माझा गाव निबंध मराठी । Maze Gav Marathi Nibandh

माझा गाव निबंध मराठी । Maze Gav Marathi Nibandh

माझ्या गावाचे नाव आदर्शपुर आहे. आदर्श पुर हे महाराष्ट्र राज्यातील डोंगरावर परदेशामध्ये वसलेले आहे. नावाप्रमाणेच माझे गाव हे महाराष्ट्र राज्यात इतर गावांसाठी एक आदर्श आहे. रामधून गोमती नदी वाहत असल्याने माझ्या गावाला जलाशयाचा भरपूर साठा लाभला आहे.

गावाला जलाशयाचा साठा असल्याने माझ्या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. त्यासोबतच मेंढी पालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुट व्यवसाय, मत्स्य पालन इत्यादी जोडव्यवसाय देखील माझ्या गावातील व्यक्ती करतात.

माझा गाव निबंध मराठी । Maze Gav Marathi Nibandh

माझ्या गावा मध्ये गावाच्या अगदी मध्यभागी तुकाई देवीचे एक मोठे मंदिर आहे.

माझ्या गावाला चारही बाजूने लहान-मोठ्या डोंगरदऱ्यांनी घेरले आहे त्यामुळे माझ्या गावाला निसर्गाचा मोठा वारसा लाभला आहे. तसेच गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लहान मोठी वृक्ष आहेत त्यामुळे गावाचा पर्यावरण हा हिरवळ आणि आनंदमयी वाटतो.

तसेच माझ्या गावांमध्ये वर्षातून एक वेळेस आषाढ महिना मध्ये गावाची कुलदैवत असलेली देवी म्हणजेच तुकाई देवीची जत्रा असते. या जत्रेला गावातील सर्व नागरिक एकत्र येतात. गावातील सर्व नागरिक मिळून मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने या जत्रेचा आनंद घेतात. गावातून स्थलांतरित झालेले किंवा कामासाठी, नोकरीसाठी शहरांमध्ये जाऊन राहिलेले लोक देखील देवीच्या या कार्यक्रमाला गावा मध्ये उपस्थित राहतात.

माझा गाव अतिशय सुंदर आहे. गावांमध्ये सर्वांना घरोघरी पिण्याच्या पाण्याची सुविधा गावाच्या ग्रामपंचायत द्वारे करण्यात आली आहे. त्यासाठी एक मोठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. माझ्या गावाचा विकास करण्याच्या हेतूने गावाच्या ग्रामपंचायत मध्ये महिन्यातून एकदा ग्रामसभेचे आयोजन केले जाते. या सभेमध्ये गावातील सर्व नागरिक उपस्थित असणे अनिवार्य आहे.

माझ्या गावांमध्ये हिंदू , मुस्लिम सिख, ईसाई अशा सर्व जातीचे लोक एकत्र राहतात. परंतु माझ्या गावातील एकही नागरिक गावांमध्ये जातीपातीत असा भेदभाव करत नाही सर्वजण मिळून गुण्यागोविंदाने राहतात.

माझ्या गावामध्ये सर्व धर्माचे सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने एकत्र म्हणून साजरे केले जातात त्यामुळे एखाद्या धर्माचा सण येतात आमच्या गावांमध्ये जणू जत्राच जमली आहे असे वाटते.

Majhe Gaon Nibandh माझ्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून दहावीपर्यंत शाळेची सोय आहे. तसेच गावामध्ये मेडिकल आहे, पोस्ट ऑफिस देखील आहे. तसेच गावाच्या आजूबाजूला तालुका आणि जिल्ह्याला जोडण्यासाठी बस सेवा देखील पुरविण्यात आली आहे. तसेच गावामध्ये आठवड्यातून एकदा म्हणजे दर बुधवारी गावची बाजार या बाजारामध्ये जीवनावश्यक सर्व गोष्टी सहज रित्या उपलब्ध होतात त्यामुळे गावातील सर्व व्यक्तींना आवश्यक त्या त्या वस्तू खरेदी करण्यासाठी इतर शहरांमध्ये जाण्याची आवशक्यता नाही. सर्व वस्तू गावामध्येच उपलब्ध आहेत.

आजच्या आधुनिक काळात माझ्या गावांमध्ये डिजिटल ग्रामपंचायत देखील काही दिवसांमध्येच तयार होणार आहे. त्यामुळे माझ्या आदर्श गावाच्या विकासामध्ये आणखीनच भर पडेल. तसेच माझ्या गावांमध्ये इ सेवा केंद्र, स्वस्त धान्य दुकान, बायकांसाठी वेगवेगळी दुकाने उभारण्यात आली आहे. म्हणून गावातीलच लोकांना व्यवसायाची सुवर्णसंधी प्राप्त झाली.

तसेच तुमच्या गावाच्या वेशीजवळ रामुकाका चे मोठे हॉटेल आहे. रामुकाका च्या या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. त्यामुळे रामुकाका च्या दुकानात सतत गर्दी पाहायला मिळते.

तसेच माझ्या आदर्शगावामध्ये महिलांसाठी बचत गटाची स्थापना देखील करण्यात आली आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या प्रत्येक आयोजनाचा पुरेपूर लाभ व्हावा याकडे गावाची ग्रामपंचायत विशेष लक्ष देते.

आणि ज्या विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे अशा विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कडून वही, पुस्तक, पेन, गणवेश या सर्व वस्तूंची वाटप केले जाते. गावातील सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाचा लाभ घेता यावा क्या कडे विशेष लक्ष दिले जाते.

त्यामुळे आमच्या गावातून बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांनी शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतली आहे. गावातील काही विद्यार्थी डॉक्टर ,इंजिनिअर, वकील , शिक्षक अशा मोठमोठ्या पदांवर गेले आहेत.

माझ्या आदर्शपूर गावामध्ये वेगवेगळ्या शिबिर आयोजित केले जाते. माझ्या गावामध्ये वर्षातून दोन वेळा रक्तदान आणि श्रमदान शिबिराचे आयोजन केले जाते तसेच काही वेळा अन्नदान देखील केले जाते.

झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छ भारत अभियान, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, अंधश्रद्धा निर्मूलन अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून गावांमध्ये जनजागृती केली जाते.

त्याच बरोबर आपल्या देशासाठी प्राण देणार्‍या महान पुरुषांच्या जयंती देखील मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केल्या जातात.

माझ्या गाव जरी ग्रामीण भाग असला तरी माझ्या गावाचा विकास हा मोठ्या शहरांच्या बरोबरीने झाला आहे. गावामध्ये प्रत्येक व सोयीसुविधा शहरी भागाप्रमाणे पाहायला मिळते.

माझ्या गावा मधील वृद्ध आणि वयस्कर मंडळी वेळ गावांमध्ये भजन, कीर्तन, पारायण व सप्ताह अशाप्रकारे देवांच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते.

माझ्या गावांमध्ये मीच पुरवठा देखील 24 तास असतो परंतु गावातील लोक गरज असेल तेव्हाच विजेचा वापर करतात.

गावाची एवढी प्रगती बघून माझ्या आदर्शपूर गावाला निर्मल गाव आणि आदर्श गाव असा दोन पुरस्कार देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील हजारो गावांमध्ये केवळ माझीच गाव आदर्श गाव आणि निर्मल गाव ठरले याचा मला खूप अभिमान वाटतो.

मी आदर्श पूर गावाचा एक नागरिक आहे त्याच्या मला अभिमान आहे. अशाप्रकारे माझे आदर्श पूर गाव एका सुंदर आणि प्रगतशील गाव आहे.

माझा गाव निबंध मराठी । Maze Gav Marathi Nibandh । Majhe Gaon Nibandh in Marathi  हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Comment