माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi
मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये पर्यटनासाठी वेगवेगळी प्रसिद्ध असे ठिकाणी आहोत.
तसेच आपल्या भारत देशातील बहुतांश ठिकाणांना निसर्गाचा वारसा देखील लाभलेला आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला फिरायला आवडते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील ऐतिहासिक तसेच निसर्गमय ठिकाणाचा आनंद घ्यायला आपल्यातील सर्वांनाच आवडत असेल!!
माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi
आपल्या भारत देशात नवनवीन ठिकाणी फिरायला आणि तेथील ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी विविध पर्यटनस्थळे आहेत. ज्या ठिकाणी जाऊन आपण आपले दुःख विसरून थकवा विसरून जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो. परंतु मी आज पर्यंत पाहिलेल्या सर्व पर्यटन स्थळांपैकी माझे आवडते ठिकाण म्हणजे महाबळेश्वर होय.
महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाचा सुंदर असा वारसा लाभलेल्या या ठिकाणाला वर्षभरामध्ये लाखो पर्यटक भेट देतात. त्यामुळे महाबळेश्वरला महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
ब्रिटिश काळापासूनच महाबळेश्वरला उत्कू गिरीस्थान म्हणजेच डोंगराळ भाग लाभलेला आहे आणि तो आज देखील कायम आहे. चोही बाजूने डोंगराळ भागाने वेढलेले हे महाबळेश्वर पर्यटकांसाठी खरंच एक आकर्षणाचं ठिकाण आहे.
महाबळेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 1 हजार 372 मीटर उंचीवर असून पश्चिम घाटाच्या डोंगराळ रांगेत वसलेले अतिशय थंड हवेचे ठिकाण आहे.
महाबळेश्वर हे ठिकाण पुणे शहरापासून सुमारे 120 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. उत्तर मुंबई पासून महाबळेश्वर हे 285 किलोमीटरच्या अंतरावर आहे.
मित्रांनो महाबळेश्वरला विल्सन पॉइंट या नावाने देखील ओळखले जाते. निसर्गरम्य असलेले ठिकाण मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि आणि सिंडोल चा भाग अशा तीन खेडे गावांची मिळवण्यात महाबळेश्वर या शहराची निर्मिती झाली.
महाराष्ट्रातील मुख्य नद्या पैकी एक असलेली नदी म्हणजे कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणाहून झाला त्यामुळे महाबळेश्वरच्या सुंदर्ते मध्ये आणखीन भर पडली आहे. याशिवाय महाबळेश्वरचे हवामान हे स्ट्रॉबेरी या फळाची साठी सर्वोत्कृष्ट आहे, त्यामुळे महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते. भारत देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी सुमारे 85 टक्के स्ट्रॉबेरीचे उत्पादन एकट्या महाबळेश्वर या ठिकाणाहून होते.
पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असलेले महाबळेश्वर या ठिकाणी महादेवाचे मोठे मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात केली असावी.
तसेच डोंगराळ प्रदेशात असलेल्या महाबळेश्वर या ठिकाणी घनदाट वनश्री देखील आहे. महाबळेश्वर चे सुंदर रूप पाहायचे असेल तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महाबळेश्वर शहराला नक्कीच भेट द्यावी. महाबळेश्वर या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्याच्या दिवसात येतील प्रदेश जलमय दिसतो. महाबळेश्वर येथील निसर्गसौंदर्य खंडाळा-लोणावळा, युवा माथेरान सारखे असलेले येथील पॉईंट्स महाबळेश्वर याला आणखीच सौंदर्य प्राप्त करून देतात.
महाबळेश्वर या ठिकाणी असलेल्या निसर्गमय पॉईंट्स मुळे महाबळेश्वर हे पर्यटकांच्या दृष्टीने एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पर्यटकांसाठी आवडीचे असलेले फळ स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि जांभळाचा मध व व लाल मुळे हे महाबळेश्वर या ठिकाणी खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत.
त्यातल्या त्यात महाबळेश्वर या ठिकाणी मिळणारा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे तसेच या ठिकाणी मिळणारे गुलकंद देखील देशभरामध्ये प्रसिद्ध आहे.
तसेच महाबळेश्वर येथील बाजारपेठेमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी लोकरीचे कपडे, स्वेटर, चामड्याचे पट्टे, चण्याचे पाकीट इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात. तसेच महाबळेश्वर येथील चणे- फुटाणे देखील खूप प्रसिद्ध आहेत.
तसेच महाबळेश्वर येथील कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री वेंना सरस्वती आणि भागीरथी या पाच नद्यांचे उगम स्थान पर्यटकांसाठी बघण्यासारखे आहे.ं
तसेच मित्रांनो तुम्ही कधी महाबळेश्वर या ठिकाणी गेलात तर तेथील मंकी पॉईंट, आर्थर सीट पॉइंट, नीडल हॉल पॉइंट, एलिफंट हेड पॉईंट आणि विल्सन पॉइंट हे पॉइंट पाहणे कधीही विसरू नका.
तसेच महाबळेश्वर पासून महाड रस्त्याने 21 किलोच्या अंतरावर प्रतापगड आहे. त्यामुळे महाबळेश्वर या ठिकाणाला भेट द्यायला आलेले पर्यटक प्रतापगड किल्ल्याला भेट देण्यासाठी नक्कीच जातात. त्या प्रमाणेच महाबळेश्वर या ठिकाणी असलेला लिंगमळा धबधबा हासुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचे एक मुख्य स्थान आहे. हा धबधबा साधारणता सहाशे फूट उंचीवरून थेट वेंना तलावात पडतो.
तसेच पर्यटकांसाठी आणखी एक बघण्यासारखे ठिकाण म्हणजे जुना महाबळेश्वर या ठिकाणापासून सात किलोमीटरच्या अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणे आहेत त्यामध्ये पाच जुनी मंदिरे आहेत जी जुन्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात.
महाबळेश्वर हे ठिकाण नैसर्गिकरीत्या अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि निसर्गाच्या दृष्टीने अग्रेसर असलेले हे ठिकाण माझे आवडते ठिकाण आहे.
मित्रांनो भविष्यात तुम्हाला देखील महाबळेश्वर या ठिकाणाला भेट देण्याची संधी मिळाली तर नक्कीच भेट द्या आणि तेथील निसर्गाचा आणि वेगवेगळ्या पॉईंट्स चा आनंद घ्या.
माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझा आवडता प्राणी ससा । My Favourite Animal Rabbit Essay in Marathi
- माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi
- राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध । Essay On My National Bird Peacock In Marathi
- मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी । Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi
- मागणी पत्र लेखन मराठी । Magni Patra Lekhan in Marathi