ताज महाल वर मराठी निबंध । Taj Mahal Essay in Marathi
मित्रांनो आपण सर्वांना तर माहितीच आहे की ताज महल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. दिसायला अतिशय आकर्षक आणि सुंदर असलेले हे ताजमहाल प्रेक्षकांसाठी पर्यटकाचे एक महत्त्वपूर्ण स्थान बनले आहे. ताजमहाल हे भारत देशातील एक महान स्मारक असून जगभरातील अनेक लोकांच्या मनाला आकर्षित करणारे हे महत्वपूर्ण ठिकाण आहे .
ताजमहाल म्हणजे राजवाड्याचा मुकुट म्हणजेच मोगल सम्राट शहाजहान याने 1642 मध्ये त्याच्या सर्व पत्नी पैकी अतिशय प्रिय असणाऱ्या पत्नी म्हणजे मुमताज बेगम यांच्या स्मरणार्थ एक समाधी ची स्थापना केली यालाच ताजमहाल या नावाने ओळखले जाते.
ताज महाल वर मराठी निबंध । Taj Mahal Essay in Marathi
ताजमहाल हे आग्रा शहरातील यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे ताजमहाल स्मारक हस्तिदंत पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडापासून बनलेले वास्तु आहे आणि ताजमहाल याठिकाणी स्वतः शहाजी महाराजांची देखील समाधी आहे.
ताज महाल ची वाढती लोकप्रियता आणि लोकांचे आकर्षण पाहून मला देखील लहानपणापासूनच ताजमहाल पाहण्याची इच्छा होते. ताजमहालच्या सौंदर्याबद्दल मी अनेक लोकांच्या तोंडातून ऐकले होते. जे लोक ताजमहाला जात होते ते ताजमहालच्या प्रेमामध्ये पडूनच येत होते. त्यामुळे ताजमहाल ची स्तुती मी अनेकांच्या तोंडावर ऐकली. त्यामुळे माझी देखील ताजमहाल पाहण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2013 मध्ये आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी गेलो.
खरोखरच!! मी आजपर्यंत ताजमहालचे सौंदर्य नुसते ऐकले होते, या ताज महल चे सौंदर्य हे ऐकण्यापेक्षा दुप्पट होते.
आग्र्याच्या किल्ल्यापासून सुमारे अडीच किलोमीटरच्या अंतरावर ताजमहाल वसलेले आहे. शहाजाने त्याचा सर्वात आवडत्या पत्नी अर्जुमंद बानू म्हणजे ज्यांना नंतर मुमताज बेगम या नावाने ओळखले जाऊ लागले त्यांच्या स्मरणार्थ मध्ये शाळेत जाणे ताजमहालची निर्मिती केली होती.
मुमताज चे राजावर खूप प्रेम होते. पुढे मुमताज बेगम च्या मृत्यू नंतर राजाने आपल्या कारागिरांना मुमताज बेगम यांच्या आठवणी मध्ये भव्य थडगे बांधण्याचा आदेश दिला.
ताजमहाल हे जगातील अत्यंत महान आणि लोकप्रिय स्मारक आहे. ज्याला जगातील सात आश्चर्यांमध्ये स्थान मिळाले आहे. हे ताजमहाल मोगल सम्राट शहाजहान चे त्यांच्या पत्नीवर असलेल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून देखील ओळखले जाते.
पांढऱ्या संगमरवरी आणि ताजमहालच्या कोरलेल्या महागड्या दगडांचा वापर अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे. मोघल सम्राट शहाजहान याने ताजमहल ला त्याची प्रिय मृत पत्नी मुमताज बेगम यांना भेट म्हणून दिले होते.
जगातील सर्वोत्कृष्ट कारागिरांना शहाजहानने बोलावून ताजमहालच्या इमारतीच्या डिझाईनची निर्मिती करण्यासाठी बोलावले. सुमारे वीस हजारो कारागिरांनी मिळून ताजमहालची बांधणी केली. संपूर्ण ताजमहल चे बांधकाम व बांधून होण्यासाठी 22 वर्षाचा काळ लागला होता. व 1653 मध्ये संपून ताजमहाल बांधून झाला. ताजमहालच्या कोपऱ्यामध्ये चार आश्चर्यकारक खांब आहेत. भविष्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून ताजमहालचे संरक्षण व्हावे यासाठी ताजमहालची बांधणी खूपच सुंदर आणि किंचित बाह्य स्वरूपात डिझाईन केलेले आहे.
ताज महाल चार उंच उंच मिनार यांनी घेरलेला आहे. पाणिया मिनार यांच्या मधोमध प्रेमाचा प्रतीक असलेला अतिशय सुंदर ताजमहाल उभारला आहे. ताज महाल तर सुंदर आहेच सोबतच ताजमहलच्या सभोवतालचा परिसर देखील खूपच सुंदर आहेत ताजमहालच्या समोर फुलांचा सुंदर बगीचा आहे. आणि एक लहानसे तलाव आहे या तलावांमध्ये ताजमहालचे संपूर्ण प्रतिबिंब जसेच्या तसे दिसते. फुलांच्या सुगंधामुळे ताजमहालाच्या अवतीभोवतीचे वातावरण नेहमी सुगंधित राहते. ताजमहालच्या भिंतीवर देखील अतिशय सुंदर कोरलेली डिझाईन आहे. पूर्णता सफेद पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बांधलेला हा ताजमहाल खूपच सुंदर दिसतो.
खरोखरच ताजमहाल हा सुंदरतेचा एक उत्कृष्ट नमुना आहे, म्हणूनच प्रत्येक जण ताजमहाला बघून त्याचे कौतुक करतो.
ताजमहालची बांधणी पूर्णता पांढऱ्या संगमरवरी दगडाने केली असल्याने संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्यकिरण ताजमहाल वरती पडतात तेव्हा ताजमहाल स्वरूप हे हलक्या गुलाबी रंगाचे दिसते. रात्री ताजमहाल चांदण्या मध्ये आणि चंद्राच्या रोशनाई मध्ये अधिकच सुंदर दिसतो.
म्हणूनच ताजमहाला 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात पैकी एक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ताजमहालच्या आभार सौंदर्यामुळे आणि त्याच्या बांधणीमुळे ताजमहालचा समावेश हा जगातील सात आश्चर्यांमध्ये करण्यात आला. ताजमहाल मधील शहाजहान आणि मुमताज बेगम यांच्या कबरी आहेत. ताजमहाल हा शहाजहान आणि मुमताज बेगम यांच्या प्रेमाची निशाणी आहे आणि ती आजतागायत अजरामर आहे.
ताजमहाल पाहण्यासाठी आणि ताजमहालचे सौंदर्य डोळ्यात टिपण्यासाठी जगभरातून अनेक लोक ताजमहाला भेट देतात. ताजमहालच्या सौंदर्याचे गुणगान गातात.
म्हणून मी देखील जेव्हा ताज महाल पाहिला तेव्हापासून आज पर्यंत ताजमहल चे सौंदर्य माझ्या डोळ्यांमध्ये सामावले आहे. व मी देखील ताजमहल च्या प्रेमात पडलो.
ताज महाल वर मराठी निबंध । Taj Mahal Essay in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझे आवडते ठिकाण मराठी निबंध । My Favourite Place Essay in Marathi
- माझा आवडता प्राणी ससा । My Favourite Animal Rabbit Essay in Marathi
- माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi
- राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध । Essay On My National Bird Peacock In Marathi
- मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी । Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi