शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध । Shaletil Pahila Divas Nibandh in Marathi
नमस्कार मित्रांनो आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध लिहून आलोत.
शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध । Shaletil Pahila Divas Nibandh in Marathi
शाळा हि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप खास असते. घरा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आपुलकीचे आणि जवळचे वाटणारे दुसरे ठिकाण म्हणजे शाळा असते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शाळेला अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान असते. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शाळेमध्ये घालवलेले क्षण हे अविस्मरणीय असतात. शाळा म्हणजे जणू विद्यार्थ्यांसाठी दुसरा परिवारच असतो. शाळा सुरुवात झाल्यापासून शाळेला सुट्टी मिळेपर्यंत प्रत्येक विद्यार्थी रोज शाळेला जात असतो परंतु या सर्व दिवसांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा आवडीचा आणि अविस्मरणीय असा दिवस असतो तो म्हणजे शाळेचा पहिला दिवस….
त्याप्रमाणे माझ्याही जीवनातील माझ्या शाळेचा पहिला दिवस हा खूप खास आहे, आणि तो माझ्यासाठी आज देखील अविस्मरणीय आहे. मला आज देखील माझ्या शाळेचा पहिला दिवस अगदी स्पष्ट आठवतो.
शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध । Shaletil Pahila Divas Nibandh in Marathi
नमस्कार मित्रानो, माझे नाव सुरज आहे वमाझ्या शाळेचे नाव ” नेहरू विद्यालय” असे आहे. माझी नुकतीच इयत्ता चौथी पूर्ण झाली होती. त्यामुळे एक मेला परीक्षेचा रिझल्ट लागला व मी चौथीमध्ये पास झालो व उन्हाळ्याच्या सुट्ट्या देण्यात आल्या. आता मी पाचवीत जाणार होतो त्यामुळे मला दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावे लागत होते.
पूर्वीची माझी शाळा ही केवळ इयत्ता चौथी पर्यंतच होती. त्यामुळे पाचवीला मी नेहरू विद्यालया मध्ये प्रवेश घेतला. माझ्या शाळेचे नवीन सत्र चालू होणार होते नेहरू विद्यालय ही शाळा माझ्यासाठी पूर्णतः नवी होती. पाचवीचा अभ्यासक्रम हा नवा होताच त्या सोबत शिक्षक वर्ग मित्र मैत्रिणी सर्व काही नवीन मिळणार होतो याची मला थोडी भीती वाटत होती. कारण इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण हे अगदी प्राथमिक असते त्यामुळे येथे अभ्यासाची भीती नसते त्यांना शिक्षकांची भीती नसते. परंतु पाचवीपासून माझ्या खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरुवात होणार होती.
16जुन रोजी शाळा सुरु होणार होती. त्यामुळे जसजसं शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ येऊ लागला मी शाळेची सर्व पूर्वतयारी करून ठेवली. बाबांनी मला नवीन दप्तर, पेन, बूट, सॉक्स, वह्या, पाण्याची बॉटल सर्व काही नवीन आणून दिले. तसेच नवीन शाळेचा नवीन गणवेश देखील खरेदी केला. एक दिवस सरत होता आणि शाळा सुरू होण्याचा दिवस जवळ येत होता तशी माझ्या मनामध्ये थोडी भीतीच होती. कारण नवीन शाळा नवीन शिक्षक म्हणजे सुरवातीला थोडे घाबरल्या सारखे वाटते ना!!
शाळेच्या पहिल्या दिवसाच्या विचारात मला रात्रभर झोपच आली नाही.शाळेमध्ये पहिल्या दिवशी काय होईल? तेथील शिक्षक कडक तर नाही ना? तेथील विद्यार्थी माझ्याबरोबर मिळून-मिसळून राहतील की नाही? इत्यादी प्रश्न माझ्या मनामध्ये गोंधळ घालत होते.
अखेर तो दिवस उजडला, आज माझा शाळेचा पहिला दिवस (शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध | shaletil pahila divas nibandh in marathi) होता. मी सकाळी लवकर उठलो अंघोळ करून शाळेचा गणवेश घालून तयार झालो नाष्टा करून शाळेला तोच आईने मला डबा आणून दिला. घराचा रस्ता समोरच शाळेची स्कूल बस आम्हाला घ्यायला येणार होती त्यामुळे माझ्या पहिल्या दिवशी आई आणि बाबा दोघेही मला स्कूल अभ्यास पर्यंत सोडण्यात साठी आले. माझ्यासारखे इतर मुले आणि मुली देखील स्कूल बसची वाट पाहत होते.
सर्व वातावरण अगदी आनंदी वाटत होते आणि आता मी नवीन शाळेमध्ये जाणार याचा आनंद होता सोबतच मनामध्ये थोडी धडधड ही होती. परंतु माझी ही अवस्था कोणालाही दिसून आली नाही. बरोबर दहा वाजता स्कूल बस आम्हाला घेण्यासाठी आली. व मी आई-बाबांना बाय स्कूल बस मध्ये चढलो.
माझा शाळेचा पहिला दिवस तसले नेहमी अगदी आनंदामध्ये होतो. थोड्याच वेळामध्ये मी शाळेच्या मैदानावर पोहोचलो. चौथीपर्यंतची शाळा ही केवळ दोन खोलीची होती परंतु माझे नेहरू विद्यालय ही शाळा मोठ-मोठ्या इमारतीची होती. सुरवातीला त्या इमारती पाहून मला थोडी भीती वाटली परंतु मी स्वतःला सांभाळले. मग मी सूचनाफलक जवळ जाऊन माझा वर्ग कोठे आहे पाहिले व वर्गाच्या दिशेने गेलो.
मी माझ्या वर्गाच्या जवळ पोहोचलो व दरवाजामधून वर्गामध्ये पाहिले माझ्यासारखे खूप मुले आणि मुली वर्गामध्ये उपस्थित होती. मी त्या सर्वांमध्ये माझ्या ओळखीचा चेहरा कोणी आहे का पाहत होतो. परंतु मला माझ्या ओळखीचे कोणीच मिळाले नाही. वर्गामध्ये बेंच वर बसून सर्वजण एकमेकांशी गप्पा गोष्टी करत होते. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये मी एकटाच पडलो की काय असे मला वाटले. मी देखील हळूच एका बेंचवर जाऊन बसलो.
माझ्या आजूबाजूला वर्गातील इतर विद्यार्थी होते मी हळूहळू ओळख करून घेऊ लागलो. बघता बघता दोघे तिघे माझे चांगले मित्र झाले. सर्वजण गप्पा गोष्टी करत होते उन्हाळ्या मधील गमतीजमती सांगत होते, तेवढ्याच वर्गामध्ये वर्गशिक्षक आले. सुरुवातीला वर्ग शिक्षकांना पाहून थोडी भीती वाटली, परंतु वर्गशिक्षकांनी बोलण्यास सुरुवात केली व सर्वांची नावे विचारली. मी देखील माझे नाव सांगून माझी ओळख सरांना करून दिली.
आमच्या वर्ग शिक्षकांचा स्वभाव अगदी विनोदी आणि चांगला होता हे मला पुढच्या काही क्षणांमध्ये कळाले. सरांसोबत आम्ही अगदी मित्रान प्रमाणे वागू लागलो. त्यानंतर वर्गामध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता चौथी मध्ये चांगले गुण होते, अशा विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, त्यामध्ये मी देखील होतो.
त्यानंतर वर्गाचा प्रतिनिधी ठरवण्यात आला आणि आश्चर्याची गोष्ट कशी वर्गाचा प्रतिनिधीत्व पद हे मलाच मिळाले. आता माझ्या मनातील नवीन शाळा नवीन शिक्षक आणि नवीन मित्र मैत्रिणी ही भीती पूर्णता संपली होती. व मी अगदी आनंदामध्ये होतो.
शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी काहीही शिकवले नाही केवळ एकमेकांशी ओळख करून देण्यात आली. त्यानंतर आमचा वर्ग शिक्षकांनी आम्हाला संपूर्ण शाळा फिरून दाखवली. शाळेतील इतर वर्ग, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगणाचे मैदान सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे दाखवली.
मला माझी शाळा खूप आवडली होती, त्यातल्या त्यात शाळेचे ग्रंथालय खूप भव्य आणि सुंदर होते त्यामुळे शाळेचे ग्रंथालय मला खूपच आवडले. त्यानंतर वर्ग शिक्षकांनी आम्हाला पुन्हा आमच्या वर्गामध्ये घेऊन गेले आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी, भूगोल , इतिहास अशा सहा विषयांची पुस्तके देण्यात आली.
शाळेचा पहिला दिवस ( शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध | shaletil pahila divas nibandh in marathi) हा खूपच मजेत गेला. साडेचार वाजता आमच्या शाळेला सुट्टी होते. सुट्टी झाल्यानंतर मी पुन्हा बस कडे धावलो बस मध्ये बसून घरी आलो आणि आई-बाबांना शाळेच्या पहिल्या दिवसाच्या सर्व आठवणी सांगितल्या.
अशाप्रकारे माझ्या शाळेचा पहिला दिवस हा माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. माझ्या शाळेचा पहिला दिवस हा मला सदैव आठवण राहील!!!!
शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध । Shaletil Pahila Divas Nibandh in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
- ताज महाल वर मराठी निबंध । Taj Mahal Essay in Marathi
- माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi
- माझा आवडता प्राणी ससा । My Favourite Animal Rabbit Essay in Marathi
- माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi