केसर खाण्याचे फायदे आणि संपूर्ण माहिती । Kesar Benefits in Marathi
मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी “केसर खाण्याचे फायदे आणि संपूर्ण माहिती” सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
केसर खाण्याचे फायदे आणि संपूर्ण माहिती । Kesar Benefits in Marathi
मित्रांनो तुम्ही केसर बद्दल नक्कीच ऐकले असेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांनी केसर बद्दल केवळ ऐकले असेल किंवा एखाद्या चित्रांमध्ये किंवा पिक्चर मध्ये पाहिले असेल. केसर खूप महाग असते म्हणून सर्वसामान्य व्यक्तींसाठी केसर घेणे शक्य नाही.
केसर चा समावेश व मसाल्याच्या पदार्थांमध्ये केला जातो. तर काही जण केसरला ड्रायफ्रूट असे देखील म्हणतात. काहींच्या मते केसर हे औषधीय गुणधर्म असलेला पदार्थ आहे. अशाप्रकारे प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार केसर हा वेगवेगळ्या गटांमध्ये मोडला जातो.
परंतु केसर मध्ये आढळून येणारे पोषक तत्व आणि औषधीय गुणामुळे वेगवेगळ्या आजारांवर केसरचा वापर केला जातो. केसर ते साफरोन नावाच्या फुला मध्ये येणारे
केसर असते दिसायला लाल आणि चॉकलेटी रंगाचे असून लांब तंतू प्रमाणे दिसते.
केसर चे आपल्या आरोग्यावर वेगवेगळे फायदे होतात व त्यातील काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
केसर म्हणजे काय? What is Saffron in Marathi
केशरला इंग्रजी मध्ये saffron असे म्हणतात.केशर हे गवत वर्गीय पिक असून या पिकास समुद्रसपाटी पासून २००० ते २५०० मीटर उंचीचा थंड बर्फाळ हवामानाचा प्रदेश आवश्यक असून पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी असते.
केसर हे मुख्यता हिमालय प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उगवले जाते. Saffron नावाच्या एका फुलांमध्ये केसरचा केवळ एक ते दोन लांब तंतू असतात. त्यामुळे जेव्हा 75,000 सॅफ्रॉन ची फुले एकत्रित केल्याने त्यातून केवळ एक kilo केसर मिळते. म्हणून बाजारपेठेमध्ये केसर च्या किमती खूप आहेत. एक ग्राम के सर तीनशे ते साडेतीनशे रुपयाला मिळते यावरूनच तुम्हाला कळेल की केसर किती महाग आहेत.
केशर हे मनास व बुद्धीस उत्तेजन आणणारे असून केशरमुळे मनोविकार, ताणतणाव कमी होऊन मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवते. त्यामुळेच मित्रांनो आपण बहुतांश वेळा पाहिले असेल की गर्भवती महिला या केसर चे सेवन करता कारण गरोदर महिलांच्या पोटातील बाळाच्या वाढीसाठीही केशर उपयोगी आहे. तसेच स्तनदा मातेचे दुधही केशरमुळे वाढण्यास मदत होते. केशर मुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. त्यामुळे बर्याचशा महिलांचा असा समज आहे की केसर खाल्ल्याने गोरा रंग प्राप्त होतो. त्यामुळे गर्भवती महिला आपल्या नवजात बाळाला गोरा रंग मिळावा म्हणून केसर चे सेवन करता.
केशर हे वात क्षामक असून केशर हे प्रकृतीने उष्ण असल्याने दुधाबरोबर केशर घेतांनी दोन ते तीन काड्या घेतल्या तरी पुरेशा ठरतात. आयुर्वेदानुसार केशरचे रोज सेवन करावे.
केशर मधील पोषण गुणधर्म (Nutrition Values in Keshar in Marathi) :
मित्रांनो केसर चे फायदे जाणून घेण्यापूर्वी आपण केसर मध्ये कोण कोणते औषधी गुणधर्म आणि पोषक तत्व आढळतात हे पाहूया.
प्रत्येकी 100 ग्रॅम केशर मध्ये पुढील प्रमाणे पोषण मूल्य आढळतात.
अनुक्रमणिका | पोषक घटक | पोषक तत्व मात्रा |
1. | कॅलरी | 310 |
2. | टोटल फॅट | 6 ग्रॅम |
3. | कोलेस्ट्रॉल | 0 मिलिग्रॅम |
4. | प्रोटीन | 11 ग्रॅम |
5. | सोडियम | 148 मिलिग्रॅम |
6. | कार्बोहायड्रेट | 65 ग्रॅम |
7. | पोटॅशियम | 1724 |
केसर खाण्याचे फायदे आणि माहिती । Kesar Khanyache Fayade
मित्रांनो नियमित केसाचे सेवन केल्यास आपल्याला वेगवेगळे फायदे होऊ शकतात. केसर खाण्याचे काही महत्त्वपूर्ण फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे :
1. बुद्धीचा विकास होण्यासाठी :
बुद्धीचा विकास होण्यासाठी केसर खूप महत्त्वाचे ठरते. बुद्धीचा विकास होण्यासाठी केसर मध्ये आवश्यक तेथे सर्व गुणधर्म आढळतात त्यामुळे लहान मुलांना केसर खाण्यास दिल्यास त्यांच्या बुद्धीला चालना मिळून बुद्धीचा विकास होतो.
2. ताण तणाव कमी करण्यासाठी :
केसर ताणतणाव कमी करून बुद्धीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे जर आपल्याला ताण-तणाव आल्यासारखे वाटत असेल तर दुधामध्ये केसर चे काही तंतू घालून ते दूध पिल्यास ताण-तणाव कमी होऊन फ्रेश वाटते.
3. डोकेदुखी दूर करण्यासाठी :
जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर, गाईच्या तुपात केशर खलून त्यांत बदाम उगाळून त्या गंधाचे नस्य करावे. कापूर व चंदन उगाळून त्यात केशर खलून मस्तकावर लेप केला असता डोकेदुखी तुरंत थांबते.
4. गर्भवती महिलांसाठी केसर फायदेशीर :
गर्भवती महिला ने गर्भावस्था मध्ये केसाचे नियमित सेवन केल्यास बाळाच्या वाढीसाठी फायदा होतो.
5. स्तनात दूध वाढीसाठी :
स्तनदा मातेच्या स्तनातील दूध वाढीसाठी केसर खूप फायद्याचे ठरते. त्यासाठी केसर दुधात घालून त्याचा लेप स्तनावर लावल्यास किंवा केसर चे सेवन केल्यास स्थनात दूध वाढण्यास मदत होते.
6. मोतीबिंदू दूर करण्यासाठी :
बहुतांशी वयस्कर व्यक्तींमध्ये मोतिबिंदू हा आजार पाहायला मिळतो. या आजारावर मात देण्यासाठी घरगुती उपाय घरगुती उपाय म्हणजे एक चमचा मधामध्ये केसर घालून रोज सेवन केल्यास मोतिबिंदू दूर करण्यास मदत होते.
7. जंत दूर करण्यासाठी :
लहान मुलांमध्ये नेहमीच जंतच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी लहान मुलांना समभाग केशर व कापूर घेऊन १ चमचा मधात खलून हे मिश्रण रोज सकाळी साठवण्यास द्यावे.
8. रक्तपित्ता वर आराम :
रक्तपित्त असलेल्या व्यक्तीने केसर बकरीच्या दुधामध्ये शिजवून ते दूध पिल्याने आराम मिळतो.
9. लहान मुलांचे सर्दी पडसे :
लहान मुलांमध्ये सर्दी आणि पडस यांसारख्या समस्या असल्यास १ चमचाभर दूधात केशराच्या २ काड्या खलून ते दूध पाजावे व थोड्या दुधाचा छातीवर व कपाळावर हात चोळावा.
केशर खूप महाग का असते? (Why Keshar is Expensive in Marathi)
मित्रांनो तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, केसर खूप महाग का असते | why keshar is expensive in Marathi?
जगातील सगळ्यात जास्त महाग मसाला म्हणून केशर ला ओळखले जाते. त्यामुळे बहुतांश जण केसरला खरेदी करणेदेखील शक्य समजत नाहीत कारण
प्रत्येक केशरच्या फुलामध्ये फक्त तीन पुंकेशर असतात. हे पुंकेशर Saffron या फुलापासून वेगळे झाल्यावर त्यांचा रंग आणि चव टिकवण्यासाठी ते वाळवले जातात. त्यासोबतच साफरोन या फुलाची शेती केवळ हिमालयीन भागांमध्ये केली जाते.
सॅफ्रॉन या फुलांचा इतका छोटा भाग केसर बनवण्यासाठी वापरला जात असल्याने, 1 किलो केशर तयार करण्यासाठी 75,000 saffron ची फुले वापरली जातात. आणि या फुलांमधून केसर चे तंतू वेगळे करण्यासाठी कुठलीही मशीन वापरली जात नाही. केसर चे तंतू वेगळे करण्यासाठी मनुष्यबळ वापरले जाते आणि हेच कारण आहे ज्यामुळे बाजारपेठेत केसर खूप महाग मिळते.
केसर खाण्याचे फायदे आणि संपूर्ण माहिती । Kesar Benefits in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- बोटांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये । Finger Names in Marathi
- Ved in Marathi । वेदांची माहिती मराठी । Ved Information in Marathi
- भाऊबीज वर मराठी निबंध । Essay on Bhaubeej in Marathi । Bhaubeej Essay in Marathi
- झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi
- माझा आवडता छंद निबंध मराठी । Maza Avadta Chand Essay in Marathi
Very good information