माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi
मित्रांनो आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक असतात जे वेगवेगळ्या प्रकारच्या छंदाची जोपासना करता छंद म्हणजेच आपल्याला आवडत असलेले एखाद्या गोष्टीतील कौशल्य किंवा एखाद्या गोष्टीचे केलेली जोपासना होय. एखाद्या व्यक्तीला लिहायचा छंद असतो, तर एखाद्या व्यक्तीला झाडे लावायचा, चित्र काढायचं, स्वयंपाक करायचं किंवा घराची स्वच्छता करायचे अशाप्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार त्याचा छंद वेगवेगळा असतो.
त्याचप्रमाणे माझा देखील एक छंद आहे. माझा आवडता छंद वाचन आहे. लहानपणापासूनच माझ्यामध्ये वाचनाची आवड अधिक होती. मी सहज जरी बसलेलो असलो तरी एखादे पुस्तक घेऊन वाचत असेल किंवा घरामध्ये येणारा रोजचा रोज पेपर वाचायचो. त्यामुळे माझ्यातील वाचनाचीही आवड दिवसेंदिवस वाढतच गेली.
व मला कळालेच नाही की वाचन हा माझा छंद बनला आहे. त्यामुळे माझा आवडता छंद वाचन आहे.
माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi
मला वाचायला खूप आवडते त्या म्हणून मी नेहमी वेगवेगळी पुस्तके वाचत असतो. वाचनाची ही आवड माझी आतापासून नसून लहानपणापासूनच आहे. आजच्या वर्तमान काळामध्ये बुद्धिमान व्यक्तीला खूप मानसन्मान केला जातो त्यामुळे ज्ञान हे आपल्याला पुस्तकांमधून प्राप्त होते विविध पुस्तके बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत ज्यामधून आपल्याला प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान मिळाले जाते परंतु हे ज्ञान मिळवून घेण्यासाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे वाचनाची.
आपल्यातील बहुतांशी व्यक्ती अशा आहेत ज्यांना वाचणे म्हणजे कंटाळवाणे वाटते म्हणून काही व्यक्ती वाचन करत नाही त्यामुळे त्यांना पुस्तकांमधील ज्ञान देखील प्राप्त करून घेता येत नाही.
परंतु हा माझा आवडता छंद वाचन (माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi) असल्याने मी नेहमी वेगवेगळी पुस्तके वाचत असतो. तुम्ही मला वेळ मिळेल तेव्हा किंवा माझ्या रिकामा वेळा मध्ये मला आवशक्य असल्या ला त्या ज्ञानाची पुस्तके वाचत असतो मला असे वाटते की उगाची वेळ वाया घालवण्यापेक्षा काहीतरी ज्ञान मिळणाऱ्या गोष्टी वाचणे अधिकच चांगले.
वाचन माणसाला कमी वेळेमध्ये आणि कमी वयामध्ये अधिक ज्ञानी बनवते, म्हणून बरेच ज्ञानी लोक सांगत असतात की नेहमी काही ना काही वाचत राहावे. नेहमी वाचन केल्याने बुद्धीला चालना मिळते व त्यामुळे बुद्धीचा विकास देखील होतो. वाचनामुळे मानसिक विकास होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते त्यामुळे वाचन केल्याने आपल्या शरीरामध्ये सकारात्मक विचारांची निर्मिती होते.
मित्रांनो, आपण अनेक महान चरित्रांचा विचार केला असता आपल्याला दिसून येईल की प्रत्येक महान आणि यशस्वी व्यक्ती व त्यांच्या जीवनामध्ये वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले होते म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झाले त्यामुळे वाचनाची आवड असणारा व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतोच तसेच त्या व्यक्तीला सर्वव्यापी ज्ञान मिळते व असा व्यक्ती जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी सक्षम होतो.
प्रत्येक माणसामध्ये काही ना काही एक तरी असे वैशिष्ट्य असते आणि आपल्यातील हे वैशिष्ट्य ओळखावे लागते. आणि प्रत्येक व्यक्ती मध्ये असा गुण असतो तो आपल्याला खूप आवडत असतो त्याला आपण छंद म्हणू शकतो. माझ्यातील असे वैशिष्ट्य किंवा छंद म्हणजे वाचन होय. मला वाचन करायला खूप आवडते.
माझ्यामध्ये देखील वाचनाची आवड लहानपणापासूनच होती. जेव्हा मी चौथीमध्ये होतो तेव्हा आमच्या घरामध्ये रोज पेपर यायचा माझ्या वाचनाला सुरुवात झाली पेपरपासून झाली. मी रोजच्या रोज पेपर वाचू लागलो, व हळूहळू माझ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली, व मी पेपर सोबत इतर ज्ञानी पुस्तके देखील वाचू लागले. आज पर्यंत मी रामायण, महाभारत, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, सर्व महान पुरुषांचे जीवन चरित्र, विविध ज्ञान सांगणारी पुस्तके, विनोदाची पुस्तके, कविता, सर्व प्रकारचे पौराणिक आणि धार्मिक ग्रंथ वाचून काढले आहेत. याशिवाय मी रोजचा पेपर रोज वाचतो यामुळे मला चालू घडामोडी व आपल्या देशांमध्ये तसेच देशाच्या बाहेर काय चालू आहे याचे ज्ञान मिळते.
वाचन हा ज्ञान मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे . वाचना मधून आपल्याला सर्व गोष्टीचे ज्ञान मिळू शकते.
त्यामुळे ज्या व्यक्तीला वाचता येत नाही असे व्यक्ती अज्ञानी राहतात व जीवनामध्ये यशस्वी देखील होत नाहीत त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचे असेल एक ज्ञानी व्यक्ती म्हणून जगायचे असेल तर आपल्याला वाचनाची आवड असणे गरजेचे आहे.
वाचना मधून बुद्धीचा विकास लवकर होतो तसेच एखाद्या क्षेत्रातील ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला त्या क्षेत्राच्या संबंधित पुस्तके वाचणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे वाचल्याशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टीचे आणि कुठल्याही क्षेत्रातील ज्ञान मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला देखील भरमसाठ ज्ञान पाहिजे असेल तर तुमच्यामध्ये वाचनाची आवड असायलाच पाहिजे.
वाचन हा असा गुण आहे जो प्रत्येकाच्या अंगी असतो परंतु काहीच लोक वाचनाला छंद समजून त्याची जोपासना करतात तर काही लोक वाचनाला कंटाळवाणे समजून वाचन करत नाही परंतु असे केल्याने आपले चे नुकसान होते हे लवकर कळून येत नाही.
वाचन माणसाला विचार करायला लावते.वाचनातून बुद्धीचा, मनाचा तसेच मानसिक विकास देखील होतो. वाचनामुळे चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मदत होते. तसेच भाषणांमधून आपल्या मध्ये नवनवीन कौशल्य निर्माण होतात वाचनातून सकारात्मक बुद्धिमत्ता तयार होते. नेहमी सतत चांगल्या गोष्टीचे वाचन केल्यास आपले चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्यास मदत होते. तसेच विविध समस्यांवर मात करण्याचे ज्ञान, धाडस आपल्याला वाचनातून मिळते.
त्यामुळे मला वाटते की वाचन हा सर्व छंदां पेक्षा खूपच चांगला छंद आहे. व माझा आवडता छंद वाचन आहे. म्हणून इंग्रजी मध्ये एक म्हण आहे ” रिडींग मेक्स मॅन परफेक्ट ( Reading Makes Man Perfect )” त्यामुळे आपल्या जीवनामध्ये वाचनाला महत्त्वाचे स्थान आहे.
माझ्याही जेवणामध्ये वाचनाला खूप महत्त्वाचे स्थान आहे ,त्यामुळे माझा आवडता छंद वाचन आहे. मला वाचायला खूप खूप आवडते!!!!
माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- गणेश चतुर्थी मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi । Ganesh Utsav Nibandh in Marathi
- फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi
- माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी । My Favourite Animal Dog Essay in Marathi
- पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi
- माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh