फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi
आपल्या आजूबाजूच्या निसर्गातून आपल्याला विविध गोष्टी मिळतात. म्हणजेच निसर्गाने आपल्याला अनेक सुंदर गोष्टी दिलेले आहेत जसे की झाडे, पशुपक्षी, डोंगर नद्या इत्यादी अनेक. यातीलच एक म्हणजे फुले होय. फुले हे दिसायला अतिशय सुंदर असतात त्यामुळे सर्वांनाच पुढे खूप आवडतात आपल्या आजूबाजूला विविध आकाराची विविध रंगाची फुले आपण पहात असतो. प्रत्येक फुलाचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे असते आणि त्याचा सुगंध देखील वेगळा असतो.
मनुष्याच्या मनाला सुखद असा अनुभव फुलांना पाहून मिळतो. त्यामुळे बहुतांश जण आप-आपल्या घरामध्ये किंवा बागेमध्ये फुलांची झाडं लावत असतात.
मित्रांनो ” फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही एका फुलाची आत्मकथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अरे मनुष्य आपल्या भावना व्यक्त करतात, त्याप्रमाणेच फुलांच्या देखील काय भावना असू शकतील याचे चित्रण आम्ही आजच्या ” फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi” लेखाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi
मित्रांनो मी एका बागेतील फूल आहे. माझा आकार हा मध्यम असून मी पांढरा, पिवळा, गुलाबी, केसरी, लाल अशा विविध रंगांमध्ये आढळतो. माझ्या झाडाला छोटे-छोटे काटे येतात व माझी पाने लहान असून पानाच्या काठावर देखील लहान लहान काटे असतात.
माझ्या या वर्णना वरून तुम्हाला कळलेच असेल की मी गुलाब बोलतोय. होय मित्रांनो मी तुमच्या सर्व मनुष्यांचा आवडतीचा फुल म्हणजे गुलाब बोलतोय.
आज मी तुम्हाला माझे आत्मवृत्त म्हणजे आत्मकथा सांगण्यासाठी इथे आलो आहे.
मित्रांनो माझा जन्मा हा एका बागेमध्ये झाला, सुरुवातीला मी एक कळी होतो परंतु हळूहळू माझे रुपांतर एका सुंदर गुलाबामध्ये होऊ लागले. माझ्या आजूबाजूला माझे भावंडे गुलाब फूल होऊनच बोलत होते. अनेक लोकांकडून मला या उद्यानामध्ये खूप प्रेम मिळत होते मुलींना तर मी खूप आवडत असे त्यामुळे बहुतांशी स्त्रिया या बागेमधील गुलाबांच्या फुलांना तोडून डोक्यामध्ये घालायच्या. काही मुली आमच्यासोबत फोटोदेखील काढायच्या.
मित्रांनो आपल्यातील बहुतांश जणांना गुलाब हे फुल आवडते म्हणून प्रत्येकाच्या घरासमोर कुंडीमध्ये किंवा बगीच्यामध्ये तुम्हाला माझी झाडे किंवा रोपे पहायला मिळतात. माझे सौंदर्य हे सर्वांनाच आकर्षित करणारे आहे त्यातल्या त्यात माझा सुगंध हा सर्वांनाच आवडतो त्यामुळे बहुतांश जाण माझा सुगंध घेण्यासाठी मला विकत घेतात.
माझ्या वरचे तुमचे प्रेम पाहून मला खूप आनंद होतो. आज मोठ्या बागांमध्ये माझी लागवड केली जाते व माझ्या सौंदर्याचा नजारा लोकांना आकर्षित करतो त्यामुळे ज्या ठिकाणी गुलाबाच्या बागा आहेत त्या ठिकाणी बहुतांशी पर्यटक फोटोशूट करण्यासाठी येतात.
मी तुम्हाला मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगाला पडतात. म्हणजेच लग्न समारंभ किंवा लहान मोठ्या कार्यक्रमांमध्ये डेकोरेशन साठी माझा वापर केला जातो. सजावटी मध्ये मला अव्वल स्थान दिले जाते.
तसेच मोठमोठ्या शहरांमध्ये देखील माझा दर्जा हा खूप उच्च मानला जातो देवांना घालण्यात येणाऱ्या हारांमध्ये तसेच लग्नामध्ये घालण्यात येणाऱ्या हारामध्ये मला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते माझ्याशिवाय एखादा हार पूर्णच होत नाही. त्यामुळे मला तुम्ही शांत करून खूप मान मिळतो आणि या तुमच्याकडून मिळणारा हे महत्त्व आणि मान पाहून मी अगदी आनंदित होतो.
याशिवाय माझ्या पाकळ्यांचा वापर हा गुलकंद बनवण्यासाठी केला जातो. बहुतांश जणांना गुलकंद खायला खूप आवडते त्यामुळे बाजारपेठेमध्ये गुलकंदला
वाढती मागणी असल्याने शेतकरी देखील माझी मोठ्या प्रमाणात लागवड करून मला विकतात.
त्याशिवाय माझ्या पाकळ्यांवर प्रक्रिया करून त्यापासून गुलाबजल बनविले जाते. म्हणजेच माझा वापर हा सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.
लाल रंगाच्या गुलाबाच्या फुला ला चल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते हे दर्शवायचे असेल तेव्हा ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला लाल रंगाचे गुलाबाचे फुल देऊन प्रपोज करते यातून त्यांच्यातील प्रेम दर्शवले जाते.
लोकांकडून मिळणारी लोकप्रियता आणि माझा वापर पाहून मी खूप खूष होतो परंतु मित्रांनो तुझ्याप्रमाणे माझा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो त्याप्रमाणेच काही लोकांकडून माझे अवहेलना देखील केली जाते.
म्हणजे काही व्यक्ती माझा वापर वापर हा केवळ तात्पुरता करतात. ज्यावेळी सजावटीमध्ये मला वापरले जाते त्यावेळी केवळ काही तासासाठी मला मोठा मान दिला जातो त्यानंतर मला काढून फेकले जाते. काहीजण तर मला गोळा करून कचऱ्याच्या डब्यामध्ये देखील फेकतात.
तसेच, हराळ मध्ये देखील माझ्यासोबत असेच वागणूक केली जाते केवळ काही त्यासाठीच मला गळ्यामध्ये घालून फिरवले जाते त्यानंतर मला काढून फिरतात माझ्याकडे कोणी बघतही नाही कित्येक जण तर माझ्या अंगावर पाय देतात, मला तुडविता परंतु तुमच्या अशा वागण्यामुळे मला किती त्रास होतो याचे तुम्हाला भानदेखील राहत नाही.
मी माझ्या झाडावर किती सुंदर सुंदरा वाऱ्याच्या झुळके मध्ये डुलत असतो परंतु काही लोक मला झाडावरून तोडतात. माझा सुगंध घेऊन मला रस्त्यावर फेकून देतात. तर काहीजण माझा वापर हारामध्ये करतात. मोठ्या सुईने माझ्या अंगाला बेळ पाडून एका दोर्या मध्ये ओवले जाते, परंतु असे करत असताना माझ्या अंगाला किती इजा होतात याची तुम्हाला जाणीव देखील नाही.
मी गुलाब फुला तुम्हा मनुष्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे उपयोगाला पडते. परंतु तुमच्या मनुष्याकडून मला केवळ धिक्कार मिळाला आहे.
मी एकच सुंदर फुल असून माझ्या झाडावर डुलत असताना मी झाडाची शोभा वाढवतो. मी माणसाला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात येतो आयुर्वेदामध्ये औषध म्हणून माझा वापर केला जातो. परंतु जेव्हा मी सुकून जातो तेव्हा मला कचर्यात फेकून दिले जाते आणि अशा पद्धतीने माझे अस्तित्व नष्ट होते.
त्यामुळे मित्रांनो माझी सर्व मनुष्यांना एकच विनंती आहे की, तुम्ही आम्हा फुलांचा वापर तात्पुरता करू नका. आम्हाला देखील मनुष्याप्रमाणे भावना आहेत त्यामुळे आमच्या भावनांचा विचार करा. आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात येतो त्यामुळे तुम्ही आम्हाला उगाच तोडून रस्त्यावरती फेकू नका केवळ जेव्हा गरज आहे तेव्हाचा आमचा वापर करा. जेणेकरून असे वागल्यास तुम्हाला आमच्यापासून वेगवेगळ्या गोष्टींचा लाभ घेता येईल व आम्हाला देखील आनंद होईल की, आम्ही इवलेसे फुल तुम्हा मनुष्याच्या उपयोगासाठी आलो.
फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझा आवडता प्राणी निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
- मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi
- रहदारीचे नियम वर मराठी निबंध । Essay on Traffic Rules in Marathi