माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh
मित्रांनो आपण सर्वाना तर माहितीच आहे की पर्यावरणाचे एक ऋतू चक्र असते. ज्यानुसार प्रत्येक ऋतू हा चार महिन्याचा असतो. म्हणजेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हा प्रत्येक ऋतू चार महिन्याचा असतो. प्रत्येक ऋतूचे हे काही विशेष महत्व आसते. परंतु या तिन्ही ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू पावसाळा आहे, आणि आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी घेऊन आलोत.
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh
उन्हाळ्याचे कडाकाचे दिवस संपतात सर्वांच्या तोंडावर एक रहस्यमय हास्य पहायला मिळते त्यामागचे कारण म्हणजे थोड्या दिवसांमध्ये पावसाळा ऋतु सुरू होणार असतो. जून महिन्यापासून पावसाळा ऋतु चालू होतो व जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात होते. मुख्यता जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यात पर्यंतचा कालावधी हा पावसाळा ऋतू असतो.
पावसाळा ऋतु मला मला फार आवडतो कारण पावसाळा ऋतू पर्यावरणामध्ये विविध बदल झालेले असतात संपूर्ण सृष्टी हिरव्यागार रंगाने वेढलेली असतात नद्या-नाले पाण्याने वाहतात. झाडाला नवीन पालवी फुटलेली असते. हे संपूर्ण दृष्य डोळ्याला आकर्षित करणारे असते, त्यामुळे माझा आवडता ऋतू पावसाळा आहे. त्यातल्या त्यात श्रावण महिन्यातील पाऊस हा मला अधिकच आवडतो.रिमझिम पावसामुळे जमिनीतून येणारा सुगंध अप्रतिम असतो. तसेच या पावसा मध्ये अचानकच येणारा मोर, कोकीळ या पक्षांचा आवाज तर मनाला मोहीवणारा असतो.
ज्याप्रमाणे सर्वसाधारण मनुष्याला पावसाळा ऋतु आवडतो त्याप्रमाणेच विविध पक्षाला देखील पावसाळा ऋतू आवडतो त्यामुळे बरेचसे पक्षी पावसामध्ये नाचताना किंवा गाताना दिसतात.
पावसाळा या ऋतु मध्ये संपूर्ण निसर्गाचे चक्र बदलून जाते. या बदलत्या वातावरणाचा अनुभव घेणे खरंच एक अविस्मरणीय क्षण असल्याने पावसाळा हा ऋतू मला खूप आवडतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळा ऋतू सुरू होतात सर्वात जास्त आनंद होत असेल तो म्हणजे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी लोकांना. कारण पावसाळ्यात ग्रुपमध्ये जमिनी नांगरण्यासाठी आणि पेरण्यास सुरुवात होत असते. शेती करण्यासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे पाणी आणि भारतातील बहुतांश शेती जमिनी या पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे पावसाळा वृत्तीची सर्वात जास्त आशा असते ती म्हणजे शेतकऱ्यांना.
पाऊस कधी रिमझिम तर कधी दूध स्वरूपाचा असतो परंतु हा दोन्ही प्रकारचा पाऊस हा वेगळाच अनुभव देऊन जातो. आणि या पावसामध्ये भिजत भिजत शाळेतून घरी परत येण्याची मजा ही सगळी वेगळीच असते. कधीकधी पावसाचा जोर राहा अधिकच असला तर शाळेला सुट्टी देखील मिळते त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा आवडता ऋतू उन्हाळा पावसाळा असतो.
पावसाळा ऋतु मधील वातावरण हे अगदी निसर्गमय असते. नवनवीन रोपे झाडेझुडपे पावसाळा ऋतु मध्येच येतो जन्माला येतात. तसेच पावसाळा ऋतु मध्ये खूप काही किडे , मुंग्या, नाकतोडे , साप आणि गांडूळ इत्यादी किडे जन्माला येतात तर काही कीटक असे आहेत जे केवळ पावसाळा ऋतु मध्येच बघायला मिळतात. त्यामुळे विविध किड्यांचे आणि किटकांचे दर्शन हे केवळ पावसाळा ऋतु मध्येच घडते.
नदी नाले आणि तलाब यांचे पात्र देखील पावसाच्या पाण्याने भरून वाहायला लागते. पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण सृष्टी हिरवीगार रंग रंगली जाते. डोंगरावरती नवीन नवीन फुले पहायला मिळतात त्यामुळे डोंगर हा दरून एखाद्या बगीच्या प्रमाणे सुंदर दिसतो. तसेच पावसाळा ऋतु मध्ये विविध धबधबे वाहू लागतात, हे दृश्य मनाला भुरळ पाडणारे असते.
तसेच सर्वांना आवडणारा उत्सव गणेशोत्सव हा देखील पावसाळा ऋतु मध्ये येतो त्यामुळे बहुतांश जणांचा आवडता ऋतू पावसाळा आहे. पावसाळा ऋतु मधील वातावरण हे एकदम प्रसन्न असते. उन्हाळ्यामध्ये कोरडी पडलेली जमीन पावसाळा ऋतु मध्ये ओली होते. वाळलेली पाने पुन्हा टवटवीत होतात. ओसाड पडलेले नदी नाले पुन्हा वाहू लागतात. पक्ष्यांचा किलबिलाट आणि आकाशामध्ये येणारे काळेभोर ढग, कुठूनतरी येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळका, अचानक पडणारा पाऊस आणि विजेचा कडकडाट हे सारे वातावरण मनाला प्रसन्न करणारे असते. गावाबाहेरची डोंगर जणू पाचूचे वैभव धारण केल्याप्रमाणे दिसतात. त्यामधून येणारे पाण्याचे झरे आणि धबधबे हे अधिकच वैभवशाली दिसतात.
आनंद आणि सौंदर्य याची उत्कृष्ट अशी जोडणी पावसाळ्या ऋतू मध्ये पाहायला मिळते. तसेच पावसाळा ऋतु मध्ये पर्यटन स्थळांना देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात कारण पावसाळा ऋतु मध्ये पर्यटन स्थळांचे सौंदर्य अधिकच आकर्षित असते. महाबळेश्वर गोवा कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये सौंदर्याने जणू मीठीच मारलेली दिसते. त्यामुळे बहुतांश लोक अशा ठिकाणाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भेट देण्यासाठी जातात. पावसाळ्यातील निसर्गाचे दृश्य आहे खरंच मनाला भुलवणारे असते. अशा निसर्गमय वातावरणाचा आनंद केवळ पावसाळा ऋतु मध्येच घेता येतो.
त्यामुळे माझा आवडता ऋतू पावसाळा आहे. मला पावसाळा ऋतु खूप खूप आवडतो व मी पावसाळा ऋतु मधील निसर्गाच्या बदलणाऱ्या रूपाचे डोळे भरून परीक्षण करतो तर दरवर्षी पावसाळा ऋतू ची आतुरतेने वाट पाहत असतो.
माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =