Vastu Shanti for Home in Marathi गृह प्रवेशाचे नियम
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की स्वतःचे एक घर असावे. या जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही वस्तू पण असल्या तरी चालतील पण स्वतःचे घर असणे हे अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे सर्वजण स्वतःची खरं उभारण्यासाठी प्रयत्न करत असतात जेव्हा आपण स्वतःचे घर बांधतो तेव्हा घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी घर प्रवेश किंवा वास्तुशांती करतो. परंतु ही वास्तुशांती करत असताना योग्य पद्धतीने आणि गृह प्रवेशाचे नियम पाळून करण्यात हे आपल्या घरासाठी आणि घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबासाठी खूप फायद्याचे ठरते तसेच आर्थिक स्थिती प्रबळ करण्यासाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशांती खूप फायद्याचे ठरते.
म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला वास्तुशांती माहिती आणि गृह प्रवेशाचे नियम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
चला तर मग पाहूया, ” Vastu Shanti for Home in Marathi । गृह प्रवेशाचे नियम”
Vastu Shanti for Home in Marathi । गृह प्रवेशाचे नियम
मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो स्वतःच्या घरामध्ये राहतात. स्वतःचे घर असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते मग ते झोपडी असो किंवा बंगला असो किंवा एखादा फ्लॅट असो. प्रत्येक स्त्री आणि पुरुषांची स्वप्न असते की स्वतःच्या मालकीची एक तरी वस्तू असावी. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट देखील करत असतात.
वास्तु म्हणजेच घर. मग ते घर स्वतःचे असे किंवा भाड्याचे असो परंतु घरामध्ये राहायला जाण्यापुर्वी घराची गृहशांती किंवा वास्तुशांती करणे खूप आवश्यक आहे. परंतु वास्तुशांती करताना काय नियम असतात ते नियम पाळून वास्तुशांती करावी.
वास्तुशांती म्हणजे काय?
एखाद्या वास्तूची शांती म्हणजेच वास्तुशांती होय. वास्तू या शब्दाचा अर्थ “घर” किंवा “गृह” असा होतो, आणि घराची शांती करण्यासाठी जी पूजा केली जाते त्याला वास्तुशांती असे म्हणतात.
कोणत्या दिवशी गृह प्रवेश करायला?
वास्तुशांती किंवा गृह प्रवेश करत असताना योग्य दिवस आणि मुहूर्त पाहून गृहप्रवेश करणे हे आवश्यक आहे. वास्तुशांती हि मुख्यता मार्गशीष, फाल्गुन, वैशाख आणि श्रावण या महिन्यामध्ये करणे फायद्याचे ठरू शकते. तसेच वास्तुशांती हे दिवसा करावी, रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या वेळी मध्ये वास्तुशांती करू नये.
वास्तुशांती हा विधी मुहूर्ताप्रमाणे सर्वप्रथम शेवटी किंवा कर्म मध्यात केला जाऊ शकतो. वास्तुशांती करण्यासाठी आपण जो मुहूर्त निवडला आहे त्या मुहूर्ताचं महत्त्व लक्षात घ्यावं. तसेच वास्तुशांतीची सुरुवात ही गणपती पूजनाने करावी. दारावर अंबा क्षेत्रपाल, उंबरठ्यात वास्तू, दाराच्या उजव्या बाजूस गंगानदी, डाव्या बाजूस यमुनानदी इ. पूजा कराव्यात.
यजमानांनी देवपूजा साहित्य घेऊन यजमान पत्नींनी जलपूर्ण कलश घेऊन पुरुषांनी उजवा पाय महिलांनी डावा पाय टाकून गृहप्रवेश मंगल वाद्य व वेदमंत्राच्या निनादात करावा.
अशाप्रकारे वास्तुशांती किंवा ग्रह प्रवेशाचा मुहूर्त काढून योग्य प्रकारे पूजा करावी.
कोणत्या दिवशी वास्तुशांती करू नये?
मित्रांनो आपल्यातील बहुतांशी व्यक्ती असतात ज्या व्यक्तींना वास्तुशांतीचा योग्य मुहूर्त माहीत नसल्याने ते खालीलप्रमाणे चुकीच्या दिवशीदेखील वास्तुशांती करतात त्यामुळे त्यांना घरामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
चंद्रग्रहण, सूर्यग्रहण,चांद्रमास या दिवशी हे शुभ कार्य टाळावे. धर्मसिंधू या धार्मिक पुस्तकानुसार, शुक्र तारा आणि गुरु तारा अस्त वा स्थिर होतांना गृह प्रवेश करू नये. गृहप्रवेशाचा शुभदिवस आणि वेळ या स्थानावर आधारित असतात आणि म्हणूनच समारंभ सुरु करण्यापूर्वी स्थानिक पुजाऱ्याचा सल्ला घ्यावा.
वास्तु शांती का करावी?
मित्रांनो आपल्यातील बहुतांश जणांना प्रश्न पडला आहे की नवीन घर किंवा नवीन वास्तू घेतल्यानंतर त्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर वास्तुशांती का केली जात असावी?
नवीन घर घेतल्यानंतर वास्तुशांती केली जाते याचे कारण म्हणजे एखादी वस्तू उभारली जात असताना त्या ठिकाणी खोदकाम,मोठ्या दगडांची तोडफोड, झाडांची कापणी, असंख्य प्राणी, जीव, जंतू, मुंग्या, पक्षांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो. तसेच ती वास्तू बांधण्यासाठी मोठ-मोठ्या यंत्राचा देखील वापर केला जातो थोडक्यात वस्तू पुरुषाला इजा पोहोचवण्यात येते.
तसेच नदी मधील वाळू वापरली जाते यामध्ये अस्थी विसर्जन केले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वास करण्याची शक्यता जास्त असते. अशा या सर्वांचा दोष तयार होत असल्याने त्यांना क्षमा मागण्यासाठी सर्व देवतांचे पूजन करून त्यांना प्रार्थना केली जाते. आपल्याला कसल्याही प्रकारचा दोष लावू नयेत, व वास्तुपुरुषाची कृपा आपल्यावर व्हावी याकरिता वास्तुशांती केली जाते.
वास्तुशांतीचे मुख्य लाभ :
- वास्तुशांतीचा मुख्य लाभ म्हणजे नवीन बांधकाम किंवा नवीन वास्तू खरेदी केल्यानंतर वास्तुपुरुषाच्या दोष आपल्या वरून टाळावा याकरिता वास्तुशांती केली जाते.
- कुठल्याही जमिनीचे, बांधलेल्या वास्तूचे आणि आंतरिक व्यवस्थेचे दोष दूर होतात.
- वास्तू बांधताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सूक्ष्म जीवांच्या झालेल्या जीवितहानीच्या दोषमुक्तीची प्रार्थना करण्यासाठी वास्तुशांती केली जाते.
- भावी घरात जाताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये घरामध्ये सुख- शांती, नांदावी आणि आर्थिक स्थिती बळकट व्हावी म्हणून केलेली पूजा म्हणजेच वास्तुशांती होय.
वास्तुशांती चे फायदे :
नवीन घराची किंवा वास्तूचे वास्तुशांती केल्याने याचे फायदे आपल्या जीवनावर होतात.
- वास्तुदोष दूर झाल्यामुळे घरातील सदस्यांना चांगले आरोग्य, ऐश्वर्य, धनसमृद्धीचे वरदान मिळते.
- होम हवन आदी गोष्टीमुळे घरातील वातावरण सकारात्मक होते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. 3.शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केल्याने त्या वास्तूमध्ये असणारे सर्व दोष दूर होतात. 4.वास्तू शांतीमुळे वास्तू देवता, कुल देवता यांचीही पूजा होते.
- थोडक्यात वास्तुशांती केल्याने एखादे घर किंवा एखादी वास्तू ही पूर्णपणे पवित्र होते.
हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध । My favourite Animal Lion Essay in Marathi
- माझा आवडता पक्षी मोर । Marathi Nibandh on My favorite bird Peacock.
- रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi
- वसंत ऋतु वर मराठी निबंध । Spring Season Essay in Marathi
- शाळेचा पहिला दिवस मराठी निबंध । Shaletil Pahila Divas Nibandh in Marathi