पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या लेखाच्या मार्फत आम्ही तुमच्या साठी पाण्याचे महत्व मराठी निबंध घेऊन आलोत.
मित्रानो प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पाणी हा पाडवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे पाण्याशिवाय आपली सजीव सृष्टी आणि या सृष्टी मध्ये जीवन जगणारे जीव जिवंत राहू शकत नाहीत.
मानवी शरीर हे 70 टक्के पाण्याने बनलेले असते केवळ मानवी शरीरात च नाही तर आपल्या पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्व आहे. म्हणुनच म्हणतात ना “पाणी हेच जीवन“
चला तर मग पाहूया, पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi
पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi
मित्रांनो निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी मिळाले आहेत , यातली सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे पाणी होय.
मित्रांनो पाण्याशिवाय या पृथ्वीतलावरील एकही सजीव आपले जीवन जगू शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगाला पडते. मनुष्याप्रमाणे प्राणी आणि वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाणी खूप आवशक्य आहे.
मित्रांनो अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा असल्या तरीदेखील आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. अन्नाशिवाय आपण एक आठवडा पर्यंत जगू शकतो परंतु पाण्याशिवाय तीन दिवस जगणे देखील शक्य नाही.
आपल्या पृथ्वीचा एकाता टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरीदेखील त्यातील तीन टक्के भाग केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे पाणी संवर्धन आणि पाणी बचत ही आजच्या काळाची मूलभूत गरज बनली आहे.
पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे तो म्हणजे पाऊस परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने , मनुष्याला पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने शासन सर्वांनाच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकणार हे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला पाणी संवर्धन करणे आणि पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीव यासाठी पाणी खूप महत्त्वपूर्ण आहे लहान कीटकापासून ते मोठ्या सर्व प्राणी आणि पक्षांत पर्यंत पाण्याची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला दररोज सहा ते सात लिटर शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी हा मानवी शरीराचा मुख्य घटक आहे. सर्व सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
पाण्याचे महत्व :
सजीवांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे. या पृथ्वीतलावर मनुष्य , प्राणी आणि वनस्पती या तिघांचेही अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आवश्यकता भासते ती म्हणजे पाण्याची होते त्यामुळे पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. पाणि हे फक्त पिण्यासाठीच वापरले न जाता कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, साफ-सफाई करण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरले जाते. त्याप्रमाणे चे पाणी औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुद्धा वापरले जाते. एवढेच नसून पाण्यापासून ऊर्जा निर्मिती सुद्धा केली जाते.
पाण्याचा सर्वात महत्वाचा वापर म्हणजे शेतीसाठी केला जातो. आपण जे अन्न खातो ते शेतीतून पिकवले जाते व या शेतीमध्ये पिकवण्यासाठी आवश्यकता भासते ती म्हणजे पाण्याची. त्यामुळे पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते आपल्या भारत देशातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बऱ्याच शेत जमिनी पडीक पडल्या आहेत.
पाण्याचे विविध महत्त्व आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे :
- मनुष्यासाठी पाण्याचे महत्व :
पाण्याची सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे मनुष्याला. मनुष्याला प्रत्येक काम करण्यासाठी पाण्याची गरज भासते. लहानात लहान काम जरी करायचे म्हटले तरी आपल्याला पाणी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्याला पिण्यासाठी आणि स्वतःची तहान भागवण्यासाठी पाणी लागते. त्यानंतर घरातील लहान लहान कामे करण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी ,भाजीपाला धुण्यासाठी अशा लहान लहान कामासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची आवश्यकता असते.
- शेतीसाठी पाण्याचे महत्व :
शेती हा असा व्यवसाय आहे जो पूर्णता पाण्यावर अवलंबून आहे. जर पाणी नसेल तर शेतामध्ये पीक घेणे शक्यच नाही त्यामुळे शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
- वनस्पती साठी पाण्याचे महत्व :
ज्याप्रमाणे मनुष्याला जगण्यासाठी पाण्याची आवशक्यता असते त्याप्रमाणेच वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. वनस्पती या केवळ सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या आधारावर जगत असतात.
वनस्पतीला योग्य पाणी मिळाले नाही तर वनस्पती जळून जातात किंवा योग्य येत नाही. त्यामुळे वनस्पती साठी पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. झाडे मुळाच्या साह्याने जमिनीतील पाणी शोषण घेतात आणि झाडाच्या इतर शाखांना पोहोचवतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे झाडांच्या वाढीसाठी गरज असते ती म्हणजे पाण्याची.
- प्राणी आणि पक्षांसाठी पाण्याचे महत्व :
मित्रांनो ज्याप्रमाणे मनुष्याला आणि वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या पृथ्वीतलावरील सर्व प्राणी आणि पक्षांना देखील पाण्याची आवश्यकता असते.
पाण्याशिवाय या पृथ्वीतलावरील एकही प्राणी आणि पक्षी जिवंत राहू शकत नाही. वरचे प्राणी आणि पक्षी हे तर असे आहेत ज्यांचे पूर्णता आयुष्य हे पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्राणी आणि पक्षांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
- औद्योगिकीकरणामुळे साठी पाण्याचे महत्व :
मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये औद्योगिकरण या क्षेत्राने अतोनात प्रगती केलेली आहे. विविध व्यवसाय आणि उद्योग धंदे हे आपल्या देशाला विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत परंतु बहुतांश व्यवसायांना आणि विविध उद्योग धंद्यांनन देखील पाण्याची आवश्यकता भासते.
पाणी संवर्धन उपाय :
मित्रांनो पाणी हा आपल्या सर्व सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला आणि संवर्धन करणे खूप गरजेचे आहे.
पाणी हे अमूल्य संसाधन आहे याचा वापर जितका काटकसरीने कराल तितके त्याचे फायदे भविष्यामध्ये होते आपल्या येणाऱ्या पिढीला देखील पाणी मिळावे यासाठी आपल्याला आजच्या म्हणजेच वर्तमान काळामध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक य आहे.
प्रत्येक मनुष्याने पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचे आहे पाण्याला उगीच व्यर्थ जाऊ देऊ नये. त्यासाठी त्याचा उपयोग आवश्यक तेथे साठी आणि गरजेसाठी करावा.
आपल्या अवती भोवती पाण्याचे विविध स्त्रोत आहेत जसे की, नदी-नाले, तलाव, विहिरी आणि समुद्र. परंतु हे सर्व स्त्रोत अवलंबून आहे तो ते म्हणजे केवळ पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कधी नाले विहिरी यांच्यामध्ये पाणी येते.
परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे पावसाचे प्रमाण देखील कमी झाल्याने मनुष्याला पाण्याची कमतरता भासत आहे.
तसेच वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे देखील पावसाचे प्रमाण कमी झाले आहेत यासाठी मनुष्याने वृक्षतोडं थांबून वृक्षारोपण करावे जेणेकरून प्रदूषणही कमी होईल आणि पावसाचे प्रमाण देखील वाढेल.
तसेच मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने करावा. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करणे सर्वांसाठी फायद्याचे ठरेल. तसेच पावसाचे पाणी टाकी किंवा खड्ड्यांमध्ये साठवून ठेवावे. तसेच आपल्या आसपासच्या परिसरातील नदी, नाले यांमध्ये दूषित पाणी सोडले जाणारे किंवा तेथील पाणी दूषित केले जाऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पाण्याचा एक थेंब अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी पाणी हे जपून वापरले पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही यामुळेच म्हणतात, “पाणी हेच जीवन”
पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh
- फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi
- माझा आवडता प्राणी निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
- मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi
- रहदारीचे नियम वर मराठी निबंध । Essay on Traffic Rules in Marathi