माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi

आंबा म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडती चे फळ म्हणजे आंबा आहे.

आंबा हा फळांचा राजा आहे सर्वसाधारणपणे आंबा हे दक्षिण आशिया खंडातील विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे फळ आहे. आंब्याची उत्कृष्ट अशी चव आणि गोडी यामुळे आंब्याला कोकणचा राजा असेसुद्धा म्हणतात. आंबा या फळाच्या उन्हाळा हा सर्वाधिक चांगला हंगाम आहे.

चला तर बगूया ” My Favourite Fruit Mango Essay in Marathi “

माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi

उन्हाळा ऋतू मध्ये थांबा मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये आलेला दिसतो. जगभरामध्ये जवळजवळ पाचशेपेक्षा अधिक जातीचे आंबे पाहायला मिळतात. प्रत्येक जातीचा आंबा रंग चव आकार गंध अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आढळतो.

आंबा या फळाच्या गोडी मुळे आणि स्वादिष्ट अशा चवीमुळे आंबा हे माझे आवडते फळ आहे..

आंबा या फळाच्या वाढीसाठी अनुकूल असे वातावरण आपल्या भारत देशामध्ये आहे त्यामुळे भारतात आंब्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे आंब्याचा उगम हा दक्षिण आशियामध्ये झाला असावा असा तज्ञांचा अंदाज आहे.

आंबा हा फळांचा राजा असून भारत आणि पाकिस्तान या देशाचे राष्ट्रीय फळ आंबा चा आहे. तसेच आंब्याचे झाड हे फिलीप्पियनस चे राष्ट्रीय चिन्ह आहे तर बांगलादेश चे राष्ट्रीय झाड हे आंब्याचे झाड आहे.

आंब्याच्या झाडाला केवळ वर्षातून एकदाच फळ येते. आंब्याच्या झाडाची उंची ही साधारणता 35 ते 40 मीटर एवढी असते. आंब्याच्या फळाचे वजन कमीत कमी शंभर ग्रॅम ते जास्तीत जास्त पाच किलोपर्यंत असते. आंबे फक्त अशाच ठिकाणी येतात ज्या ठिकाणी उन्हाळा अधिक काळ असतो.

आंब्याची गोडी आणि आंब्याचा उत्कृष्ट अश्या स्वादामुळे आंबा हा खूप लोकप्रिय आहे. आंब्यामध्ये विटामिन अ, विटामिन क आणि विटामिन ई भरपूर प्रमाणात आढळतात त्याचबरोबर प्रथिने (protein), कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, उष्मांक बी-6 जीवनसत्व, B-5 जीवन सत्व कमी अधिक प्रमाणात आढळते.

त्यामुळे आंबा हा पचन विकार, हृदय विकार, आणि इतर काही आजारांवर उपयुक्त ठरतो.

तसेच आंब्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या कडे कडे उष्णतेवर विजय मिळवण्याचा मदत करतो. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीची चव आंबट गोड असल्याने मला कैरी खूप आवडते‌.

कच्चा कैरी पासून माझी आहे तर उन्हाळ्यामध्ये लोणचा बनवित असते. मी आईने बनविलेल्या लोणच्याचा नेहमी आनंद घेत असतो. आंब्याचे बरेचसे फायदे आहेत. आंबा आरोग्यासाठी गुणकारी तर आहेच त्यासोबतच आंब्यापासून आमरस तयार केला जातो, आंब्याचा मुरंबा देखील बनवण्यात येतो, आंब्यापासून आंबोळ्या देखील बनवल्या जातात.

आजकल लग्नकार्य सारख्या मोठ्या कार्या मध्येदेखील आंब्याचा आमरस एक खाद्य पदार्थ मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आंब्याच्या मध्यभागी एक बी असते त्याला कोई असे म्हणतात. आंब्याचा रस काढून त्यापासून वेगवेगळी शीतपेय बनवितात.

आंब्याच्या शीट पेयाला बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे स्लाईस आणि माझा यासारखी कोल्ड्रिंक खूप लोकप्रिय आहेत. तसेच आंब्या पासून तयार करण्यात आलेली मिठाई मला खूप आवडते.

भारतीय संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. “अक्षय तृतीया” या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी आमरस करून देवाला नैवेद्य दाखवून या दिवसापासून आंबे खाण्यास सुरुवात केली जाते. भारतीय संस्कृतीत आंब्याला महत्त्व आहेच त्यासोबत आंब्याच्या झाडाला देखील विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आंब्याच्या झाडाच्या पानांचा वापर करून घराला तोरण बनवले जाते. सणासुदीला हे तोरण दरवाजाला बांधणे हे अधिक शुभ मानले जाते.

म्हणून लग्नसमारंभात, मंगल कार्यात, सणांच्या दिवशी किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी आंब्याच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात आंब्याच्या विविध जाती आढळतात ज्यामध्ये हाऊस, नीलम, देवगिरी, केसर, चौसा, सुकाल, बनारसी, मालेगाव अशा वेगवेगळ्या जातींचा समावेश होतो.

जगभरामध्ये हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी एकूण 56 टक्के उत्पादन हे एकट्या भारतात होते. परदेशातून आंब्याला मोठ्याप्रमाणात मागणी असल्याने दरवर्षी भारतातून लाखो टन आंबा विदेशात निर्यात केला जातो. आंब्याची लोकप्रियता आणि वाढत्या मागणीमुळे शेतकरीदेखील आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी हापूस आणि देवगिरी हापूस हे दोन जातीचे आंबे मला खूप आवडतात. म्हणून मी या दोन जातीच्या आंब्याचे झाडाचे रोप माझ्या घरासमोर लावले आहे. मी या झाडांची दररोज देखबाल करतो आणि पाणी घालतो. माझे झाडे लवकर मोठे होऊन त्यांना आंबे लागावी मग मी माझे आवडते फळ आंबा याचा आस्वाद घेईन.

असा हा उत्कृष्ट दर्जेदार आणि चविष्ट असणारा आंबा हे माझे आवडते फळ आंबा My Favourite Fruit Mango Essay in Marathi) आहे.

माझे आवडते फळ आंबा निबंध मराठी । My Favourite Fruit Mango Essay in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *