गणेश चतुर्थी मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi

” गणेश चतुर्थी” हा भारतातील सर्वात लोकप्रिय सण आहे. भारतामधील विविध राज्यात अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते. श्री गणेश देवता हे बुद्धीचे आणि समृद्धीचे देवता असल्याने सर्वत्र गणेश देवाची पूजा केली जाते. तसेच चा गणपती ला आधी देव देखील म्हणतात त्यामुळे एखाद्या शुभकार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते.

असे म्हणतात की, गणेश चतुर्थी या दिवशी श्री गणेश देवता सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरले ले असतात.

गजमु का असलेल्या श्रीगणेश हा सर्व प्रकारची बुद्धिमत्ता, ऐश्वर्या आणि सौभाग्य मिळवून देणारा देवता आहेतृ शिवपार्वती चे पुत्र गणेश आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये घरोघरी गणपतीची पूजा केली जाते.

गणेश चतुर्थी मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi । Ganesh Utsav Nibandh in Marathi

गणेश चतुर्थी हा भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला येणारा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि प्रमुख सण आहे. गणेशचतुर्थीला गणेशाच्या मूर्तीचे प्रतिष्ठान करून दहा दिवस गणपतीची पूजा केली जाते. मुख्यता महाराष्ट्र राज्यामध्ये गणेश चतुर्थी हा उत्सव खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

गणपती बाप्पाने निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला दिलेल्या सर्व गोष्टी आपण गणपतीबाप्पांनाच अर्पण करतो. गणपतीचा आवडतीचा पदार्थ म्हणजेच मोदक याच मोदकाचा भोग ठेऊन दहा दिवस भक्तिभावाने अर्चना करीत गणपतीची पूजा केली जाते.

दहा दिवसा नंतर आपण अगदी थाटामाटात गणपतीचे विसर्जन करतो. आणि गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करतो. गणेश मूर्तीच्या विसर्जन आतून आपल्याला कळते की, देव हा मूर्तीमध्ये नाही तर तो सर्वसामान्य व्यक्ती मध्ये स्वतः आपल्या मध्ये आहे.

जात- धर्म असा भेदभाव न करता सर्वांना एकत्रित आणणारा सण म्हणजे गणेश चतुर्थीचा उत्सव होय. अशाप्रकारे सर्वव्यापी असलेल्या ईश्वराला साकार रुपात अनुभवणे आणि त्याचा आनंद घेणे हीच गणेश चतुर्थी मागची मूळ भावना आहे.

गणेशचतुर्थी म्हणजे आनंद, उत्साह, पूजा, भक्ती आणि समनव्य व समानता होय. श्री गणेश हा आपल्यामध्ये असलेल्या अनेक चांगल्या व उत्कृष्ट गुणांचा देवता आहे. आपण जेव्हा भक्तिभावाने गणेशाची पूजा करतो तेव्हा आपल्या मध्ये असलेले चांगले गुण खुलू लागतात. ज्या व्यक्तींमध्ये अहंकार असतो तिथे ना ज्ञान असते, ना बुद्धी असते, ना प्रगती.

त्यामुळे आपल्यातील दुर्गुण काढून चांगल्या चेतनेला जागृत करणे आणि चेतनेचा अधिकार जाणणे म्हणजे खऱ्या अर्थाने श्रीगणेशा आहे.

आपल्यातील ही चेतना जागी व्हावी यासाठीच हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभकार्याच्या अगोदर गणेशाची पूजा केली जाते.

अशाप्रकारे गणेशचतुर्थीला गणेशाची मूर्ती स्थापन करून त्या मूर्तीचे भक्तिभावाने , प्रेमाने पूजा करण्याने आणि सतत गणेशाचे ध्यान करण्याने आपल्याला आपल्या मध्ये असलेल्या गणेशाचा अनुभव होतो. आणि आपल्यातील गणेश तत्वाला जागृत करणे हीच गणेशचतुर्थी साजरा करण्यामागची मूळ धारणा आहे.

मन खंबीर करण्यासाठी, संतोषी वृत्ती ठेवण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांना एकत्र आणण्यासाठी एक चांगली संधी म्हणजे गणेश चतुर्थी या सणा मधूनच सर्वांना मिळते.

संपूर्ण जगभरामध्ये नावाजलेला आणि आद्य पूजेचा मान असलेला हा श्री गणेश देवता आरोग्य क्षेत्रातील प्रगतीचा एक प्रतीकच आहे.

गणपती बाप्पाला आपण अर्पण करत असलेल्या प्रसाद आणि पूजेच्या वस्तू मधून आपल्याला शारीरिक विकारांवर मात कशी करायची याची जणू मार्गदर्शनच करते. गणपती बाप्पांना वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा या पीत्त विकारांवर मात करतात. तर परिपूर्ण क्षुधाशांतीसाठी केळी आणि मोदक, वात विकारांवर उपयुक्त असणारा नारळ, आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त असलेली जास्वंद हे गणपती बाप्पा चे प्रतीक आहेत.

अशा विविध पातळींवरून आरोग्य संरक्षणाचा मंत्र देणारा गणेश देवता ला अर्पण करण्यासाठी साजरा केला जाणारा गणेश चतुर्थी हा उत्सव हिंदू धर्मानुसार खूप पवित्र आणि आनंदाचा उत्सव आहे.

गणेश चतुर्थी मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *