जीएसटी निबंध मराठी । GST Essay in Marathi

जीएसटी निबंध मराठी । GST Essay in Marathi

जीएसटी निबंध मराठी । GST Essay in Marathi

मित्रांनो, वर्तमान काळामध्ये तुम्ही बाजारपेठेमध्ये गेल्या असता आणि एखादी वस्तूची खरेदी केली असता तुमच्याकडून जीएसटी आकारली जाते. परंतु आपल्यातील बहुतांश जणांना हे माहितीच नाही की, GST म्हणजे काय? आपल्याकडून एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केल्यानंतर जीएसटी का आकारली जाते?

मित्रांनो, आजच्या जीएसटी निबंध मराठी या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जीएसटी वर निबंध तसेच जीएसटी म्हणजे काय? आणि जीएसटी च्या संबंधित संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

जीएसटी निबंध मराठी । GST Essay in Marathi

मित्रांनो, GST म्हणजेच goods and services Tax ज्याला मराठी भाषेमध्ये वस्तू आणि सेवा कर असे म्हणतात.

भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जीएसटी हा कर आकारला जात नव्हता परंतु अलीकडच्या काही काळामध्ये सर्व वस्तू आणि सेवा कर जीएसटी हा कर आकारण्यात येत आहे.

भारतामध्ये एक जुलै 2017 पासून जीएसटी हा कर लागू करण्यात आला. जीएसटी लागू करण्यामागे सरकारचा मुख्य हेतू असा होता की, संपूर्ण देशभरामध्ये एक्स मानकर प्रणाली आकारण्यात यावी. म्हणून देशामध्ये जीएसटी ची सुरुवात करण्यात आली.

ज्यावेळी भारता जीएसटी लागू करण्यात आली त्यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारे पूर्वी लागू असलेले सर्व कर रद्द करण्यात आले. आणि ही नवीन कर प्रणाली म्हणजेच जीएसटी संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आली ज्यावेळी जीएसटी लागू करायची होती त्यावेळी आपल्या भारताच्या राज्यघटनेतील काही कायदे दुरुस्त करून नवीन कायदे निर्माण करण्यात आले.

What is GST in Marathi । जीएसटी म्हणजे काय?

मित्रांनी जीएसटी म्हणजेच good and services Tax होय ज्याला मराठी भाषेमध्ये वस्तू आणि सेवा कर असे म्हणतात.

पूर्वी भारतामध्ये विविध पद्धती लागू होतात केंद्र शासनाची करप्रणाली वेगळी होती तर राज्य शासनाची देखील करप्रणाली वेगळी होती यामुळे सर्वसामान्य माणूस ओढला जात होता.

पूर्वीच्या काहीतर पद्धतीच्या सरकारसाठी फायदेशीर होत्या तर काही सर्वसामान्य माणसांसाठी. म्हणून पूर्वीच्या सर्व कर पद्धती बंद करून नवीन कर पद्धती सुरू करण्यात आली की ज्याला जीएसटी असे म्हणतात.

टॅक्स तज्ञांच्या मते या जीएसटी कर प्रणालीमुळे भारताची कर रचना सुधारण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

Gst हा एक अप्रत्यक्ष कर प्रकारामध्ये मोडतो. जीएसटी हा एक असा कर आहे जो वस्तू आणि सेवांवर आकारला जातो.

जेव्हा एखादी वस्तू तयार होते आणि ती सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचते तेव्हा त्या वस्तूला त्या वस्तूला विविध स्तरांना पार करत आपल्यापर्यंत पोहोचावे लागते. त्यामुळे त्या वस्तूच्या सुरुवातीच्या किमती पासून आपल्या पर्यंत पोहोचणारा किमतीमध्ये वाढ होते.

उदाहरणार्थ जेव्हा एखादी वस्तू फॅक्टरीमध्ये तयार होते, तेव्हा ती वेगवेगळ्या स्तरांना पार करीत आपल्यापर्यंत पोहोचते. फॅक्टरीमध्ये वस्तू बनवण्यासाठी अतिशय शुल्क किंमतीमध्ये कच्चामाल घेतला जातो व या मालावर प्रक्रिया करून कच्च्या मालाचे रूपांतर पक्या माला मध्ये केले जाते. पूर्णता तयार झालेल्या वस्तूवर व्हॅट आकारला जातो व तो होलसेल दरात विकला जातो. त्यानंतर होलसेल विक्रेते पुन्हा त्या वस्तूवर व्हॅट लावून किरकोळ दुकानदारांना विकतात आणि किरकोळ विक्रेता पुन्हा त्यावर व्हॅट लावून सर्वसामान्य व्यक्तीला विकतात.

यावरून आपल्या लक्षात येते की एखाद्या वस्तूच्या निर्मितीपासून ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्या वस्तूच्या किंमतीमध्ये वाढ झालेली असते. परंतु जीएसटी ही प्रत्येकच स्थरांवर लागू होते. त्यामुळे जीएसटी या कर प्रणाली मध्ये काही वस्तू आणि सेवांच्या किंमतीमध्ये वाढ होईल तर काही वस्तूंच्या किमती या कमी होतील. जीएसटी वर 5%, 12%, 18% आणि 28% अशा प्रकारे शुल्क आकारले जातात.

जीएसटी चे घटक :

जीएसटीचे मुख्यता तीन घटक आहेत जे पुढीलप्रमाणे आहेत-

  1. CGST- CGST म्हणजेच Central Goods and Service Tax होय. सी जीएसटी मध्ये केंद्राच्या सर्व संकल्पनांचा सामावेश होतो.
  2. SGST- SGST म्हणजेच State Goods and Service Tax होय. एस जी एस टी मध्ये सर्व कर आकारण्याची जबाबदारी हे त्या त्या राज्याची असते. या जीएसटी मध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही.
  3. IGST- IGST म्हणजेच Integrated Goods and Service Tax होय. आयजीएसटी मध्ये कर संकलन भारतीय संघराज्याच्या अखत्यारीत होते.

GST चे फायदे :

जीएसटी मुळे सर्वसामान्यांना म्हणजेच ग्राहकांना, व्यापाऱ्यांना आणि सरकारला फायदे झाले.

१. ग्राहकांना झालेले जीएसटी चे फायदे :

पूर्वी ग्राहकांना वेगवेगळे कर भरावे लागत होते. पण आता फक्त जीएसटी हा एकच कर भरावा लागतो त्यामुळे इतर कुठल्याही कराची चिंता ग्राहकांना राहिलेली नाही. एखाद्या वस्तू आणि सेवांची विक्री हा ग्राहक देशभरातील कोणत्याही ठिकाणी करत असला तरी त्याला समानच कर भरावा लागतो. जीएसटी मुळे वस्तू आणि सेवा च्या किमती कमी जास्त प्रमाणात फरक पडला आहे. परंतु जीएसटी 0-5% या श्रेणीत येणाऱ्या खाद्यपदार्थाच्या किमतीत घट झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्या वस्तू देणे सहज शक्य झाले आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू, शाम्पू, टिशू पेपर, साबण, टूथपेस्ट यांसारख्या वस्तू स्वस्त झाल्या.

२. व्यापार्‍यांना झालेले जीएसटी चे फायदे :

जीएसटीमुळे व्यापारांना देखील वेगवेगळे फायदे झाले. त्यातील मुख्य फायदा म्हणजे जीएसटी मुळे होणारी पारदर्शकता. यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसायाचा व्यवहार सुलभ झाला. तसेच जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना कर्ज घेणे सोपे झाले. आणि बहुतांश व्यापाऱ्यांचा बाजारपेठेमध्ये सहज प्रवेश झाला.

३. सरकारला झालेली जीएसटी चे फायदे :

जीएसटी मुळे ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना फायदा तर झाला सोबतच सरकारलादेखील जीएसटी चे वेगवेगळे फायदे झाले.

” एक राष्ट्र, एक कर” या उद्देशाने जीएसटी हा कर आकारण्यात आला. सामान्य आणि जबाबदार बाजारपेठ विदेशी गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होऊ लागली. विदेशी गुंतवणूक वाढल्यामुळे भारतीय उत्पादने आणि सेवा जगाच्या व्यासपीठावर पोहोचतील त्यामुळे आयात आणि निर्यात उद्योगाला चालना मिळेल, त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये अधिक व्यापार वाढेल.

GST चे परिणाम :

जीएसटी मुळे आपल्या बाजारपेठेत अल्पकाळासाठी काही परिणाम होतील. थोडक्‍यात अल्पावधीत साठी महागाई वाढेल. जीएसटी कर पाच टक्के आणि 18 टक्के कर सेवांसह सुरू होईल. जसे की, रेस्टॉरंट, चित्रपटगृह आणि अल्कोहोल यांसारख्या उद्योगावर हा कर लागू होत नसल्याने, काही तज्ञांच्या मते भांडवलदारांना काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग मिळेल.

तसेच काही वस्तू महाग झाल्याने सर्वसामान्यांना त्या वस्तूची खरेदी करणे अशक्य होईल.

अशाप्रकारे सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनावर जीएसटीचा परिणाम होईल.


 हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *