Rugved in Marathi । ऋग्वेदाची मराठी माहिती । Rugved Information in Marathi

Rugved in Marathi । ऋग्वेदाची मराठी माहिती । Rugved Information in Marathi

Rugved in Marathi । ऋग्वेदाची मराठी माहिती । Rugved Information in Marathi

वेद हा जगातील सर्वात जुना धर्मग्रंथ आहे. त्यामुळे वेदाचे नाव घेतात सर्वच भारतीयांचे हात जोडले जातात कारण हिंदू धर्मामधील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र ग्रंथ म्हणून वेदाला ओळखले जाते.

आपल्यातील बहुतांशी जणांना वाटते की वेद हे काहीतरी गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणेच बरे!

वेद हे केवळ विद्वान, पुरोहित आणि अभ्यासक यांच्या यांच्यापर्यंतच्या आहेत सर्वसामान्यांना वेदांची भाषा कळेल अवघडच असे प्रत्येकाला वाटते. वेद खरोखरच इतके अगम्य आणि अवघड आहे का? कारण सर्व सामान्य व्यक्तींना वेदांच्या ज्ञानाबद्दल मूळच काही माहिती नसते.

परंतु मित्रांनो एकाच वेळी सर्व क्षेत्रातील अत्युच्च दर्जाचे ज्ञान सांगणारे आणि साहित्याचा अजोड नमुना असणारे वेदा सारखे दुसरे धर्मग्रंथ सापडणे कठीण आहे.

वेदामध्ये मुख्य चार वेद आहेत ऋग्वेद , सामवेद , यजुर्वेद , सामवेद.

आजच्या ” Rugved in Marathi । ऋग्वेदाची मराठी माहिती ” लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी ऋग्वेदाचे मराठी माहिती सांगणारा होत जी पुढील प्रमाणे आहे.

Rugved in Marathi । ऋग्वेदाची मराठी माहिती । Rugved Information in Marathi

ऋग्वेद 10 वेदांमधील पहिला धर्मग्रंथ आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा ग्रंथ किंवा ऋचांनी बनलेला ग्रंथ होय.

ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून ऋग्वेदाची रचना ही बाकीच्या वेदांच्या अगोदर झाली असे समजण्यात येते म्हणून ऋग्वेद हा पहिला वेद आहे जो श्लोकांच्या स्वरूपामध्ये आढळतो. ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, अशी समजूत आहे. ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यापैकी एक म्हणजे ऋग्वेद.

ऋग्वेद म्हणजेच स्थिती आणि ज्ञान होय. ऋग्वेद हा ग्रंथ 10 मंडलामध्ये म्हणजेच अध्यायामध्ये असून यामध्ये 1028 स्त्रोत आहेत ज्यामध्ये 11,000 मंत्र आहेत.

ऋग्वेदामध्ये एकूण पाच शाखा आहेत :

  • शककल्प
  • वास्कल
  • अश्वलयन
  • शंखायन
  • मांडुकायन

भौगोलिक स्थान आणि देवतांनी सांगितलेल्या मंत्राशी ऋग्वेदाचा खूप मोठा संबंध आहे. ऋग्वेदातील स्तोत्रांमध्ये देवतांची प्रार्थना, स्तुती आणि वर्णन आणि देवलोकातील त्यांचे स्थान आहे. यामध्ये जलचिकित्सा, वायुचिकित्सा, सौरचिकित्सा, मानसिक चिकित्सा आणि हवनाद्वारे होणारे उपचार आदींचीही माहिती उपलब्ध आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात औषधी सूक्ताचा म्हणजे औषधांचा उल्लेख आहे. यामध्ये 125 औषधांची संख्या सांगितली असून ती 107 ठिकाणी आढळून आली आहे. वैद्यकशास्त्रात सोमाचे विशेष वर्णन आहे. ऋग्वेदात च्यवन ऋषींच्या पुनरुत्थानाचीही कथा आहे.

निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास ‘ऋचा’ म्हणतात. ऋग्वेद रचनेचा काल इ.स.पू. ६००० पूर्वीच्या सुमाराचा असावा असा अंदाज आहे. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी व्यास यांनी पाहिली.

ऋग्वेदाची रचना :

ऋग्वेदाची रचना ही ऋग्वेदाच्या नावावरूनच करण्यात आली आहे जी पुढीलप्रमाणे आहेत.

ऋच्‌ धातूचा अर्थ पूजा करणे असा आहे. यावरून ऋचा या शब्दाचा अर्थ स्तुतिपर कविता असा होतो. वेद शब्दामध्ये विद् असा धातू आहे, त्याचा अर्थ ज्ञान असा होतो. म्हणजेच ऋग्वेदाचा अर्थ “स्तुतिपर ज्ञान” असा होतो ज्याला आपण सर्वसाधारण भाषेमध्ये “श्लोक” असे म्हणतो.

अशा १०|२० ऋचांचे मिळून एक पद म्हणजे एक सूक्त तयार होते. अशा १०|२० सूक्तांचे एक अनुवाक्‌ तयार होते व अनेक अनुवाकांचे मिळून एक मंडल तयार होते. अशी दहा मंडले ऋग्वेदात आहेत. ऋग्वेदातील मंत्र हे अतिशक्करी, अनुष्टुभ, गायत्री, जगती, द्विपदाविराज, पंक्ति, अशा विविध छंदांत रचलेले आहेत.

देवता :

ऋग्वेदामध्ये अनेक देवतांची स्तुती करणारे श्लोक देखील आढळतात.

ऋग्वेदात अग्नी, अश्विनीकुमार, इंद्र, उषा, द्यावापृथिवी, मरुत, मित्रावरुण, पूषा, ब्रह्मणस्पती, वरुण, सूर्य, अशा विविध देवतांवरच्या सूक्तांची रचना दिसते.

देवता सूक्ते, संवाद सूक्ते, लौकिक सूक्ते, ध्रुवपद सूक्ते, आप्री सूक्ते असे सूक्तांचे विविध प्रकार ऋग्वेदात आढळतात.


 हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *