वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध । Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi
मित्रांनो आपल्या या लेखामध्ये खूप खूप स्वागत आहे या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध घेऊन आलोत. मित्रांनो वनस्पती आपल्या पर्यावरणासाठी आणि मनुष्यासाठी किती फायद्याच्या ठरतात, व त्यांचे महत्व काय आहे सर्व आम्ही आजच या लेखाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे?
चला तर मग पाहूया, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध । Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध । Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi
मित्रांनो मानवी जीवनामध्ये आणि पर्यावरणामध्ये झाडांना खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. या पर्यावरणाला संतुलित करण्यासाठी, पर्यावरणाला शुद्ध ठेवण्यासाठी आणि मनुष्याच्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या प्राणवायु देण्यासाठी झाडी महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडाचे मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
झाडाचे आपल्या जीवनातील महत्त्व जाणून संत तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर असा अभंग रचला आहे-
” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे|
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।। “
अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी या झाडांचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे वृक्ष म्हणजेच झाडे किंवा वनस्पती होय. झाडे आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरतात मुख्यता आपल्या पर्यावरणाला संतुलित ठेवण्यासाठी आणि पर्यावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी झाडांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते.
म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगातून झाडांचे महत्व पटवून सांगताना म्हटले आहे की, झाडे ही आपल्यासाठी स सोयरे म्हणजेच पाहुणे आहेत. जेव्हा आपल्या घरी एखादा पाहुणा येतो तेव्हा आपण त्या पाहण्याची खूप काळजी घेतो त्याप्रमाणे झाडे देखील आपल्यासाठी पाहुणे आहेत म्हणून आपण झाडांची काळजी घ्यायला हवी.
वृक्षांच्या फांद्यावरती बसून पक्षी सुंदर आणि सुरेख आशा आवाजामध्ये गाणे गाता असतात, पक्षांचा आवाज ऐकून आपल्या मनाला प्रसन्नता मिळते आणि अशा ठिकाणी साक्षात पांडुरंग विठ्ठल वास करत असतात. त्यामुळे ज्या परिसरामध्ये झाडांचे प्रमाण जास्त असते त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही किंवा गुणदोष आढळत नाही. अशाप्रकारे संत तुकाराम महाराजांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” या अभंगातून वृक्षाचे महत्त्व पटवून सांगितले आहे.
या व्यतिरिक्त झाडांपासून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त होतात जसे की अन्न, वस्त्र, निवारा, फळ, फूल लाकूड तसेच काही वनस्पतींचा वापर आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी केला जातो त्यामुळे मोठ-मोठ्या आजारांवर मात करता येते. तसेच पर्यावरणामध्ये काही अशी हि झाडे आढळतात ज्यांच्या पासून रबर निर्मिती केली जाते किंवा इंधन म्हणून त्यांचा वापर केला जातो.
झाडांचा सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे झाडांपासून सर्व मनुष्याला जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मिळतो. आणि ऑक्सिजन वायू केवळ आपल्याला झाडांपासून मिळतो. जार झाडे नसती तर या पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहू शकणार नाही त्यामुळे सजीवांच्या अस्तित्वासाठी झाडे खूप महत्वाचे ठरतात.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या वृक्षांमुळे आपला परिसर आणि निसर्ग हा सुंदर दिसतो तसेच निसर्गाला हिरवा रंग देखील प्राप्त होतो. तसेच वातावरणाला शुद्ध करण्यासाठी आणि प्रदूषणाला थांबवण्यासाठी झाडे खूप फायद्याचे ठरतात त्यामुळे झाडांची संख्या वाढवणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. ज्या परिसरामध्ये झाडांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते असा परिसर हा निरोगी असतो व तेथील हवा देखील शुद्ध असते.
वृक्षांमुळे आपल्या जीवनात येणाऱ्या खूप सारा समस्यांना आळा बसतो. मोठ्या प्रमाणात वृक्षांची संख्या असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा फायदा मिळतो.
प्रत्येका व्यक्तीला हिरव्यागार आणि निसर्गमय व मनाला मोहक करणाऱ्या निसर्गामध्ये वेळ घालवायला खूप आवडते. त्यामुळे या निसर्गाला आणखीन निसर्गमय आणि सुंदर करण्यासाठी झाडे भर घालतात.
वृक्षाला आपण आपले मित्र म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही कारण वृक्षांत करून आपल्याला खूप सार्या गोष्टी मिळतात. तसेच वृक्षांपासून आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. वृक्ष आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ आपल्याला फायद्याचे ठरतात. वृक्ष जातीभेद , उच्च तूच्छ, गरीब-श्रीमंत असा भेद न करता सर्वांना समान वागणूक देतात व त्यांच्यापासून मिळणाऱ्या वस्तू प्रदान करतात.
वृक्ष हे आपल्या वातावरणातील घातक वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायूचे शोषण करतात व मनुष्याला व या सर्व सजीव सृष्टीला अवशक्य असणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वायू सोडतात. केवळ ऑक्सिजन या वायूमुळे या पृथ्वीतलावर सजीवसृष्टी टिकू शकतील आहे. आणि याचे श्रेय जाते ती म्हणजे केवळ वृक्षांना.
वृक्ष मनुष्याला प्राणवायू तर देतातच त्यासोबतच मानवाची आणखीन एक मूलभूत गरज देखिला पूर्ण करता तो ती म्हणजे पाण्याची. होय, मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, वृक्षांमुळेचं पृथ्वीवरती पाऊस पडतो. पाऊस पाडण्याच पोषक वातावरण हे वृक्ष तयार करतात. म्हणून ज्या भागामध्ये वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते त्या भागांमध्ये पाऊस देखील खूप मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करणे हे मनुष्यासाठी खूप फायद्याचे ठरते.
शांत असून आपल्याला ऑक्सिजन मिळतो त्यासोबतच इतर वस्तू देखील मिळतात जसे की,फुल , फळ, लाकूड , इंधन, सावली आणि प्राणी पक्षांसाठी निवारा. वृक्ष हे निसर्गातील कित्येक पक्षांसाठी निवाराची देखील भूमिका बजावतात. बहुतांशी पक्षी झाडां वरती आपली घरटी करून राहतात. तर काही प्राणी देखील आहेत ते देखील झाडांवरती किंवा झाडाखाली निवारा म्हणून राहतात.
थोडक्यात वृक्ष निस्वार्थी पणाने या पृथ्वीतलावरील मनुष्य , प्राणी ,पक्षी यांचे आयुष्य टिकून राहावे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
परंतु वर्तमान काळामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने मनुष्याला अनेक मोठमोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील वृक्ष मनुष्याच्या मदतीला आहेत व वायु प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्ष मदत करतात.एवढेच नसून अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती, वृक्ष औषधी निर्मिती करताना वापरले जातात. गंभीर आजारांवर अशा वनस्पती चे गुणधर्म वापरून आजार बरे केले जातात.
एवढाच नसून वृक्ष जमिनीची धूप होण्यापासून देखील वाचवतात वृक्षांच्या मुळा जमिनीमध्ये खोलवर जातात आणि मातीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे सोसाट्याचा वारा यामुळे उडून जाणारी माती किंवा जमिनीची धूप रोखण्यास मदत होते.
परंतु मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मोठ मोठे उद्योग धंदे उभारण्यासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे. मोठी जंगले तोडून त्या जागी इमारती किंवा उद्योग धंदे यांची स्थापना झाली आहे. त्यामुळे शहरी भागांमध्ये झाडांची संख्या खूपच कमी झाल्याने प्रदूषण वाढले आहे. प्रदूषण वाढल्याने मनुष्याला श्वसनाचे, हृदयरोग, त्वचेचे रोग, जागतिक तापमान वाढ, कमी पर्जन्यमान अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अशा सर्व समस्यांवर मात करायची असेल तर आपल्याला वृक्षतोड थांबवून झाडांची संख्या वाढवायला हवी. त्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.
आपण जास्त वृक्षांची लागवड केली तर प्रदूषण कमी होईल त्यासोबत आपल्याला शुद्ध हवा देखील मिळेल.
त्यामुळे मनुष्याला आपले अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला अधिकाधिक वृक्ष लागवड करायला हवी. वृक्षांची संख्या कमी झाली तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल जसे की वृक्षांची संख्या कमी झाल्याने अलीकडे पावसाचे प्रमाण देखील कमी झाले त्यामुळे काही भागांमध्ये दुष्काळासारख्या परिस्थिती उद्भवली आहे. तर काही भागांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढल्याने त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
तसेच वृक्षांची संख्या कमी झाले तर जमिनीची धूप होऊन जमीन नापीक होऊ शकते. आपणच आतापासूनच वृक्षलागवड करायला सुरुवात केली तर आपल्याला शुद्ध हवा मिळेल त्या सोबतच वृक्षांपासून आपल्याला आणि जीवनावश्यक गोष्टी सुद्धा प्राप्त होतील. येणाऱ्या आपल्या भविष्यातील पिढीसाठी शुद्ध हवा ठेवायची असेल किंवा त्यांना प्रदूषण मुक्त जीवन द्यायचे असेल तर वर्तमान काळामध्ये आपल्याला झाडांचे महत्त्व जाणून वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
वृक्ष आपल्याला लाकूड, फळे-फुले, सावली, कडक उन्हापासून आपले संरक्षण करतात. झाडे स्वतः ऊन, वारा, थंडी अशी प्रत्येक परिस्थिती सहन करतात व मनुष्याला आवश्यक वस्तू प्राप्त करून देतात. वृक्षांपासून आपल्याला कसल्याही प्रकारचे नुकसान होत नाही उलट वृक्ष आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये फायद्याचे ठरतात.
त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक वृक्षांची जबाबदारी घेणे त्यांचे संगोपन करणे व जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य आहे. त्यासाठी आपण विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन झाडे लावा झाडे जगवा अशा विविध उपक्रमातून आपल्याला लोकांमध्ये जनजागृती करायला हवी. सर्व जनतेला झाडाचे महत्व पटवून सांगायला हवे जेणेकरून वृक्षतोड थांबवली जाईल.
सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षरोपण करणे याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करायला हवे.” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या वाक्याचा अर्थ सर्वांनी समजून घेऊन त्यानुसार आपले वर्तन व करते हे गरजेचे आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध । Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- केसर खाण्याचे फायदे आणि संपूर्ण माहिती । Kesar Benefits in Marathi
- बोटांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये । Finger Names in Marathi
- Ved in Marathi । वेदांची माहिती मराठी । Ved Information in Marathi
- भाऊबीज वर मराठी निबंध । Essay on Bhaubeej in Marathi । Bhaubeej Essay in Marathi
- झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi
खूप छान
अप्रतिम