माझा महाराष्ट्र निबंध मराठी Maza Maharashtra Nibandh Marathi

मंगल देशा पवित्र देशा,

महाराष्ट्र देशा…

प्रणाम माझा घ्यावा हा

श्री महाराष्ट्र देशा….

Maza Maharashtra Nibandh

मित्रांनो माझ्या महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास हा फार महान आणि प्राचीन आहे. अनेक महापुरुषांच्या बलिदानाने माझा महाराष्ट्र राज्याची माती रंगलेली आहे.

माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi

महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांचा मिळून बनला आहे. महा म्हणजे “महान” आणि राष्ट्र म्हणजे “प्रदेश” होय. अशाप्रकारे महाराष्ट्र राज्याचा अर्थ महान असे राष्ट्र कसा होतो.

1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यापूर्वीच महाराष्ट्र राज्याला प्राचीन असा इतिहास लाभला आहे.

महाराष्ट्र हा बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नवरोजी, गोपाल बाल कृष्ण गोखले, वीर सावरकर यांसारख्या महान नेत्यांची जन्म भूमी माझा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला श्रीमंत आणि संपन्न राज्यांमध्ये सामाविष्ट केले जाते. कारण महाराष्ट्र हे भारतातील उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य आणि प्रगतशील राज्य आहे. महाराष्ट्राची “राजधानी मुंबई” आहे आणि सोबतच मुंबई भारताची “आर्थिक राजधानी” देखील आहे. त्यामुळे भारताच्या नकाशा मध्ये महाराष्ट्र राज्याला खूप टोकाचे आणि महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास एकचतुर्थांश विभाग हा महाराष्ट्रातून होतो. उत्पादनाच्या क्षेत्रात इतर राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकाचे आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य हा विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे देखील ओळखला जातो.

महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांग आहे. तर पश्चिमेला अरबी समुद्र वसलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात “बेसाल्ट खडक” सापडतो. महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पर्वत हे “कळसुबाई” आहे. या कळसूबाई पर्वताची उंची सुमारे 1646 मीटर एवढी आहे.

याशिवाय महाराष्ट्र राज्याला जलाशयाचा मोठा साठा लाभला आहे. महाराष्ट्रातून गोदावरी, भीमा, कृष्णा, नर्मदा, कोयना, पंचगंगा, वैनगंगा आणि मुळा मीठा यांसारख्या नद्या वाहतात.

महाराष्ट्र राज्य हे संस्कृतीचा वारसा जपणारे राष्ट्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्य मध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. “मराठी” ही महाराष्ट्राची मायबोली भाषा आहे. बायकांसाठी “साड्या” आणि पुरुषांसाठी “धोतर” महाराष्ट्राचे मुख्य वेशभूषा आहे याशिवाय ड्रेस, पॅन्ट, शर्ट लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये लेहंगा , चुडीदार अशा प्रकारची वेशभूषा देखील पाहायला मिळते.

महाराष्ट्र राज्याची वर्तमानकाळाची लोकसंख्या आहे बारा करोड पेक्षा जास्त आहे. किंबहुना यापेक्षा अधिक लोक महाराष्ट्र राज्यात राहतात. यामध्ये हिंदू लोकांची जनसंख्या अधिक प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा प्रमुख सण हा गणेश उत्सव आणि गणेश चतुर्थी आहे परंतु या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्र राज्यामध्ये होळी, रक्षाबंधन, वटपोर्णिमा, नारळीपौर्णिमा, ईद, नवरात्र, दीपावली, दसरा, मकर संक्रांति, गुढीपाडवा इत्यादी सण राष्ट्र राज्यामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात.

भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा लोकसंख्याच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी “शेकरू” आहे आणि राज्य पक्षी “हरियाल” असून राज्य फूल “ताम्हण” आहे व राज्य फळ “आंबा” आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्य है भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन सृष्टीचे केंद्रबिंदू आहे. चित्रपटसृष्टी सारख्या उद्योगामुळे महाराष्ट्र राज्याला दरवर्षी देश-विदेशातून करोडो रुपयांचा नफा मिळतो.

महाराष्ट्र राज्याच्या इतिहासा बद्दल बोलायचे झाले तर महाराष्ट्र राज्याचा इतिहास हा प्राचीन आणि खूप पवित्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर राजे महाराष्ट्राच्या पावन भूमीत होऊन गेले. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रीशिक्षणाची ज्योती लावणाऱ्या सावित्रीबाई फुले, तसेच वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ, यांसारख्या अनमोल रत्नांचा जन्म देखे महाराष्ट्राच्या मातीत झाला. संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान आणि विद्वान संतांनी जनजागृती घडवून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

त्यानंतर गाणं संग्रामी लता मंगेशकर, क्रिकेट चा देवता सचिन तेंडुलकर, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, मराठी साहित्यकार कुसुमाग्रज, स्वर सम्राट पंडित भीमसेन जोशी, कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे आणि अनाथांची माय बनणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांसारख्या महान लोकांचा जन्म देखील महाराष्ट्र राज्य झाला आज देखील अशा महान लोकांना महाराष्ट्र राज्याला गर्व आहे.

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील महाराष्ट्र राज्य एक संपन्न आणि समृद्ध असे राज्य आहेत. महाराष्ट्रात अनेक प्राचीन गुहा, वास्तुकला, मोठ्या डोंगर-दर्‍या, शिवाजी महाराजांचे किल्ले, अजिंठा वेरूळ लेणी आणि अमाप सौंदर्याने नटलेला कोकण हा महाराष्ट्राचा वैभव आहे.

त्याशिवाय विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात देखील पर्यटकांसाठी विविध स्थळे पाहण्यासारखी आहेत. औरंगाबाद शहर देखील पर्यटकांसाठी सुप्रसिद्ध आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्यात दर्शनासाठी अनेक तीर्थ क्षेत्रे आहेत.

पंढरपूरचे विठोबा मंदिर, तुळजापूरची आई भवानी मातेचे मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मातेचे मंदिर, अशी अनेक तीर्थक्षेत्रे महाराष्ट्र राज्यातून पाहण्यासारखी आहेत.

Maza Maharashtra Nibandh in Marathi

अशा प्रकारे माझा महाराष्ट्र हा सर्वच दृष्टिकोनातून एक संपन्न असे एक राज्य आहे. माझ्या महाराष्ट्राला प्राचीन , ऐतिहासिक आणि सांस्कृतिक असा वारसा लाभलेला आहे. आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. मला अभिमान वाटतो की मी माझ्या महाराष्ट्र राज्याचा एक नागरिक आहे.


माझा महाराष्ट्र निबंध लेखन मराठी । Maza Maharashtra Nibandh Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *