माझा आनंद मावेनासा झाला. तेव्हा मला वाटले की, तुझ्यासारखा मालक मला मिळाला हे माझे भाग्य आहे.

माझ्यातील ज्ञानाचा भांडार तो स्वतः मध्ये घेत आहे, हे पाहून मला बरे वाटले. मग तू पुढील काही दिवस मला वाचले, माझ्यातील ज्ञान प्राप्त केले परंतु काही दिवसानंतर तु मला एका ठिकाणी ठेवले. मी रोज वाट पाहत होतो की तू मला आज वाचेल. परंतु हळूहळू तू पूर्णतः मला विसरला.

त्यानंतर एके दिवशी तू मला उचलले आणि तुझ्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवले. तेव्हा मला वाटले की, तू पुन्हा मला वाचण्यासाठी उचलले. परंतु तसे काही झाले नाही पुढचे दोन तीन दिवस मी त्याच्या टेबलावर पडून होतो. त्यादिवशी टेबलावर ग्लासामध्ये ठेवलेले पाणी माझ्यावर पडले व मी पूर्णता भिजलो. मी भिजलेल्या अवस्थेमध्ये असतानाही तुझे माझ्यावर जराही लक्ष गेले नाही.

दोन दिवसानंतर आणि खोली आवरण्यासाठी आली असताना आईचे लक्ष माझ्यावर गेले. मी पुरता भिजलेले होतो माझी पाने वाकडीतिकडी झाली होती माझ्या ती अक्षरे देखील पुसून गेली. ते पाहून आईने मला कपाटावर ठेवला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी या कपाटावर असं पडून राहिलो. माझ्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले एकेदिवशी तर उंदराने देखील मला खाल्ले माझ्यातील काही पाणी उंदरांनी कुरतडून टाकली.

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi

माझी अशी दशा पाहून मला वाटले की आता माझे काहीही खरे नाही. खूप वाईट वाटते मला माझ्या मध्ये एवढे ज्ञान साठलेले असून देखील माझे असे हाल झाले आहेत.

आम्ही पुस्तके तुम्हाला सर्व ज्ञान देतो, विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवतो. जीवनातील सर्व गोष्टी शिकवतो. चांगल्या वाईट गोष्टीचे ज्ञान देतो, आज डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शास्त्रज्ञ हे सर्व व्यक्ती केवळ आम्हा पुस्तकांमुळे एवढ्या मोठ्या पदावर पोहोचू शकले आहेत. आहे म्हणून आज हजारो वर्षांपूर्वी झालेले रामायण, महाभारत, भगवद्गीता, आज देखील जिवंत आहेत.

पुस्तकांना गुरूचा दर्जा दिला जातो म्हणूनच म्हणतात ना “ग्रंथ हेच गुरु”.

मित्रांनो मग तुम्ही तुमच्या गुरूंचा शिक्षकांचा आदर करता मग आम्हा पुस्तकांचा का नाही??

आम्हालाही तुमच्याप्रमाणेच भावना आहेत. तुम्ही आमचे कसे हाल करतात ते पाहून आम्हाला वाईट वाटते आमच्या मधील ज्ञानाचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घेत नाहीत.

आमचा असा दुर्व्यवहार करू नका रे!!! आमचा सन्मान करा मग बघा आणि तुमचे आयुष्य कसे सत्य मार्गाला लावतो. तुमचे चांगले भविष्य घडवून देण्यास आम्ही पुस्तके तुमची मदत करू. ज्ञानाचा अपार कधी न संपणारा महासागर आम्हा पुस्तकांमध्ये साठवला आहे. आमच्यामधील ज्ञानाचा योग्य वापर करा आणि तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हा. तेव्हा आम्हा पुस्तकांमध्ये असलेल्या ज्ञानाचं सार्थक होऊन आम्हा पुस्तकांचे जीवनच कृतज्ञ होईल.

पण जर तुम्ही आम्हा पुस्तकां सोबत कसेही वागलात तर आम्ही यापुढे कधीही तुमची मदत करण्यासाठी येणार नाही. तुम्हाला आवश्यक असलेल्या ज्ञानाचा साठा आमच्याशिवाय तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी मिळणे अशक्यच आहे. त्यामुळे आम्हा पुस्तकांविषयी सर्व मनुष्याला एकच विनंती आहे.

मित्रानो, तुम्ही आमचा कसाही गैरवापर करू नका आणि आमच्यासोबत गैरवर्तणूक करू नका.

तितक्यात हवेची मोठी झुळूक आली आणि पुस्तकाची पाने हवेने फडफडली. आणि अचानकच पुस्तके जप्त झाली तेव्हा मला जाणीव झाली की मी माझ्या पुस्तकासोबत चुकीचं वागलो त्यामुळे मी निश्चय केला की यापुढे मी कोणत्याही पुस्तकासोबत गैरवर्तणूक करणार नाही पुस्तकांचा चांगला आणि योग्य वापर करेल. पुस्तकांमध्ये साठवलेल्या ज्ञानाचा देखील पुरेपूर फायदा करून घेईल.

फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *