माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi

माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi

माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi

आपल्या देशामध्ये अनेक पाळीव प्राणी पाळले जातात त्यामध्ये कुत्रा , मांजर , बैल , बकरी, गाय, वेगवेगळ्या प्राण्यांचा समावेश होतो. मला ही लहानपणापासून पाळीव प्राणी पाळायला फार आवडते. तसे मी अनेक पाळीव प्राणी सुद्धा पाळले जसे की, कुत्रा, मांजर आणि गाय परंतु या सर्व प्राण्यांमध्ये गाय हा माझा आवडता प्राणी आहे.

माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi

आपल्या देशामध्ये गाईच्या अनेक जाती आढळतात. त्यामध्ये देशी गाय आणि जर्सी गाय असे दोन प्रकार पडतात.

यातील जर्सी गाय या प्रकाराची गाय माझा आवडता प्राणी आहे. व मी माझ्या घरी एक जर्सी गाय देखील पाळली आहे. मी माझ्या घरच्या गाईचे नाव “कपिला” असे ठेवले आहे. आमची कपिला जेव्हा एक वर्षाची वासरू होती तेव्हा बाबांनी तिला विकत घेतले. तेव्हापासून कपिला ही आमच्याच घरी आहे. आज माझी कपिला सात वर्षाची एक गाय झाली आहे. या सात वर्षांमध्ये माझी आणि कपिला गाईची मैत्री ही खूप घट झाली आहे.

असे म्हणतात, की आपण प्राण्यांवर जीव लावला की प्राणी आपल्याला दुप्पट जीव लावतात त्याप्रमाणेच माझ्या कपिला गाईचा माझ्यावर खूप जीव आहे.. मी कपिल आला आवाज दिला किती इकडेतिकडे मान करत मला शोधते माझा आवाज देखील पिलाला अगदी ओळखीचा वाटून ती माझ्या आवाजाला प्रतिसाद देते. मी कपिला गाईच्या जवळ गेलो की कपिला मला जिभेने चाटते. मला कपिला गाई सोबत खेळायला खूप आवडते म्हणून मी रोज कपिला ला आमच्या शेतामध्ये फिरायला घेऊन जातो आणि हिरवेगार गवत खाऊ घालतो.

माझ्या गाई चा रंग हा काळा असून तिच्या शरीरावर कोठे कोठे मोठे पांढरा रंगाचे ठिपके आहे. माझ्या गाईची शिंगे ही बुटकी आणि मजबूत आहेत‌. गाईला आखूड आणि झुपकेदार असे शेपूट असून तिला चार खांबा प्रमाणे पाय आहेत.

माझी कपिला गाय हिरवेगार गवत आणि सारा खाते म्हणून मी गाईला रोज सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशी तीन वेळा चारा घालतोय. कधीकधी गाईला शेतामध्ये फिरायला देखील घेऊन जातो. गाईला पाळण्यासाठी केवढा चाऱ्याची गरज असल्याने गाईला पाळण्यासाठी पुरेसा खर्च येत नाही. उलट गाई पासूनच आपल्याला आर्थिक फायदा होतो. गायही खूप प्रेमळ आणि गरीब प्राणी आहे.

माझी कपिला जर्शी गाय ही इतर गाईन पेक्षा खूप जास्त दूध देते. साधारणता रोज 11 ते 14 लिटर पर्यंत माझी गाय दुध देते. या गाईच्या दुधापासून आम्ही ताक, दही, लोणी, तूप आणि विविध मिठाई सुद्धा करतो. कधी कधी गाईचे दूध विक्री सुद्धा करतो त्यामुळे आम्हाला आर्थिक फायदा होतो. म्हणून लढाईचा उल्लेख हा बहुपयोगी प्राणी म्हणून केला जातो. तसेच गायीचा वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला फायदा होतो.

गाईपासून दूध तर मिळतेच सोबतच गाईचे शेणा का सोना गोऱ्या तयार केले जातात आणि या गोर्‍यांचा वापर ग्रामीण भागांमध्ये इंधन म्हणून केला जातो तर काही ठिकाणी गाईच्या शेणापासून गोबर गॅस करून त्याच्यावर स्वयंपाक केला जातो. तर काहीजण गाईच्या शेणाचा वापर खत म्हणून करतात.

त्याचप्रमाणे गाईच्या गोमूत्राचा वापर हा वेगवेगळे औषधी गुणधर्मांमध्ये केला जातो.

तसेच गायला हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानले जाते. हिंदू धर्मामध्ये गाईला गोमाता म्हणतात. म्हणून हिंदू धर्मामध्ये गाईची पूजा करतात. दिवाळी मधील “वसुबारस” या दिवशी गाईला विशेष स्थान दिले जाते.

वसुबारस या दिवशी मी माझ्या गाईला स्वच्छ धुतो. माझ्या गाईची पूजा करतो आणि संध्याकाळच्या वेळी गाईला पुरणपोळी चा नैवेद्य दाखवतात.

हिंदू पुराणांनुसार गाईंमध्ये 36 कोटी देवांचा सामावेश आहे. त्यामुळे मी माझ्या गायला रोज सकाळी नमस्कार करतो. गाय हे सस्तन प्राणी असल्याने गाय पिलांना जन्म देत. आमच्या कपिला गाय ने आजपर्यंत दोन वासरांना जन्म दिला आहे. गाय हा एकमेव असा प्राणी आहे जो भारतातील सर्वच भागांमध्ये आढळतो.

गायही मनुष्यासाठी खूप फायद्याचे ठरते कारण गाईच्या दुधामध्ये खूप शक्ती असते त्यामुळे गाईचे दूध पिल्याने पाचक विकार दूर होतात. संक्रमण आणि विविध आजारांपासून मुक्तता करण्यासाठी गाईचे दूध खूप फायदेशीर ठरते. गाईचे दूध आपल्याला मजबूत आणि निरोगी बनवते म्हणून मी रोज सकाळी आमच्या गाईचा एक ग्लास दूध पितो.

विशेषतः लहान मुलांसाठी गाईचे दुध खूप फायद्याचे ठरते म्हणून आजूबाजूचे बहुतांशी जणांच्या गाईचे दूध विकत घेतात.

अशाप्रकारे बहुउपयोगी आणि पवित्र असलेली घाई हे माझा आवडता प्राणी आहे. म्हणून माझी कपिला गाय मला खूप खूप आवडते.


माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

One thought on “माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *