माझा आवडता छंद निबंध मराठी । Maza Avadta Chand Essay in Marathi

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नवनवीन गोष्टी किंवा कौशल्य शिकायला आवडत असतात. आपली आवड जपणे यालाच छंद जपणे असे म्हणतात. छंद हा मनाला आनंद मिळवण्यासाठी जोपासला जातो. छंद जोपासल्या ने कामात उत्साह वाढतो. आपले मन आनंदी राहते म्हणून जीवनात आलेला प्रत्येक व्यक्ती आपला कुठला ना कुठला छंद नक्कीच जोपासत असतो. प्रत्येकाच्या आवडी निवडी प्रमाणे प्रत्येकाचा छंद देखील वेगवेगळा असतो. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे मला खेळण्यांमध्ये अधिक रस आहे. फक्त बघायला आवडत नसून क्रिकेट खेळणे हा माझा छंद आहे.

माझा आवडता छंद निबंध मराठी । Maza Avadta Chand Essay in Marathi

लहानपणापासूनच आमच्या घरामध्ये क्रिकेट हा खेळ सर्वांनाच आवडतो. माझे आजोबा आणि बाबा नेहमीच टीव्हीवरील क्रिकेटच्या मॅचेस पहात असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने घरामध्ये नेहमीच टीव्हीवर चालू असतात. त्यातल्या त्यात world cup जेव्हा सुरू होतो तेव्हा आमच्या घरामध्ये एखाद्या सणासारखे वातावरण असते.

त्यामुळे क्रिकेट हा शब्द लहानपणापासूनच माझ्या कानावर पडत होता. सुरुवातीला मला क्रिकेट या खेळा बद्दल जराही माहिती नव्हती. तरीसुद्धा मी आजोबा आणि बाबांसोबत घरामध्ये क्रिकेट पाहत होतो. मग हळूहळू मला क्रिकेट खेळा बद्दल थोडेफार समजू लागले. व मी देखील सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अभ्यासाव्यतिरिक्त क्रिकेट खेळायला वेळ देऊ लागलो.

पाहता पाहता क्रिकेट हा खेळ माझा आवडता खेळ बनला व मी छंद म्हणून क्रिकेट या खेळाची जोपासना करू लागलो.

आज आपल्या भारत देशामध्ये देखील क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते. मी देखील रोज सायंकाळी माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर जातो. क्रिकेट खेळामध्ये दोन संघ असतात प्रत्येकी संघामध्ये अकरा- अकरा असे खेळाडू असतात. माझ्या शाळेतील सर्व मित्र मिळून आम्ही रोज क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर जातो, आणि सर्वजण मिळून हा क्रिकेट खेळतो.

माझ्या घरांमध्ये सर्वांनाच क्रिकेट हा खेळ आवडत असल्याने माझ्या या छंदाबद्दल आणि क्रिकेट खेळण्याच्या आवडीसाठी मला कधी कोणीही आडवले नाही. उलट बाबांनी माझ्यातील क्रिकेट खेळण्याची आवड पाहून मला एक नवीन ball आणि bat आणून दिली तसेच आजोबांनी क्रिकेट खेळासाठी लागणारे इतर सामान म्हणजेच glubes, stumps, pads, helmet देखील आणून दिले.

कारण आजोबा आणि बाबा या दोघांनाही वाटते की मी चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळावे. परंतु माझ्या आईला वाटते की मी चांगल्या प्रकारे अभ्यास करावा. दोघांच्याही इच्छांचा मान राखण्यासाठी मी अभ्यास करून राहिलेल्या वेळेमध्ये क्रिकेट खेळतो. त्यामुळे आई आणि बाबा दोघेही खूष होतात.

कधीकधी वेळ नसेल किंवा बाहेर पाऊस चालू असेल अशा वेळी मी झालेल्या क्रिकेटच्या मॅचेस टीव्हीवर पाहत असतो.

मला सचिन तेंडुलकर हा क्रिकेटर खूप आवडतो. म्हणून मी सचिन तेंडुलकर सारखेच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. क्रिकेट खेळल्याणे माझा सर्वात थकवा कमी होतो.

माझा आवडता छंद क्रिकेट असल्याने मला क्रिकेट खेळल्याने खूप खूप आनंद मिळतो!!!

कधी कुठल्या गोष्टीमुळे दुःख झाले, कुठल्या कामात माझे मन रमत नसते अशा वेळी मी क्रिकेट खेळायला जातो आणि क्रिकेट खेळून झाल्यानंतर माझा सारा थकवा आणि दुःख नाहीसे होते. याशिवाय शरीरामध्ये तंदुरुस्ती आणि स्पूर्थी वाढते, वा संपूर्ण शरीराचा व्यायाम देखील होतो. रोग प्रतिकार शक्ती वाढते. क्रिकेट खेळल्याने एकाग्रता वाढण्यास देखील मदत होते. एवढे सगळे फायदे मला क्रिकेट खेळल्याने होता त्यामुळे क्रिकेट खेळणे हा माझा छंद मी नेहमीच जोपासत असतो.

क्रिकेट या खेळाचे विविध फायदे असल्याने मला क्रिकेट खेळले खूप आवडते. अलीकडे टीव्ही वर येणाऱ्या अंतराष्ट्रीय मॅचेस, world cup आणि आयपीएल मॅचेस यामुळे वर्तमान काळा मधील तरुण पिढीला क्रिकेटची वेड लागले आहे.

मी देखील दरवर्षी आयपीएलच्या मॅचेस केव्हा चालू होतात त्याची आतुरतेने वाट पाहत असतो.

आयपीएल मधील मुंबई इंडियन्स ही माझी आवडती टीम आहे, त्यामुळे दर वर्षी मी मुंबई इंडियन्स टीमला सपोर्ट करतो.

लहान मोठ्या पासून बायकां पर्यंत सर्वांनाच आवडणारा क्रिकेट हा खेळ माझा आवडता छंद आहे. म्हणून मिळालेल्या वेळेमध्ये मी क्रिकेट खेळून माझ्या आवडता छंदाची जोपासना करतो.

पण अलीकडे वाढत्या ताणतणावांमुळे, अभ्यासाच्या ओझ्यामुळे, मला क्रिकेट खेळण्यासाठी आणि माझा छंद जोपासण्यासाठी पुरेसी वेळ मिळत नाही. त्यामुळे क्रिकेट खेळापासून माझे दुर्लक्ष होत आहे. परीक्षांच्या तलावामुळे सतत अभ्यासात मग्न रहावे लागते. परंतु माझ्या परीक्षा संपताच मी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर जाईन व क्रिकेट खेळेल.

क्रिकेट खेळणे हा माझा आवडता छंद आहे व मी माझ्या आवडत्या छंदाची नक्कीच जोपासना करेल.

भविष्यात मी नक्कीच एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होण्यासाठी प्रयत्न करेल. त्यासाठी मिळालेल्या वेळेत क्रिकेट खेळणे. टीव्हीवर किंवा मोबाईल च्या मदतीने मी क्रिकेट खेळाच्या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेईल.

असा हा माझा आवडता छंद क्रिकेट आहे व मी माझ्या छंदाची जोपासना करेल.

माझा आवडता छंद निबंध मराठी । Maza Avadta Chand Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *