माझा आवडता पक्षी मोर । Marathi Nibandh on My favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर । Marathi Nibandh on My favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर । Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

मित्रांनो, आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी माझा आवडता पक्षी मोर या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो.

माझा आवडता पक्षी मोर । Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

मित्रांनो आपल्या निसर्गामध्ये विविध सुंदर गोष्टी पाहायला मिळतात. या निसर्गामध्ये सुंदर-सुंदर पशुपक्षी आणि ठिकाणी आहेत जी मनुष्याला आकर्षित करतात. सुंदर दिसायला गोष्टी सर्वांनाच आवडत असतात. त्याप्रमाणेच या निसर्गाने आपल्याला दिलेली सुंदर देणगी म्हणजे पक्षी होय.

आपल्या आसपास वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आढळतात. परंतु या सर्व पक्षांमध्ये माझा आवडता पक्षी मोर ( essay on May favorite bird peacock in Marathi) आहे.

मोर हा पक्षी दिसायला अतिशय सुंदर असतो म्हणून मोराला सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. मोर पक्षाला पाहिले की, त्याला पाहातच राहावे असे वाटते म्हणून मोर हा माझा आवडता पक्षी आहे.

मोराला पाहताच माझे मन आनंदाने डोलू लागते. पिसारा फुलवून नृत्य करत असणारा मोर पाहणे म्हणजे जणू सौभाग्य!!

मोराला पक्षाला पाहिले की, माझ्या मनामध्ये “नाच रे मोरा…” ही कविता येते. सर्वप्रथम मोर हा पक्षी मी चित्रांमध्ये पाहिला होता, चित्रांमध्ये मोराचे सौंदर्य इतके आकर्षित वाटले की तेव्हापासून माझा आवडता पक्षी मोर आहे. परंतु मोराला प्रत्यक्ष स्वरूपाने पाहणे देखील माझ्या नशिबामध्ये होता.

गेल्या वर्षी आमच्या शाळेची सहल मुंबई येथे असलेल्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आला भेट देण्यासाठी गेली होती. तेव्हा त्या संग्रहालयामध्ये मी विविध प्राणी आणि पक्षी पाहिले परंतु त्यातील सर्वात जास्त मला आवडला तो पक्षी म्हणजे मोर होय.

चित्रांमध्ये दिसणाऱ्या मोरा पेक्षा प्रत्यक्ष मोराचे सौंदर्य अधिकच सुंदर होते.

मोराची निळ्या रंगाची मान, वेगवेगळ्या रंगांनी बनलेला पिसारा, डोक्यावर असलेला तुरा यामुळे मोराची ऐट ही सर्व पक्षांमध्ये वेगळीच असते. मोराचे सौंदर्य हे सर्वांना भुलवणारे असते जो व्यक्ती मोराला पाहतो तो नक्कीच मोराचा प्रेमामध्ये पडतो.

मोर हा पक्षी सर्वांनाच आवडतो म्हणून एखाद्या कवीचे पहिली कविता आणि चित्र पहिले चित्र हे हमखास मोराचेच असते. याव्यतिरिक्त अनेक लेखकांनी मोराच्या सौंदर्यावर ती लेख लिखित लिहिलेली आहेत. तसेच मोराचे सौंदर्य पाहून मोरावर बरे ची गाणी देखील प्रसिद्ध आहेत हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील आपल्याला मोर पक्षावर गाणी ऐकायला मिळतील. मोराच्या या सौंदर्यामुळे आणि रुबाबा मुळे मोराला “भारताचा राष्ट्रीय पक्षी” होण्याचा मान मिळाला आहे.

मोर या पक्षाचा उल्लेख प्राचीन काळापासून पहायला मिळतो. प्राचीन काळाच्या काही सापडलेल्या भिंतीवरती आणि दगडांवर ती आपल्याला मोराचे छायाचित्र पाहायला मिळते तसेच प्राचीन काळातील राजे आणि महाराजे यांना बसण्यासाठी आसन हे मोराच्या छायाचित्राचे असायचे. तसेच सम्राट मौर्य यांच्या काळामधील नाण्यांवर देखील मोराचे छायाचित्र आढळते.

तसेच मोर या पक्षाला धार्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे. मोर हे विद्येची माता सरस्वतीचे वाहन असून कार्तिके स्वामीचे देखील वाहन आहे. तसेच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या डोक्यावर असलेले पीस देखील मोराचे पीस आहे ज्याला मोरपिस म्हणतात‌. हिंदू संस्कृती मध्ये मोराचे पूजा केली जाते. म्हणून काही लोकांचा असा समज आहे की मोराची पिसे घराच्या देवघरात ठेवलास घरामध्ये नकारात्मक शक्ती वास करत नाही.

मोर हा सुंदर आहेच सोबतच तो शेतकऱ्यांचा मित्र देखील आहे.मोर शेत नस करणारे उपद्र्वि प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना तो खातो व शेताची रक्षा करतो. मोर असल्याने बोगांची तसेच वनांची शोभा वाढवतो. म्हणूनच सजावटीमध्ये आणि डेकोरेशन मध्ये मोरांच्या छायाचित्राचा वापर केला जातो.

मोरया पक्षाचे मुख्य आकर्षक म्हणजे पाऊस पडताना मोर आपली पिसारे फुलवून नृत्य करतो. मोराचे नृत्य पाहण्यासाठी काही लोक हमखास ज्या ठिकाणी मोर आढळतात अशा ठिकाणाला भेट देतात.

खारोखराच मोर हा पक्षी दिसायला खूपच सुंदर असतो मोराला इंद्रधनुष्याचे दुसरे रूप मानले तरी चुकीचे ठरणार नाही, कारण मोर देखील इंद्रधनुषा प्रमाणे सप्तरंगी असतो.

मोराचे हे सुंदर रूप आणि महत्व पाहून मोर हा पक्षी मला खूप खूप आवडतो!!!

म्हणून माझा आवडता पक्षी मोर आहे.


 हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *