बाल दिवस निबंध मराठी । Bal Diwas Essay in Marathi
दरवर्षी आपल्या भारत देशामध्ये 14 नोव्हेंबर हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने “बालदिवस किंवा बालक दिवस” यांना या नावाने साजरा केला जातो. बालक दिवसा हा संपूर्ण देशातील शाळा, विद्यालय, महाविद्यालयांमधील सर्व विद्यार्थी मिळवण्यात मोठ्या आनंदाने साजरा करतात.
संपूर्ण जगभरामध्ये 1925 पासून बालक दिवस हा साजरा करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने मात्र 20 नोव्हेंबर 1954 ला बाल दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आज विविध देशांमध्ये विविध तारखेला बालक दिवस साजरा केला जातो.
बाल दिवस निबंध मराठी । Bal Diwas Essay in Marathi
मात्र आपल्या भारत देशामध्ये 14 नोव्हेंबर या दिवशी बालक दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी संपूर्ण भारतातून लहान मुलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, आणि मुले देखील अगदी आनंदा मध्ये सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन बाल दिवस साजरा करण्यास मदत करतात.
मुलांचे हक्क आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल जागरुकता करण्यासाठी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिवशी भारतात बालक दिवस किंवा बाल दिन साजरा केला जातो.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना मुले खूप आवडत होती व ते मुलांवर खूप प्रेम करत होते. तसेच जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या भारत देशासाठी अनेक महान कार्य केले. त्यांच्या या आठवणीत जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिना दिवशी बालक दिवस साजरा केला जातो.व जवाहरलाल नेहरू यांच्या कर्तुत्वा साठी आभार मानले जातात. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर या दिवशी संपूर्ण भारतातून बालक दिवस साजरा केला जातो.
मित्रांनो आपण सर्वांना माहितीच आहे की मुले ही आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. म्हणून प्रत्येक मुलाला प्रेम देऊन त्यांना त्यांच्या हक्काची आणि शिक्षणाची जाणीव करून देणे खूप गरजेचे आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांवर खूप प्रेम होते. ते नेहमी मुलांमध्ये राहायचे, मुलांशी गप्पा गोष्टी करायचे, विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवरचे प्रेम पाहून त्यांना “चाचा नेहरू” या नावाने देखील ओळखले जाऊ लागले.
जवाहरलाल नेहरू यांच्या मते, मुलेही देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. मुलांच्या भविष्यावर आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे, हे पंडित नेहरू यांना ठाऊक होते.
ते नेहमी म्हणत, ” जर आपल्या देशातील मुले कमकुवत, गरीब आणि अनारोग्यीपणे विकसित झाली तर आपल्या देशाचा विकास होणे अशक्य आहे.” त्यामुळे त्यांनी देशांच्या मुलांच्या स्थितीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा जन्म दिवस बाल दिवसाच्या स्वरूपाने साजरा केला. त्यानंतर 1956 पासून दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बालक दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
लहान वयामध्ये देशातील सर्व मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर मुले भविष्यात होऊ शकतील, या विचाराने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या.
बाल दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात मुलांना त्यांच्या हक्काची, शिक्षणाची जाणीव करून देण्यात येते. त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. देशभरातील अनेक शाळांमध्ये या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
शाळेतील सर्व मुले मुली देखील या कार्यक्रमामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात. देशातील मुलांच्या वास्तविक स्थितीबद्दल, देशातील मुलांचे महत्व आणि या मुलांन द्वारे भविष्याचे बदलणारे चित्र आणि त्यांची स्थिती सुधारण्याकरिता दरवर्षी बाल दिवस साजरा करून मुलांना त्यांचे महत्त्व पटवून दिले जाते.
मुलांचा उत्साह हा मुलांना त्यांचे भविष्याबद्दल चे कर्तव्य आणि जबाबदारीबद्दल भविष्याचा विचार करायला भाग पाडते.
देशातील नागरिकांनी सुद्धा मुलांच्या भूतकाळातील स्थितीबद्दल जागरूक होणे आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विचार करणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक जण आपापल्या मुलांना स्वतःची जबाबदारी समजून सांगणे गरजेचे आहे. मुलांना योग्य मार्गाने चालण्याचे मार्गदर्शन प्रत्येक पालक करेल तेव्हा मुले आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य होणे शक्य होईल.
देशातील प्रत्येक नागरिकाला आणि पालकांना आपल्या मुलांची ही जबाबदारी कळावी म्हणून भारतात सर्वच ठिकाणी बाल दिवस हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शाळांमध्ये शारीरिक, मानसिक आणि नैतिक अशा सर्वच दृष्टीकोनातून आणि मुलांच्या आरोग्य संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मुलांना दिवसेंदिवस जागृत करण्यासाठी बालक दिवस हा उत्सव खूप फायद्याचा ठरत आहे.
फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील बहुतांश देशांमध्ये बालक दिवस साजरा केला जातो. परंतु प्रत्येक देशांमध्ये बालक दिवस साजरा करण्याच्या तारखा भिन्न आढळतात. त्यामुळे जगभरातील सर्वच बालकांच्या जागरूक करण्यासाठी बालक दिवस साजरा केला जातो.
म्हणून प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांबद्दल त्यांची जबाबदारी समजली पाहिजे. आणि बालक दिवस यार उत्साहाचे महत्व जाणून आपल्या मुलांना देखील बालक दिवसाचे महत्त्व आणि त्यांचे आपल्या देशासाठी चे कर्तव्य समजावून सांगितले पाहिजे.
बाल दिवस वर मराठी निबंध । Bal Diwas Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- भाऊबीज वर मराठी निबंध । Essay on Bhaubeej in Marathi । Bhaubeej Essay in Marathi
- झाडांची नावे मराठी मध्ये । Tree Name in Marathi
- माझा आवडता छंद निबंध मराठी । Maza Avadta Chand Essay in Marathi
- माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi
- मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Nibandh