मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी । Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi

मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी । Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi

आम्ही महाराष्ट्र राज्यात राहणारे आणि मराठी भाषा बोलणारे. म्हणून आम्हाला आमच्या मराठी मायबोली भाषेवर गर्व आहे. सर्व भाषांप्रमाणे मराठी भाषेचे स्थान देखील आगळेवेगळे आहे. ज्याप्रमाणे भारतामध्ये हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो त्याप्रमाणे मराठी राजभाषा दिवस देखील साजरा केला जातो.आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी घेऊन आलोत.

मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी । Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi

लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी लोगो |

जाहलो, खरेच धन्य ऐकतो मराठी ||

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी |

एवढ्या जगात माय मानतो मराठी ||

मराठी राज्यभाषा दिन केव्हा साजरा केला जातो?

मराठी भाषा ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. येऊन गोष्ट मराठी राज्यभाषा दिन हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवसाला “जागतिक मराठी भाषा दिवस” , ” मराठी भाषा दिन” , “मराठी भाषा गौरव दिन” अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

मराठी भाषेचे ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. कुसुमाग्रज हे त्यांचे टोपण नाव असले तरी संपूर्ण देशभरामध्ये त्यांना याच नावाने ओळखले जाते.

अशा या ज्येष्ठ मराठी साहित्यकार यांच्या जन्मदिना दिवशी ” मराठी राज्यभाषा दिन” साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेसाठी महान योगदान होते. कुसुमाग्रज यांनी साहित्यामध्ये दिलेल्या योगदानाची ओळख पिढ्यानपिढ्या राहो म्हणून कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना दिवशी महाराष्ट्रात “मराठी राज्यभाषा” हा दिवस साजरा केला जातो.

विष्णू वामन शिरवाडकर यांचे कार्य

मराठी भाषेचे उत्कृष्ट साहित्यकार असलेले विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेतील साहित्याचा वारसा टिकून राहावा म्हणून मोठे योगदान दिले. कुसुमाग्रज यांचा जन्म 1912 मध्ये पुणे या ठिकाणी झाला.

विष्णू वामन शिरवाडकर यांना लहानपणापासूनच लिखाणाची अत्यंत आवड होती. म्हणून त्यांनी ही आवड जोपासली सुद्धा. कुसुमाग्रज यांनी लहान वयामध्ये कविता लिहिण्यास सुरुवात केली. सोबतच कथा, कादंबरी, नाटक, ललित कथा आणि वाडमय असे साहित्य लेखन केले.

कुसुमाग्रज यांनी केलेल्या उत्कृष्ट साहित्य लेखनामुळे त्यांना 1974 साली त्यांना “नटसम्राट” आणि “साहित्य अकादमीचा” पुरस्कार देण्यात आला.

त्यानंतर पुढे 1987 मध्ये त्यांना साहित्यातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजेच “ज्ञानपीठ पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. आणि त्यानंतर 1991 मध्ये त्यांना भारत सरकारचा “पद्मभूषण” या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मराठी भाषेचा इतिहास :

मराठी भाषेचा इतिहास हा फार दृढ आणि प्राचीन आहे. मराठी भाषेचा उदय हा संस्कृत भाषेच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला आहे.

सर्वप्रथम मराठी भाषेचा वापर हा पैठण येथील सातवाहन साम्राज्य मध्ये करण्यात आला. पुढे देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची भरभराट झाली. मराठी भाषा ही देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते. त्यानंतर पुढे इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी “ज्ञानेश्वरी” या ग्रंथाची रचना मराठी भाषेतून केली. म्हइंभट यांनी लिळाचरित्र देखील मराठी भाषे मधूनच लिहिले.

तसेच संत एकनाथ यांनी देखील मराठी भाषेचा वापर करूनच भारुडे लिहिली.

एकनाथी, भागवन, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ देखील मराठी भाषेमध्ये बघायला मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यानंतर मराठी भाषेला राज्यश्रय मिळाला. इसवी सन 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत दर्जा प्राप्त करून दिला. इसवी सन 1960 मध्ये मराठी भाषिकांचा एक संघ महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली. त्यानंतर मराठी भाषेला राज्यभाषेचा मुकुट प्राप्त झाला.

मराठी राज्यभाषा :

आपल्या भारतातील राज्यघटनेमध्ये 22 अधिकृत भाषा आहेत. या बावीस भाषांमध्ये मराठी भाषेचा देखील सामावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. तसेच दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात सुद्धा मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.

गोवा राज्याच्या कायद्यानुसार कोकणी जरी गोव्याची राज्यभाषा असली तरीसुद्धा मराठी भाषेचा वापर शासनाच्या सर्व कामांसाठी केला जाऊ शकतो.म्हणून मराठी गोवा या राज्याची सहा अधिकृत राजभाषा आहे.

2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या फ्री सुमारे नऊ कोटी होती. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहाव्या आणि भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.

मराठी भाषा ही भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्र हे मराठी भाविकांचे राज्य म्हणून ओळखले जाते.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. व महाराष्ट्राची अधिकृत मराठी ही राज्यभाषा असेल हे जाहीर करण्यात आले. ” मराठी राजभाषा अधिनियम 1964″ सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध झाला व 1 मे 1965 पासून अमलात आला.

मराठी भाषा संवर्धन :

मराठी ही आपली राज्यभाषा आहे व तिची जोपासना करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाचे कर्तव्य आहे. पण अलीकडच्या काळामध्ये सर्वत्र आपल्या भाषेचा म्हणजेच मायबोली मराठी भाषेचा त्याग करून इंग्रजीती बोलणे याकडे अधिक प्राधान्य दिले जात आहे.

इंग्रजी भाषा शिकणे ही आजची गरज आहे परंतु इंग्रजी भाषेसाठी मराठी भाषेचा त्याग करणे हे चुकीचे आहे. मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्र राज्याचा गर्व आहे. त्यामुळे आपण आपल्या मराठी भाषेला न विसरता आपल्या मराठी भाषेचा प्रसार कसा होईल याकडे विचार करायला हवा.

त्यामुळे आपण आपल्या राज्यभाषेचा आदर, सन्मान, करणे हे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. सोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने आपल्या मराठी भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे.


मराठी राज्यभाषा दिन निबंध मराठी । Marathi Rajbhasha Din Nibandh in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *