माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी । My Favourite Animal Dog Essay in Marathi
मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक लोकं वेगवेगळे प्राणी पाळतात. त्यातल्या त्यात हे इमानदार आणि वफादार प्राणी म्हटले की आपल्यासमोर कुत्रा या प्राण्याची प्रतिमा उभी राहते. कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी आहे हे सर्वांना माहितीच असेल तसेच कुत्रा आपल्या मालकाचे आणि त्याच्या घराचे इमानदारीने रक्षण करतो.
मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी “माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी । My Favourite Animal Dog Essay in Marathi” घेऊन आलोत.
माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी । My Favourite Animal Dog Essay in Marathi
कुत्रा हा अतिशय इमानदार आणि प्रेमळ प्राणी आहे. कुत्र्यासारखा वफादार प्राणी दुसरा कुठलाच नाही. म्हणूनच माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. मला लहानपणापासूनच कुत्रा प्राणी खूप आवडतो. कुत्रं बद्दल मला विशेष माहिती नाही तरीदेखील मला कुत्रे खूप आवडतात. म्हणून मी सुद्धा एक कुत्रा पाळला आहे. माझ्या कुत्र्याचे नाव मी “टायगर” असे ठेवले आहे. माझा कुत्रा हा दिसायला वाघाप्रमाणे आहे म्हणून मी त्याचे नाव टायगर असे ठेवले.
माझा कुत्रा हा जर्मन शेफर्ड या जातीचा आहे. माझा टायगर हा दिसायला खूप सुंदर आहे. माझ्या टायगरचा रंगा हा किंचित सुरा आणि तांबडा आहे. तसेच माझ्या कुत्र्याच्या अंगावरील केस खूप लांब आणि मऊ असल्याने टायगर दिसायला खूपच आकर्षित दिसतो. विशेषता माझा टायगर चे झुपकेदार असे शेपूट त्याच्याकडे आजूबाजूचा सर्व लोकांना आकर्षित करते.
माझा टायगर दिसायला जितका सुंदर आणि आकर्षित आहे तितकाच तो घातक सुद्धा आहे. रात्रीच्या वेळी किंवा दिवसा आमच्या घराकडे कोणी अनोळखी व्यक्ती दिसताच टायगर मोठ्या आवाजात भोकात या व्यक्तीच्या अंगावर जातो. त्यामुळे एखादा अनोळखी व्यक्ती आमच्या घराकडे येण्यासाठी खूप घाबरतो. कारण माझ्या टायगरला बघून खूप जण घाबरतात.
माझा कुत्रा टायगर हा दोन महिन्यांचा होता तेव्हापासून मी त्याला सांभाळत आहे. आज माझा टायगर हा पाच वर्षाचा एक तरुण कुत्रा झाला आहे. लहानपणापासूनच मला कुत्रे खूप आवडत होती, त्यामुळे मी गावातील लहान लहान कुत्र्याच्या पिल्ल्या ला घरी घेऊन यायचो. परंतु गावातील कुत्र्यांची पिल्ले थोडावेळ माझ्यासोबत खेळ नंतर परत त्यांच्या आई कडे जायची.
माझ्या ते कुत्रे पाळण्याची आवड पाहून बाबांनी माझ्या वाढदिवसा दिवशी जर्मन शेफर्ड कुत्रा भेट दिला.
या पाच वर्षांमध्ये टायगर हा कुत्रानुसार आमच्या घरात तील एक सदस्य झाला आहे.
कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून टायगरला अतिशय प्रेमाने सांभाळणे आहे.
म्हणून आज टायगर हा घरातील प्रत्येक सदस्यचा लाडका आहे. मी रोज टायगर सोबत खेळत असतो त्यामुळे माझी आणि टायगर ची मैत्री खूप पक्की झाली आहे.
मी जे सांगेल तो माझा टायगर ऐकतो थोडक्यात माझ्या सर्व आज्ञांचे पालन माझ्या टायगर करतो.
मी टायगर ला बसायला सांगितले की तो बसतो, उठायला सांगीतले की उठतो. टायगर ला जर मी “गो” म्हणून इशारा केला की तो धावतो. माझ्यातील आणि टायगर मधील संबंध इतके घट्ट झाले की मी दुरून देखील टायगर ला आवाज दिला की तो लगेच इकडे तिकडे करत मला शोधतो. मी कुठल्याही कारणामुळे घराबाहेर पडलो किंवा शाळेला चाल्लो की टायगर माझ्या सोबतच येतो.
टायगर ला मी सेक हॅन्ड घ्यायला सांगितले की तो आमच्या घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्या सोबत मैत्री करतो आणि त्यांना shake hand देतो. माझा कुत्रा टायगर हा खूप प्रेमळ कुत्रा आहे. म्हणून आम्ही सुद्धा त्याला कुत्रा न समजता आमच्या घरातील एक सदस्य प्रमाणेच वागणूक देतो. माझा टायगरला दूध चपाती खायला खूप आवडते म्हणून मी दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी टायगरला दूध चपाती खायला देतो. टायगर ला भूक लागली की तो माझ्या आजूबाजूला येऊन मला चाटतो त्यामुळे मला लगेच कळते की माझ्या टायगर ला भूक लागली असावी.
टायगर रात्रभर जागे राहून माझ्या घराचे रक्षण करतो. टायगर खूप हुशार आहे त्याचे काल नेहमी उभे असतात आजूबाजूला जरा ही कोणाची चाहूल लागताच टायगर भुंकण्यास सुरुवात करतो.
माझा टायगर हा शाकाहारी आहे लहानपणापासून मी त्याला मांसाहारी अन्न खायला दिले नाही त्यामुळे तो माणसांप्रमाणे शाकाहारीच जेवण करतो. टायगर हा आमच्या घरातील एक खंबीर सदस्य आहे. कारण तो रात्रभर जागून आमच्या घराचे रक्षण करतो. पण अनोळखी व्यक्ती चोर -भराटे यांना आमच्या घराच्या आजूबाजूला देखील यायला देत नाही. टायगर असल्यामुळे आम्ही कशाचीही चिंता न करता घरात निवांत झोपतो.
असा हा माझा आवडता प्राणी कुत्रा म्हणजेच माझा टायगर मला खूप खूप आवडतो.
निष्कर्ष – प्राणी हे निसर्गाने दिलेली सर्वात सुंदर देणगी आहे.
त्यामुळे प्रत्येक प्राण्याकडून आपल्याला काहीना काही गोष्टीशिकायला मिळतात. त्यातल्या त्यात कुत्रा प्राणी म्हटले की इमानदारी आणि वफादारी हा गोष्टी शिकायला मिळतात.
आज काल खूप सारे लोक प्राण्यांना दुःख पोहोचवतात. त्यांचे हाल करतात परंतु आपण प्राण्यांचे हाल न करता प्रत्येक प्राण्याची रक्षा करणे हे सर्व मनुष्याचे कर्तव्य आहे.
पाळी पाणी म्हटले की आपल्यासमोर सर्वप्रथम कुत्रा हा प्राणी येतो. आणि याच पाळीव प्राण्या बद्दल निबंध म्हणजे माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी आम्ही आजच्या लेखात सांगितला आहे.
माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी । My Favourite Animal Dog Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi
- माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh
- फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi
- माझा आवडता प्राणी निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
- मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi