मी सरपंच झालो तर मराठी निबंध । Mi Sarpanch Zalo tr Marathi Nibandh
मित्रांनो , जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मोठे होऊन हे काही ना काही व्हायचे स्वप्न असते. कोणाला मोठे होऊन डॉक्टर व्हायचे असते, तर कोणाला इंजिनियर… सर्वसामान्य व्यक्तींन पेक्षा माझी इच्छा ही वेगळी आहे कारण मला मोठे होऊन सरपंच व्हायचे आहे.
मी एका छोट्याशा खेडेगाव मध्ये राहणारा मुलगा आहे. खेडेगाव म्हटले की , तुमच्या समोर कुठल्याही प्रकारची सुविधा नसलेले गावाचे चित्र उभे राहते. त्याप्रमाणे माझे गाव देखील आहे. माझ्या गावांमध्ये कुठल्याही सोयीसुविधा नाहीत. आणि माझ्या गावाला एक संपन्न गाव आणि सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी मला सरपंच व्हायचे आहेत.
ज्याप्रमाणे नगरपालिकेचा कारभार हा नगराध्यक्ष पाहत असतात, त्याप्रमाणे गावाचा कारभार हा गावातील सरपंच पाहतात. म्हणून मला मोठे होऊन सरपंच व्हायचे आहे.
मी सरपंच झालो तर मराठी निबंध । Mi Sarpanch Zalo tr Marathi Nibandh
मित्रांनो मी सरपंच झालो तर मी माझ्या गावाचे संपूर्ण रूपच बदलून टाकेल. सर्वप्रथम गाव म्हटले की शहरी लोकांच्या डोळ्यासमोर गावाची जी प्रतिमा उभी राहते ती प्रतिमा मला बदलायची आहे. म्हणजे शहरी लोकांच्या मते गावांमध्ये पाण्याची व्यवस्था नसते, विजेची व्यवस्था नसते किंवा रस्ते आणि स्वच्छता शसते. त्यामुळे मला शहरी लोकांच्या मनामध्ये गावाची प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा माझ्या गावासाठी नसावी यासाठी मी प्रयत्न करेल.
त्यामुळे जर मी सरपंच झालो तर सर्व प्रथम आमच्या गावा मध्ये बदल घडून आणेल तो म्हणजे पाण्याचा. गावातील प्रत्येक घरोघरी पाण्याची उपलब्धता करून देईल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गावाकडे पाण्याची खूपच पंचायतीत लोकांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. त्यामुळे जर मी सरपंच झालो तर सर्वप्रथम गावातील पाण्याची समस्येचे समाधान करीन.
माझ्या गावाच्या आजूबाजूचा पर्यावरण हा खूप ओसाड आहेत कारण गावांमधील लोकांना वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात केल्याने गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये झाडांची संख्या खूपच कमी झाली आहे , त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये माझ्या गावाचा तापमानाचा पारा हा 40 डिग्री पेक्षा जास्त असतो. त्यामुळे मी गावांमध्ये वृक्षारोपणाचे विविध संमेलन भरते लोकांना झाडाचे महत्व पटवून सांगत सांगून झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन देईन.” एक व्यक्ती, एक झाड” ही मोहीम मी माझ्या गावांमध्ये राबविण.
तसेच आमच्या गावामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याने म्हणजेच गावांमध्ये शाळा- महाविद्यालय नसल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना 5-6 मीटरचे अंतर पार करून शाळेसाठी जावे लागते.
अशा परिस्थितीमध्ये पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवण्यात घाबरतात. त्यामुळे मी सरपंच झालो तर गावातील विद्यार्थ्यांसाठी गावांमध्येच शाळेची सुविधा उपलब्ध करून देईन. जेणेकरून गावातील सर्व मुलांना माध्यमिक पर्यंतचे सर्व शिक्षण गावामध्येच दिले जाईल.
जर मी सरपंच झालो तर, गावातील दुसरी महत्वाची समस्या दूर करीन ती म्हणजे विजेची. गावामध्ये विजेची सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील लोकांना आपल्या देशामध्ये मध्ये काय चालू आहे याची माहिती मिळत नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यामध्ये अडचणी येतात. तसेच गावामध्ये विजेची व्यवस्था नसल्याने गावांमध्ये एकही व्यक्ती मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक वस्तू थोडक्यात डिजिटल इंडिया पासून वंचित राहिलेले आहेत.
मी सरपंच झालो तर गावामध्ये विजेची सुविधा उपलब्ध करून दिली जेणेकरून गावातील लोकांना विजेवर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांची निर्मिती करता येईल जेणेकरून गावातील लोकांना गावांमध्येच रोजगाराची संधी देखील उपलब्ध होईल थोडक्यात गावातील लोकांना देखील शहरी लोकांप्रमाणे विजेचा फायदा करून घेता येईल.
त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे गावातील रस्ते दुरुस्ती करीन. माझ्या गावांमध्ये रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब असल्याने अलीकडे रस्त्या वरील खड्ड्यांमुळे आणि रस्त्याच्या बिकट परिस्थिती मुळे अनेक अपघाताच्या दुर्घटना आपल्याला पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीमध्ये मी सरपंच झालो तर गावातील सर्व रस्ते दुरुस्त करीन जेणेकरून गावांमध्ये रस्त्याच्या समस्येमुळे कुठलाही प्रकारचा अपघात होणार नाही.
तसेच ग्रामीण भागांमध्ये योग्य वैद्यकीय सोय नसल्याने ग्रामीण भागातील लोक विविध आजाराने ग्रासले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर मी सरपंच झालो तर गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देईल. त्यासोबतच गावा मध्ये वैद्यकीय दवाखाना काढण्याचा प्रयत्न देखील करेल. जेणेकरून गावातील लोकांना औषध उपचार गावामध्येच सहजरीत्या प्राप्त होईल.
तसेच जर मी सरपंच झालो तर(मी सरपंच झालो तर मराठी निबंध | Mi Sarpanch Zalo tr Marathi Nibandh), गावामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविन. त्यामुळे सगळे गाव सुंदर होईल त्या सोबतच गावामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग, महामारी उद्भवणार नाही.
या व्यतिरिक्त मी गावांमध्ये “पाणी आडवा पाणी जिरवा अभियान” राबविलेजेणेकरून गावातील प्रत्येक व्यक्तीला पाण्याची किंमत कळेल. तसेच मे गावामध्ये “झाडे लावा झाडे जगवा” हे देखील अभियान राबविण कारण वर्तमान काळाला झाडाची खूप आवशक्यता आहे. तसेच झाडामुळे प्रदूषण देखील आटोक्यात येते.
असे म्हणतात की ग्रामीण भागातील लोक अंधश्रद्धेवर खूप मोठ्या प्रमाणात ते विश्वास ठेवतात. त्यामुळे मी माझ्या गावा मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन अभियानाची सुरुवात करील, जेणेकरून गावातील लोक अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता डिजिटल इंडिया आणि डिजिटल विज्ञानावर विश्वास ठेवतील.
तसेच मी सरपंच झालो तर (मी सरपंच झालो तर मराठी निबंध । Mi Sarpanch Zalo tr Marathi Nibandh), गावातील सर्व लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून गावातील सर्वांना साक्षर बनवण्यासाठी प्रयत्न करेन. त्यासाठी मी गावांमध्ये वाचनालयाची स्थापना करीन.वाचनालयामध्ये विविध पुस्तके, चरित्र आणि ग्रंथ उपलब्ध करून देईल, जेणेकरून गावातील सर्व लोक या वाचनालयाचा अनुभव आणि वापर करून घेतील. तसेच जाती भेद, धर्म त्यांच्यामध्ये भेदभाव न ठेवता गावातील सर्व लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत. त्यासाठी मी गावांमध्ये वेगवेगळे सण -उत्सव एकत्र मिळून सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यासाठी प्रोत्साहन करेल.
अशा प्रकारे जर मी सरपंच झालो तर माझ्या गावाला स्वच्छ, सुंदर आणि साक्षर गाव बनविण्यासाठी टोकाचे प्रयत्न करेन.
मी सरपंच झालो तर मराठी निबंध । Mi Sarpanch Zalo tr Marathi Nibandh हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझे स्वप्न निबंध मराठी । Maze Swapna Essay in Marathi
- माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध । Maza Avadta Chand Nibandh Marathi
- गणेश चतुर्थी मराठी निबंध । Ganesh Chaturthi Essay in Marathi । Ganesh Utsav Nibandh in Marathi
- फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी । Fatkya Pustakache Atmavrutta Nibandh in Marathi
- माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी । My Favourite Animal Dog Essay in Marathi