मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Nibandh
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध घेऊन आलोत.
मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Nibandh
मित्रानो जगभरामध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी विविध पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहेत. त्यातल्या त्यात निसर्गाचा वारसा लाभलेल्या ठिकाणांना पाहणे आणि तेथे असलेल्या पर्यटनस्थळांचा आनंद घेणे हे सर्वांनाच आवडते. आपल्या भारत देशामध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी विविध प्रेक्षणीय स्थळे प्रसिद्ध आहेत. परंतु आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Nibandh महाबळेश्वर या स्थळाबद्दल सांगणार आहे.
लहानपणापासून मला फिरायला खूप आवडते त्यातल्या त्यात आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे हे तर माझा छंदच जणू. त्यामुळे मी आज पर्यंत वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट दिलेली आहे. परंतु मी आज पर्यंत भेट दिलेल्या किंवा मी पाहिलेला प्रेक्षणीय स्थळांमध्ये मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ महाबळेश्वर आहे.
महाबळेश्वर मधील निसर्गमय वातावरण आणि महाबळेश्वर या शहराला लाभलेला निसर्ग वारसा हा खरोखरच पाहण्यासारखा आहे. महाबळेश्वर या शहराची सुंदरता पाहूनच या शहराला पृथ्वीवरील छोटासा स्वर्ग असे म्हटले तर असावेत. खरोखरच महाबळेश्वरची सुंदरता आणि निसर्गाने दिलेली देणगी आश्चर्यकारक आहे.
महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. निसर्गाने रमलेले मनाला मोहक असलेले अतिशय सुंदर या ठिकाणाला वर्षभरात लाखो पर्यटक भेट देतात. म्हणूनच महाबळेश्वरला महाराष्ट्राचे “नंदनवन” असे देखील म्हणतात.
महाबळेश्वर या ठिकाणी असलेला डोंगराळ भाग हा विशेष का प्रेक्षकांना महाबळेश्वर या ठिकाणाकडे आकर्षित करतो.
महाबळेश्वर त्याच्या स्ट्राबेरीसाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच महाबळेश्वर हे शेत ताज्या स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी यासाठी सुद्धा प्रसिध्द आहे. तसेच आपण जेली, मध, जाम आणि बरेच काही विकत घेऊ शकता. एखादा हातमाग, चामड्याच्या वस्तू, कोल्हापुरी पादत्राण ई. वस्तू टाउन बझारमधून खरेदी करू शकतो.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे.महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते. येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उदयाने, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. ब्रिटीश-कालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती या आजही त्यावेळच्या ब्रिटीश राजवटीची ओळख करून देतात. मार्च ते जून हा कालावधी महाबळेश्वरला भेट देण्यास योग्य आहे.
येथील प्रेक्षणीय ठिकाणांना ‘पॉईंट’ म्हणतात. बहुतांशी ‘पॉईंट’ हे डोंगराच्या टोकालाच आहेत.
मी जेव्हा महाबळेश्वर या ठिकाणी गेलो होतो तेव्हा मी पुढील प्रमाणे काही पॉइंटला भेट दिलेली आहे.
आर्थर सीट पॉईंट :
महाबळेश्वरातील सर्वात प्रसिद्ध पॉईंट म्हणून ओळखला जातो. या पॉईंटच्या डावीकडे खोल दरीतून कोंकणात जाणारी सावित्री नदी आहे, तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत यालाच ब्रम्हारण्य असेही म्हणतात. हि सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पडायला भाग पाडतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला ,तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात. याच मार्गावर ‘टायगर स्प्रिंग’, ‘इको पॉईंट’, ‘एलफिस्टन पॉईंट’ आहेत.
लिंगमळा वाटर फॉल :
काही पर्यटक महाबळेश्वर या ठिकाणी केवळ लिंग्माला वॉटरफॉल पाहण्यासाठी येतात. स्वतःला महाबळेश्वरच्या प्रेमा मध्ये पाडणारा लिंग्माला वॉटरफॉल हा बघायला अतिशय सुंदर आहे. उंच डोंगरावरून पडणारा धबधबा पाहण्याचा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही.
श्रीक्षेत्र महाबळेश्वर :
महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव (महाबली) यांच्या नावापासूनच प्राप्त झालेले आहे. जुन्या महाबळेश्वर मध्ये महादेवाचे आहे, यालाच क्षेत्र महाबळेश्वर असेही म्हणतात. महाबळेश्वर पासून ५ किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे.या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत,तसेच १३ व्या शतकातील सर्वात जुने कृष्णाबाई मंदिर आहे.
महाबळेश्वर हे प्रेक्षणीय स्थळ भारतातील सर्वाधिक सुंदर स्थळांपैकी एक स्थळ आहे. महाबळेश्वरचा चा संपूर्ण घाट हा खूप रमणीय आहे. एकदा का महाबळेश्वरच्या सौंदर्य पाहण्यात मग्न झालो तर पुन्हा घरी येण्याची इच्छाच होत नाही. म्हणूनच दरवर्षी भारतासह अनेक परदेशातून पर्यटक महाबळेश्वरच्या सुंदरता पाहण्यासाठी येतात.
असे हे महाबळेश्वर शहर एक निसर्गरम्य सोबतच धार्मिक महत्व प्राप्त असलेले व महाराष्ट्राचा नंदनवन म्हणून ओळखले जाणारे आहे.
मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Nibandh हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi
- माझा गाव निबंध मराठी । Maze Gav Marathi Nibandh
- आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध । Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi
- मी सरपंच झालो तर मराठी निबंध । Mi Sarpanch Zalo tr Marathi Nibandh
- माझे स्वप्न निबंध मराठी । Maze Swapna Essay in Marathi