नमस्कार मित्रांनो!!! आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी वसंत ऋतु वर मराठी निबंध घेऊन आलोत.
वसंत ऋतु वर मराठी निबंध । Spring Season Essay in Marathi
मित्रांनो आपल्या देशामध्ये मुख्य तीन ऋतू आहेत-उन्हाळा , पावसाळा, हिवाळा परंतु या ऋतू व्यतिरिक्त वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद ,हेमंत आणि शिशिर हे सहा उपऋतु आहेत. ज्याप्रमाणे मुख्य ऋतू हा चार महिन्याचा असतो त्याप्रमाणे उपऋतु हा दोन महिन्याचा असतो.
ऋतू चक्रानुसार येणाऱ्या प्रत्येक ऋतूचे महत्त्व वेगळे असून प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणामध्ये वेगवेगळे बदल घडून येतात. वातावरणातील बदलत्या घटकांवरून देखील आपल्याला कोणता ऋतू चालू आहे हे कळते. परंतु सर्व ऋतूमध्ये अतिशय सुंदर आणि वातावरणातील बदलांनी पूर्ण असलेला ऋतू म्हणजेच वसंत ऋतू होय.
वसंत ऋतूची चाहूल लागताच सर्व पशु पक्षी आणि मनुष्य अतिशय आनंदी होतात कारण हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीने त्रस्त झालेल्या पृथ्वीला आतुरता असते ती म्हणजे सूर्याची….
कधी एकदा आकाशात सूर्य येतो आणि थंडीच्या लाटेत पासून आपले संरक्षण करतो. यासाठी सर्वजण वाट पाहत असतात. उन्हाळा ऋतु च्या सुरुवातीला आणि हिवाळा ऋतू च्या शेवटच्या भागामध्ये थंडी आणि उन्हाचा जो संगम तो म्हणजे वसंत ऋतू होय.
वसंत ऋतु मध्ये निसर्गाचे संपूर्ण चित्र बदलते वसंत ऋतु मध्ये वातावरण हे खूपच सुंदर असते. थंड वाऱ्याच्या झुळका आणि सोबत कोमल ऊन याचा अनुभव हा अविस्मरणीय असतो. वसंत ऋतु हा सर्व पशु पक्षी आणि मनुष्य साठी आनंद घेऊन येतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ आणि फाल्गुन या महिन्यांमध्ये वसंत ऋतु ला सुरुवात होते. उन्हाळा ऋतु च्या थंड अनुभवानंतर शरीराला आवशक्यता असते ती म्हणजे उष्णतेचे आणि ही कोमल शरीराला शांत करणारी उष्णता मिळते ती म्हणजे वसंत ऋतू मध्ये.
वसंत ऋतूचे आगमन होताच सूर्य देखील आपली उपस्थिती दाखवतो ढगाच्या आडुन सूर्यदेव आपले दर्शन देतो. हिवाळ्याच्या थंडीला बाजूला सारून वसंत ऋतु येतो, सोबतच निसर्गामध्ये वेगवेगळे बदल देखील घडवून आणतो. वसंत ऋतु मध्ये हिंदूधर्मातील गुढीपाडवा हनुमान जयंती वसंत पंचमी यासारखे वेगवेगळे सण आणि उत्सव साजरे केले जातात. यातील गुढी पाडवा हा हिंदुंचा सर्वात मोठा सण असतो. गुढीपाडवा या सणा पासून नवीन वर्षाला सुरुवात होते तर वसंत पंचमी दिवशी विद्येची माता सरस्वती ची पूजा केली जाते.
वसंत ऋतूमध्ये झाडाची सर्व पानांची गळती होऊन झाडाला नवीन पालवी फुटण्याचा सुरुवात होते हे दृश्य मनाला आकर्षित करणारे असते. संपूर्ण निसर्गामध्ये झाडांना कोवळी आणि नवीन पाने आलेली दिसतात त्यामुळे निसर्ग अधिकच सुंदर दिसतो.
झाडांचे नवीन पालव्या जणू वसंत ऋतूचे स्वागतच करत असतात. वसंत ऋतु हा सर्व ऋतूंमध्ये अधिकच सुंदर आणि आकर्षित मानला जातो. म्हणूनच वसंत ऋतु ला सर्व ऋतूंचा राजा देखील म्हणतात, कारण वसंत ऋतूमध्ये बदलत्या निसर्गाचे चित्र हे अद्भूत असते.
त्यातच कुठून तरी कानावर येणारा कोकिळा पक्षाचा मंजुळ आवाज हा त्यात अधिकच भर घालतो. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज , वाऱ्याची थंड झुळूक आणि झाडाच्या नवीन पालव्या हे दृश्य केवळ वसंत ऋतु मध्येच पाहायला मिळते. वसंत ऋतु चे हेच सौंदर्य पाहून कित्येक कवींनी लेखकांनी वसंत ऋतु पर लेख आणि कविता लिहिलेल्या आहेत तर ” वसंत ऋतु वर मराठी निबंध | Spring Season Essay in Marathi” देखिला पाहायला मिळतात. कारण वसंत ऋतू मध्ये लेखकांना आणि कवींना नवनवीन कल्पना मिळतात ज्याच्या आधारावर ते वसंत ऋतूचे वर्णन करतात.
वसंत ऋतूच्या सौंदर्याचे वर्णन हे आपल्याला धार्मिक ग्रंथांमध्ये देखील पाहायला मिळतात. रामायण महर्षी वाल्मिकी यांनी देखील वसंत ऋतूचे वर्णन अतिशय सुंदर शब्दांमध्ये केले आहे.
सुंदर निसर्ग हा सर्वांनाच पाहायला मिळतो त्यामुळे वसंत ऋतुमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते. अति थंडी आणि अति उष्णता हे मानवी आरोग्यासाठी खूपच घातक असते परंतु थंडीचा आणि उष्णतेचा मेळ घालणारा वसंत ऋतू हा मानवी आरोग्यासाठी चांगला समजला जातो.
वसंत ऋतु हा आपल्याला आनंद प्रसन्नता उत्साह देऊन जातो सोबतच निसर्ग किती सुंदर आहे हे देखील सांगून जातो. तेव्हा निसर्गाला पाहण्यासाठी आपला दृष्टिकोन आणि पुरेसा वेळ द्यायला पाहिजे.
वसंत ऋतू हा शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जातो.शेतामध्ये गव्हाचे पीक डोलू लागते, आणि आता गव्हाचे पीक पूर्णपणे तयार झाले असते. म्हणून शेतकरी बंधू वसंत ऋतु ची वाट पाहत असतात. काही गावांमध्ये वसंत ऋतु निमित्त आपल्या आपल्या परंपरेनुसार छोटा उत्सव देखील साजरा केला जातो.
तसेच वसंत ऋतूच्या प्रसन्न वातावरणामध्ये होळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण साजरा केला जातो. होळी हा सण सर्व माणसासाठी महत्त्वपूर्ण संदेश देऊन जातो म्हणजेच – सुखाचे दिवस बघण्यासाठी आपल्याला दुःखाचे दिवस पार करावेच लागतात. त्यासोबतच वसंत ऋतूमध्ये आंबा , जांभूळ, आवळा संत्रे यासारखी फळे खायला मिळतात, त्यामुळे बहुतांशी जाण्याचा आवडतीचा ऋतू हा वसंत ऋतू आहे….
वसंत ऋतु वर मराठी निबंध । Spring Season Essay in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध । Shaletil Pahila Divas Nibandh in Marathi
- माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
- ताज महाल वर मराठी निबंध । Taj Mahal Essay in Marathi
- माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi
- माझा आवडता प्राणी ससा । My Favourite Animal Rabbit Essay in Marathi