ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध । Marathi Essay on Granth hech Guru
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध घेऊन आलो.
ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध । Marathi Essay on Granth hech Guru
मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरूला खूप महत्त्वाचे स्थान असते गुरूशिवाय कोणताही व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गुरुची महती सांगताना ‘गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा’ अशा शब्दांमध्ये केली जाते. म्हणजेच गुरूंना ब्रह्म विष्णू आणि महेश्वर यात्री देवानं समान मानले जाते. त्याचप्रमाणे गुरू व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये आणखीन एक महत्वाचा खजिना आहे तो म्हणजे ग्रंथ होय. ग्रंथाला देखील गुरु ची उपमा दिली जाते, म्हणूनच म्हणतात, ” ग्रंथ हेच गुरु.”
ग्रंथ हा एक असा गुरू आहे ज्याचा वापर आपण जितका जास्त करतो आणि त्याच्यातील महत्व समजून घेतो तितका आपला उद्धार होतो. आपले जीवन समृद्ध करण्यासाठी आणि योग्य मार्गाला लावण्यासाठी ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावतात. अंधकार यापासून प्रकाशामध्ये घेऊन जाण्यासाठी ग्रंथाची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरते.
ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानाचा अफाट असा भांडार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवला जातो.
आजच्या योगाने प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली आहे सोबतच विज्ञानाची प्रगती ही गगनाला भेटली आहे परंतु यामागचे रहस्य देखील ग्रंथांमध्ये दडलेले आहेत. ग्रंथातून आपल्याला मौल्यवान अशा गोष्टींची विचारांची शिकवण दिली जाते. ग्रंथाच्या मदतीने आपल्याला प्राचीन धार्मिक पौराणिक अशा तीनही युगा ची माहिती सहजरीत्या प्राप्त होते. ग्रंथांमधून आपल्याला आपली संस्कृती, सभ्यता आणि धर्म याबद्दल माहिती मिळते. ग्रंथातून आपल्याला योग्य मार्गावर चालण्याची शिकवण मिळते. ग्रंथ व्यक्तीला परिपूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरूला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व ग्रंथाला देखील आहे.
लहान वयामध्ये देण्यात येणारे संस्कार हे मनावर खूप खोलपर्यंत परिणाम करता लहान मुलांना लहान वयामध्ये योग्य संस्कार दिले जातात. त्याप्रमाणेच आजी-आजोबा किंवा वयस्कर व्यक्तींकडून ऐकलेल्या गोष्टी आणि मिळवलेले ज्ञान हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेळोवेळी फायद्याचे ठरते. म्हणून वयस्कर व्यक्तींचा सल्ला घ्यावा असे नेहमी म्हटले जाते. या सर्व गोष्टींचा उल्लेख व ग्रंथांमध्ये आढळतो. आपल्या इतिहासामध्ये यशस्वी झालेल्या आणि देशासाठी प्राण दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला ग्रंथाचे महत्त्व खूपच चांगल्या पद्धतीने माहिती होते. तसेच प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनामध्ये ग्रंथाला अनन्य साधारण महत्व चे स्थान आहे.
अनेक महान पुरुष आणि त्यांच्या जीवनामध्ये येऊन वेगवेगळ्या ग्रंथाची रचना केली. जसे की, लोकमान्य टिळक यांनी तुरूंगामध्ये “गीतारहस्य” या ग्रंथाची रचना केली, तर महात्मा गांधी यांनी “सत्तेचा प्रयोग” हा ग्रंथ लिहिला. महान लोकांद्वारे लिहिण्यात गेलेल्या ग्रंथांमधून शिकण्या जोग्या खूप काही गोष्टी आपल्याला मिळतात म्हणून प्रत्येक व्यक्तीने ग्रंथाचे वाचन करणे गरजेचे आहे.
ग्रंथातून आपल्याला ज्ञानाचा अथांग सागर मिळतो परंतु एक ग्रंथ निवडणे आणि वाचणे हे आवड व्यक्तीमध्ये असायला हवी.या ग्रंथरुपी गुरूच्या आधारे आपण अगदी अध्यात्म ज्ञानापासून ते रानागानाची नीती व व्यावहारिक तंत्र इत्यादी सर्व प्रकारचे ज्ञान आपल्यांना ग्रंथामध्ये बग्याला मिळते. ग्रंथांमधून आपल्याला भूतकाळाच्या, वर्तमान काळाच्या आणि भविष्यकाळाच्या अशा तिन्ही काळाच्या गोष्टी समजतात. यातून आपण आपला भविष्यकाळ उत्तम करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
वेद हा भारतीय संस्कृतीतील सर्वप्रथम धर्मग्रंथ आहे.जगातील पहिले साहित्य वेद आहे. वेदा पासून इतर सर्व धर्माचे आणि ग्रंथाची निर्मिती झाली असे मानले जाते. म्हणून वेद हा ज्ञानाचा अथांग सागर असलेला धर्मग्रंथ आहे
वेद हा परमेश्वरा द्वारे ऋषी म्हणून ना सांगण्यात आलेली एक रचना आहे. वेदामध्ये प्रकृतीच्या सर्व गोष्टीचे वर्णन करण्यात आलेले आहे वेदाचे मुख्य चार प्रकार आहेत व या चार प्रकारानुसार वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेले आहे थोडक्यात वेदा सारख्या धर्मग्रंथ हा दुसरा कुठलाही नाही.
ग्रंथ आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. गीता रामायण-महाभारत रामेश्वरी दासबोध यांसारखे ग्रंथ आपल्याला जीवन कशाप्रकारे जगावे याचे शिकवण देऊन जातात. प्रत्येक ग्रंथांमधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे ग्रंथ हे गुरु चे दुसरे रूप मानले जातात. गुरु हे प्रत्यक्ष रूपाने आपल्याला ज्ञान देण्याचे काम करतात तर ग्रंथ हे अप्रत्यक्ष स्वरूपाने ज्ञान देतात. म्हणूनच ग्रंथ हेच गुरु ( ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध । Marathi essay on “Granth hech Guru”) असा उल्लेख केला जातो.
आपल्या देशामध्ये अनेक ग्रंथालय आज देखील उभारलेली आहेत ज्या ठिकाणी नवनवीन एक ग्रंथ आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये एक तरी ग्रंथ वाचावा व त्यानुसार व्यक्तिमत्व घडवावे. कारण ग्रंथाचे महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये गुरु इतकेच आहे कारण ” ग्रंथ हेच गुरु आहे.”
हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- Rugved in Marathi । ऋग्वेदाची मराठी माहिती । Rugved Information in Marathi
- गृह प्रवेशाचे नियम । Vastu Shanti for Home in Marathi
- माझा आवडता प्राणी सिंह मराठी निबंध । My favourite Animal Lion Essay in Marathi
- माझा आवडता पक्षी मोर । Marathi Nibandh on My favorite bird Peacock.
- रक्षाबंधन मराठी निबंध । Essay on Raksha Bandhan in Marathi