आजच्या वर्तमान काळाने खूप प्रगती केली आहे मानव आणि नवनवीन गोष्टीचा शोध लावला आहे ज्याच्या जोरावर मनुष्य दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याच बरोबर विज्ञानाने केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. मानवाने एवढी प्रगती केली आहे की मनुष्य अंतराळाचा प्रवास करून देखील आला, चंद्रावर जाऊन आला तसेच मागच्या काही वर्षांमध्ये मंगळ ग्रहावर देखिला यान पाठवण्यात आले आहे.
म्हणजेच मनुष्य आणि पृथ्वीवर तर विकास केला त्यासोबतच सध्या मनुष्य हा अंतराळावर देखील जाण्याच्या विचारांमध्ये आहे.
माझे घर अंतराळात / आकाशात असते तर…. । Maze Ghar Akashat Aste Tar
पहिली अंतराळ प्रवासी ही फक्त कल्पना चावला होती. आपल्या देशाची वैज्ञानिकाचे स्वप्न होती कि अंतराळवर जावे तेथील ग्रहाचा अभ्यास करावा परंतु अलीकडे ही संकल्पना सत्यात उतरली आहे.
रशिया या देशाने अंतराळयानातून प्रथम अंतराळवीर युरी गागारीन यांना अंतराळात पाठवले. त्यानंतर अमेरिका देशाचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रांग आणि एडविन अल्ड्रिन हे दोघे मी प्रथमच चंद्रावर पोहोचले.
त्यामुळे शास्त्रज्ञाच्या अशा प्रयत्नांमुळे आणि प्रगती मुळे आता असे वाटत आहे की, आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना ही अवकाशात जाण्याची संधी नक्कीच मिळेल. परंतु हे कधी शक्य होईल हे सांगता येणार नाही….
त्यामुळे येणारा काळामध्ये मी असो किंवा नसो माणसाने केलेली प्रगती बघायला नसलो तरी माझी इच्छा आहे की माझे घर अंतराळात असावे….
जर माझे घर खरोखरच अवकाशात असते तर….किती बरे होईल!!!
ढगांच्या आणि ताऱ्यांच्या दुनियेमध्ये राहण्याची मजाही वेगळीच असेल. पृथ्वीवरून हे ढग आणि तारे इतके सुंदर दिसतात तर खरोखरच अंतराळातच घर असल्यास जवळून तारांना आणि ढगांनाना पाहण्याचा आनंद हा आगळावेगळाच असेल ना!!!
मी आजवर दुरून पाहिलेला हा अवकाश जवळून पहायला किती मजा वाटेल ना???
जर माझे घर अंतराळात असते तर…. मी खूप मज्जा केली असती. अंतराळात असलेल्या विविध ग्रहांना, चंद्राला, सूर्याला आणि ताऱ्यांना जवळून पाहता आले असते.
अंतराळातून पृथ्वीचे दर्शन झाले असते पृथ्वीचा सुंदर आणि निसर्गमय नजारा पहाण्यास खूप आनंद होईल. तसेच अवकाशामध्ये फिरत असताना मी आपल्या लाडक्या भारत देशाकडे पाहिन. भारत देश विविध निसर्गरम्य ठिकाण यांनी नटलेला आहे ती सर्व ठिकाणे मी वरूनच पाहिल.
माझे घर अवकाशात असते तर मला विविध ग्रहांना आणि उपग्रहांना जवळून पाहण्याची सुवर्णसंधी लाभेल.
आपल्या सौर मंडळामध्ये सर्वात सुंदर ग्रह आहे तो म्हणजे शनी ग्रह. जर माझे घर अवकाशात असेल तर…..मला अशा या सुंदर शनी ग्रहाचे दर्शन देखील घडेल.
माझे घर अवकाशात असते तर मला सुंदरशा इंद्रधनुष्याचे जवळून दर्शन घडेल. इंद्रधनुष्याच्या सात रंगांमध्ये जणू मी आंघोळच करेल.
असे म्हणतात की आकाशात गुरुत्वाकर्षण बल नसल्याने सर्व वस्तू उडतात. मग माझे घर आकाशात असल्याने मला पक्षांत प्रमाणे उडण्याचे स्वप्न देखील पूर्ण होईल.
आकाशामध्ये सर्वत्र शांतता असल्याने झोप देखील अगदी गाढ लागेल. जर माझे घर अंतराळात असेल तर मला खूप आवडेल कारण अंतराळामध्ये वाहनांची रहदारी नसते, त्यामुळे अंतराळातील वातावरण हे प्रदूषण मुक्त असेल, त्यामुळे आपले आरोग्य निरोगी बनेल.
अशाप्रकारे जर माझे घर अंतराळात असते तर…. मी अंतराळातील विविध गोष्टीचा आनंद घेईल.
खरंच!! माझे घर अंतराळात असते तर …..किती बरे झाले असते ना!!!
हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- गरिबी एक शाप मराठी निबंध । Poverty Essay in Marathi
- ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध । Marathi Essay on Granth Hech Guru
- गृह प्रवेशाचे नियम । Vastu Shanti for Home in Marathi
- माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध । My favourite Animal Lion Essay in Marathi