रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi

रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi

रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी रक्षाबंधन मराठी निबंध घेऊन आलो.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये दरवर्षी विविध सण साजरे केले जातात. प्रत्येक असा हा विविध उद्देश आणि विधीचा नात्याला दर्शनाला असतो त्यातील रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्याने दर्शनाला सण आहे हिंदू संस्कृतीतील रक्षाबंधन हा सण अतिशय महत्त्वाचा समजला जातो.

म्हणून आजच्या ” रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi” लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी सणावर मराठी निबंध घेऊन आलोत.

रक्षाबंधन वर 10 ओळीत मराठी निबंध 10 lines on Raksha Bandhan Essay in Marathi

  1. रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्याला समर्पित असा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे.
  2. भारतामध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
  3. हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो.
  4. रक्षा बंधन या सणाला विविध नावाने ओळखले जाते जसे की, राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा अशा विविध नावांनी ओळखला जातो.
  5. बहिण भावाच्या नात्यातील प्रेमाला दर्शवणारा रक्षाबंधन हा एक प्रमुख सण आहे.
  6. रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते.
  7. या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो व तिच्या रक्षणाचे वचन देतो.
  8. रक्षाबंधन या दिवशी सर्व बंधू-भगिनी खूप आनंदी असतात.
  9. ज्या बहिणींचे भाऊ दूर राहतात, त्या भावाला कुरियरद्वारे राखी पाठवतात.
  10. अशाप्रकारे आनंदाचा आणि उत्साहाचा व बहीण भाऊ यांच्या नात्याला अधिक दृढ करणारा रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे.

रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi

रक्षाबंधन हा सण भारतामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सर्व सणांमध्ये एक प्रमुख सण समजला जातो. रक्षाबंधन हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, तर इंग्रजी कॅलेंडर नुसार ऑगस्ट महिन्यामध्ये येतो. रक्षाबंधन या दिवशी नारळी पौर्णिमा हा देखील सन साजरा केला जातो. नारळी पौर्णिमा हा सण मुख्यता कोळी बांधवांकडून साजरा करण्यात येणाऱ्या सर्वात मोठा सण आहे.

रक्षाबंधन हा सण बहीण आणि भाऊ यांच्या नात्यात प्रेमास बंधन दर्शवतो रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते म्हणून वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या रक्षाबंधन हा सण साजरा केला जात आहे. रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते म्हणून रक्षाबंधन या सणाला “राखी पौर्णिमा” या नावाने देखील ओळखले जाते. रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाला कपाळावर कुंकवाचा टिळा लावून त्याच्या हाताच्या मनगटावर राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीला भेट वस्तू देतो आणि तीझे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो.

रक्षाबंधन या दिवशी लोक पंचपक्वान बनवून आनंद साजरा करतात. बहिण आपल्या भावाला प्रेमाने गोड खाऊ घालते. एकंदरीत रक्षाबंधन हा सण आपण बहिण-भावाचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी साजरा केला जातो.

रक्षाबंधनचा हा सण बहीण-भावाच्या पवित्र नात्याला दर्शवणारा असा सण संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण साजरे करून पहिला आणि बांधव या दोघांचे नाते अधिक मजबूत होते. इतिहासकालीन काळापासून रक्षाबंधन हा सण साजरा करत असल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात.

इतिहासातील अनेक उदाहरणे आपल्याला भाऊ बहिणीच्या नात्याचे आणि रक्षाबंधनाचे महत्व सांगतात. सन १९३५ मध्ये बहादूरशहाने मेवाडच्या राणी कर्मावतीवर हल्ला केला तेव्हा राणीने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी मुघल बादशाह हुमायूंकडे राखी पाठवून मदतीची विनंती केली. राणी कर्मावती स्वत: शूर योद्धा असल्याने त्यांनी स्वत: बहादूरशहाचा सामना करण्यासाठी रणांगणात उडी घेतली, आणि हुमायूंचा पाठिंब्याने त्यांना यश मिळवून दिले. या उदाहरणात आपल्याला राखीच्या पवित्र सोनेरी या धाग्याचे महत्व कळते आणि बहिण-भाऊ यांच्या नात्यातील प्रेमाचे प्रतीक देखील कळते.

रक्षाबंधन ( रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi) हा सण करते बहिणीसाठी खूप खास असं आहे या दिवशी बहीण भाऊ दोघेही नवीन कपडे परिधान करतात. बहिण आपल्या भावाची ओवाळणी करते भावाला कुंकवाचा टिळा लावून त्याच्या तोंडातून मिठाई ठेवते आणि मनगटावर राखी बांधते भावाची ओवाळणी करते. भाऊ देखील आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट वस्तू देतो. आणि बहिणीचे प्रत्येक समस्यांमध्ये आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देण्याचे वचन देतो.

बहीण भावाचे नाते :

बहिण-भावाचे नाते हे अतुलनीय नाते आहे बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र नाते या जगामध्ये दुसरे कुठलेही नाही. बहीण-भाऊ जसजसे मोठे होत जाते तसतसे त्यांच्या मधील नाते अधिक दृढ आणि पवित्र होत जाते. आणि याच नात्याला दर्शवण्यासाठी बहिण भावाच्या नात्यातील प्रेम अधिक मजबूत करण्यासाठी रक्षाबंधन हा सण भारतामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.

रक्षाबंधन या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते भाऊ देखील आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो आणि बहिणीची सदैव साथ देण्याचे वचन देतो.

रक्षाबंधन या सणाला राखी चे महत्व :

रक्षाबंधन या सणाला राखी चे महत्व हे अनन्यसाधारण आहे. रक्षाबंधना या सणा दिवशी बहिण भावाच्या नात्यातील प्रेमाचे प्रतीक म्हणुन राखीच्या सोनेरी धागा ला समर्पित केले जाते.

रक्षाबंधन या दिवशी सोनेरी धागा हा केवळ धागा ने सोला बहिणीचे आपला भावा बद्दलचे प्रेम दर्शवत असतो. त्यामुळे रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. भावा पासून दूर असलेली बहीण या दिवशी आवर्जून आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी येते.

भाऊ बहिणीचे प्रेम :

रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक हिंदू बहिणी आपल्या भावाला राखी बांधते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या कपाळावर कुंकू-अक्षता लावून त्याचे औक्षण करते आणि मिठाई खाऊ घालून त्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या बहिणीला त्याच्या क्षमतेनुसार प्रेमळपणा आणि भेटवस्तू सादर करून भाऊ आपले प्रेमदेखील दर्शवितो.

परदेशात असलेल्या बंधूंना केव्हा बहिणी पासून दूर असलेला भावांना बहीण रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी पाठवून प्रेम व आपुलकी दाखवतात. राखीचा सण सामाजिक समरसतेच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. हा सण भाऊ आणि बहिणीला अतूट प्रेमात ठेवण्यास सक्षम आहे. रक्षाबंधन प्रत्येक बांधवाला आपले कर्तव्य आणि संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रेरित करते. हा एक सामाजिक उत्सव आहे जो तरुण पुरुष आणि स्त्रियांना दिशाभूल करण्यापासून प्रतिबंधित करतो. त्यांच्या मनातील दूषित मानस नष्ट करण्यात मदत करतो.

रक्षाबंधन सणाचे महत्व :

हिंदू संस्कृतीमध्ये रक्षाबंधन या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण रक्षाबंधन हा सण बहीण भाऊ यांच्यातील अतूट नात्याचा आणि प्रेमाला दर्शवतो. एखादी स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाला आपला बाहू समजते तेव्हा सी भावाच्या मनगटावर राखी बांधून हे नाते दर्शवत असते.

बहिणीला भावा वरती असलेले प्रेम आणि बहिणीचे असलेली काळजी रक्षाबंधन या सणाला मधूनच दर्शविली जाते म्हणून रक्षाबंधन सणाचे महत्त्व हे अतूट आहे.


 रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *