Anxiety म्हणजे काय? । Anxiety Meaning in Marathi । Anxiety information in Marathi
नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी anxiety meaning in Marathi या विषयावर लेख घेऊन आलो.
आम्हाला अशा आहे की, Anxiety Meaning in Marathi हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.
Anxiety म्हणजे काय? । Anxiety Meaning in Marathi । Anxiety information in Marathi
मित्रांनो मनुष्य हा एकमेव असा सजीव आहे ज्याला भावना आहेत. सुख, दुःख, चांगला, वाईट ओळखण्याची क्षमता असणारा मनुष्य एकमेव जीव आहे. सोबतच मनुष्याला सर्वात बुद्धिमान व्यक्ती देखील म्हटले जाते. परंतु बुद्धिमान असणाऱ्या या मनुष्य प्राण्याला त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे आजार रोग महामारी त्यांना सामोरे जावे लागते.
मनुष्य आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे परंतु स्वतःला पूर्णतः निरोगी ठेवण्यामध्ये मनुष्य अपयशी ठरला. त्यामुळे आज वेगवेगळे आजार मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहेत. यांपैकी एक म्हणजे Anxiety होय.
100 मधील 30 टक्के लोकांना आज anxiety हा आजार पाहायला मिळतो. आपल्यातील बहुतांशजणांना anxiety याबद्दल जास्त काही माहिती नाही. त्यामुळे आपण देखील anxiety या आजाराने ग्रस्त आहोत की नाही हे ओळखणे कठीण आहे. म्हणून आजच्या anxiety meaning in Marathi आणि Anxiety information in Marathi या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला anxiety ला मराठी मध्ये काय म्हणतात, तसेच या संबंधित थोडी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला anxiety म्हणजे नक्की असते तरी काय हे कळेल.
Anxiety meaning in Marathi
मित्रांनो, Anxiety हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे जो सर्वसामान्य मनुष्यांमध्ये देखील पाहायला मिळते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी ना कधी अशी परिस्थिती निर्माण होत असते ज्यावेळी तो व्यक्ती अतिशय भायभीत किंवा चिंतित होतो. सर्वसामान्य जीवनापेक्षा वेगळ्याच टप्प्यामध्ये जाऊन पोहोचतो ज्या ठिकाणी केवळ चिंता, काळजी, भीती, निराशा असते. स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होतो. नकारात्मक विचार नाचायला लागतात. अतिशय चिंताजनक आणि भयभीत परिस्थिती निर्माण होते यालाच anxiety असे म्हणतात.
Anxiety म्हणजे चिंता, काळजी, भीती, कळकळ होय. हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला anxiety होत असते. तेव्हा त्याच्या हदयाची धडधड वाढलेली असते. अचानक हृदयाचे ठोके वाढतात. हृदय मोठमोठ्याने धडकू लागते. पीडित व्यक्तीला असे वाटु लागते की माझं हृदय बाहेर येऊ लागेल. इतक्या जोरजोरात त्याच्या हदयाचे ठोके चालू लागतात. ही ठोक्यांचा आवाज बाहेरपर्यंत येऊ लागतो. अशाच परिस्थितीला anxiety असे म्हटले जाते.
Anxiety म्हणजे काय?
मित्रांनो जसे की आम्ही सांगितले , anxiety हा एक प्रकारचा मानसिक रोग आहे.
Anxiety म्हणजे एक प्रकारची चिंता आणि भयभीत स्थिती होय. चिंता आणि भीतीच्या वातावरणात असताना काहीतरी वाईट होण्याची भीती तसेच शंका असणे, म्हणजे anxiety असणे होय.
पण खरे पाहायला गेले तर भीतीची आणि चिंतेची ही स्थिती वास्तविक परिस्थितीशी जराही जोडलेली नसते वास्तविक या चिंतेचे अस्तित्वच नसते. आपण येऊन वाढत गेलेली चिंता काळजी हे पुढे जाऊन anxiety चे स्वरूप घेते.
प्रत्येक मनुष्याला हे कशाचे ना कशाचे टेन्शन असते. प्रत्येकाला थोडी फार चिंता काळजी वाटते. कोणाला लग्नाची चिंता असते. कोणाला नोकरीची चिंता असते तर कोणाला अभ्यासाची चिंता असते. त्यामुळे थोडी फार चिंता होणे तसेच भीती वाटणे ह्या गोष्टी तर प्रत्येकाच्या आयुष्यात साहजिकच असतात, थोडीफार चिंता करणे हे आपल्या भविष्यासाठी , व्यक्तिमत्वासाठी गरजेचे असते परंतु जेव्हा ह्याच चिंतेचे प्रमाण वाढत जाते तेव्हाही चिंता विध्वंसक रूप घेते ज्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक, सामाजिक ,आर्थिक आणि शारीरिक जीवनावर होतो. म्हणजे आपल्याला वाटणारी भीती आणि चिंता anxiety हे रूप धारण करते. जे आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी अतिशय घातक देखील ठरू शकते.
Anxiety ची कारणे :
मित्रांनो, anxiety होण्याची वेगवेगळी कारणे आहेत ज्यातील काही आम्ही पुढील प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
१. सतत नकारात्मक विचार येणे :
नकारात्मकता हे देखील Anxiety होण्याचे एक कारण आहे. कारण सतत मनामध्ये नकारात्मक विचार येणे हे आपल्याला चिंता दायक वाटते. त्यामुळे आपण नेहमी त्याच गोष्टीचा विचार करतो. त्यामुळे आपल्याला काळजी आणि चिंता वाढते परिणामी आपण Anxiety या मानसिक आजाराला बळी पडतो.
२. भीती वाटणे अस्वस्थ वाटणे :
सतत कोणत्याही गोष्टीची भीती वाटणे स्वतःला अस्वस्थ समजणे हे देखील Anxiety चे कारण असू शकते.
३. स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होणे :
जीवनात आत्मविश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा आत्मविश्वास कमी होतो तेव्हा वेगवेगळे आजार शरीराला लागायला सुरुवात होते. जीवनामध्ये काही वेळा अशा गोष्टी घडत असतात ज्या गोष्टीमुळे आपला आत्मविश्वास ढासळतो. ज्यामुळे आपल्याला वाटू लागते की, आता सर्व काही संपले आहे आयुष्यात काहीच उरले नाही. मनावर दडपण येते आणि नैराश्य पसरते. नैराश्य हे देखील anxiety होण्याचे कारण आहे.
४. ताण तणाव वाढणे :
प्रत्येक व्यक्तीला हा कशाचा ना कशाचा ताण असतो. घरच्या आर्थिक परिस्थितीचे टेन्शन, पैशाचे टेन्शन, करिअरचे टेन्शन, नोकरीचे टेन्शन अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे डोक्यावर ताण येत जातो, परिणामी Anxiety सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
५. नेहमी चिंतेत राहणे :
चिंता हे Anxiety होण्याचे सर्वात मोठे कारण आहे नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता बाळगल्याने Anxiety होण्याची शक्यता आहे.
Anxiety वर उपाय :
मित्रांनो आजच्या Anxiety meaning in Marathi या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Anxiety संबंधित थोडक्यात माहिती सांगण्याचा पूर्णता प्रयत्न केला आहे सोबतच आम्ही Anxiety मात करण्यासाठी उपाय देखील सांगणार आहोत जे पुढील प्रमाणे आहेत-
१. नियमित व्यायाम करणे :
व्यायाम हे मनुष्यांसाठी एक प्रकारचे वरदानच आहे. व्यायाम केल्याने केवळ Anxiety वरच मात मिळवता येते असे नाही तर शरीराचे वेगवेगळे आजार देखील व्यायामामुळे दूर होतात त्यामुळे नियमित व्यायाम करणे हे मनुष्याला उप फायद्याचे ठरते.
२. वेळेवर जेवण करणे :
जेवणाची एक सुनिश्चित वेळ ठरवल्याने आपल्या मनावर त्याचा चांगला परिणाम होतो कारण नेहमी वेळेवर जेवण करणे आपल्या शरीराला चांगली सवय लावते. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते.
३. स्वतःला शांत ठेवता येईल अशी कृत्य करणे :
जर तुम्ही Anxiety या आजाराने ग्रस्त असाल तर तुम्ही स्वतःला शांत ठेवता येईल अशी काही कृत्य करणे गरजेचे आहे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला गाणे ऐकणे आवडत असेल, किंवा चित्र काढणे, वाचन करणे यांसारख्या एखादा कोणताही छंद जोपासला तर तुमचे मन शांत होईल तुमच्या मनामध्ये सतत विचार येणार नाहीत तुमची चिंता दूर होईल व Anxiety वर मात करण्यास मदत मिळेल.
४. स्वस्थ आहाराचे सेवन करणे :
बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या नेहमीच्या आहारा वर देखील अवलंबून असतात. स्वस्थ आहार केल्याने निरोगी होते मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. शरीर सुदृढ होते त्यामुळे वाईट विचार मनामध्ये येत नाही.