मागणी पत्र लेखन मराठी । Magni Patra Lekhan in Marathi

आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी मागणी पत्र लेखन कसे करावे? या बद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मागणी पत्र लेखन मराठी । Magni Patra Lekhan in Marathi

मित्रांनो पत्रलेखनाचे वेगवेगळे प्रकार पडतात, त्यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे मागणी पत्र लेखन होय. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये मागणी पत्रलेखनयावर प्रश्न विचारला जातो, तसेच आपल्या ही दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा मागणी पत्रलेखनाचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मागणी पत्र लेखन कसे करावे? याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून आजच्या ( Magni Patra Lekhan in Marathi ) लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी मागणी पत्र लेखन व त्याचे नमुने घेऊन आलोत.

मागणी पत्र लेखन म्हणजे काय? What is Magni Patra Lekhan in Marathi

मित्रांनो मागणी पत्र लेखन म्हणजेच एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करणारे पत्र म्हणजेच मागणी पत्र होय.

जेव्हा आपण एखाद्या पत्राच्या आहे आणि एखाद्या दुकानातून विशिष्ट वस्तूची किंवा सेवेचे खरेदी करत असतो तेव्हा आपल्याला मागणी पत्र खूप आवश्यक असते.

म्हणजे एखाद्या व्यक्ति ला कोणत्याही वस्तुच्या मागणी निमित्त लिहिले गेलेल्या पत्राला मागणी पत्र म्हणले जाते.

तसेच मागणी पत्रा मध्ये आपण मागवलेल्या वस्तूचा किंवा सेवेचा मोबदला देण्यासाठी आपली पूर्वतयारी असते. तसेच यामध्ये पैशाचा व्यवहार हा गुप्तपणे केलेला असतो. तसेच मागणी पत्र लेखन यामध्ये भावनेचा अंश व कमी प्रमाणात असतो.

मागणी पत्र लेखनाचे नमुने । Examples of Magani Patra Lekhan in Marathi :

  1. शालेय वस्तूची मागणी करणे.
  2. ग्रंथालयासाठी विविध पुस्तकांची मागणी करणे.
  3. शालेय क्रीडा स्पर्धा साठी क्रिकेट च्या सामानाची मागणी करणे.
  4. वृक्षारोपणासाठी वेगवेगळ्या झाडांची मागणी करणे.
  5. विज्ञान प्रयोगशाळा साठी लागणाऱ्या उपकरणांची मागणी करणे. मागणी पत्र लेखन नमुना- 1.

शाळेतील विद्यार्थी भांडारासाठी शालेय वस्तूंची मागणी करणारे पत्र.

सुरज मोहन पाटील

विद्यार्थी प्रतिनिधी,

नेहरू विद्यालय ,पुणे

दिनांक- 20/6/2022

प्रति,

माननीय, संचालक

शालेय स्टेशनरी मार्ट, नवी पेठ, पुणे

विषय – शाळेतील विद्यार्थी भांडारासाठी शालेय वस्तूंची मागणी……

सर्व प्रथम नमस्कार!!! मी सुरज पाटील, नेहरू विद्यालय मधील इयत्ता दहावीच्या वर्गाचा वर्ग प्रतिनिधी आहे. दरवर्षी आमची शाळा तुमच्या शालेय स्टेशनरी मार्ट मधून शाळेचा विद्यार्थी भंडारा साठी विविध शालेय वस्तू मागवत असते. यावर्षी ही वस्तू मागवण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे.

त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की दरवर्षी प्रमाणे आपण योग्य दरामध्ये माझ्या शाळेच्या विद्यार्थी भंडारा साठी शालेय वस्तू द्याव्या. मला ज्या आवशक्य वस्तू हव्या आहेत त्यांची यादी मी या पत्रासोबत पाठवत आहे.

कृपया आपण मी दिलेल्या यादीतील सर्व वस्तू त्वरित पाठवण्याची व्यवस्था करावी. कारण शाळेमध्ये या वस्तूंचा तुटवडा असल्याने या वस्तूंसाठी विद्यार्थ्यांची खूप मागणी आहे, तेव्हा विलंब करू नये.

वस्तूंची यादी :

अ.क्र. वस्तूंची नावे.

  1. दोनशे पानी एक रेगी वह्या – 12 डझन
  2. 100 पानी एक रिगी वह्या – 12 डझन
  3. बॉल पेन – सहा डझन
  4. पेन्सिल- 6 डझन
  5. खोडरबर- 6 डझन
  6. चित्रकला वही – 6 डझन
  7. इयत्ता दहावीच्या प्रयोग वह्या- 4 डझन

आम्ही आपल्या शालेय स्टेशनरी मार्ट मध्ये दरवर्षी शालेय साहित्याची खरेदी करत असतो त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्हाला काही टक्के सवलत द्यावी. आणि कृपया बिल सोबत पाठवावे जेणेकरून आम्ही पेमेंट लवकर करू हीच विनंती.

धन्यवाद!!!!

आपला विश्वासू,

सुरज पाटील.

विद्यार्थी प्रतिनिधी मागणी


पत्र लेखन नमुना – 2

ग्रंथालयासाठी विविध पुस्तकांची मागणी करणारे पत्र…

दिनकर देशमुख,

साने गुरुजी ग्रंथालय ,प्रतिनिधी,

मुंबई – 400 070

दिनांक – 20/2/2022

प्रति,

माननीय , संचालक

आदर्श पुस्तक मार्ट, मुंबई

विषय – ग्रंथालयासाठी विविध पुस्तकांची मागणी करण्याबाबत…..

सर्व प्रथम नमस्कार!!! मी दिनकर देशमुख साने गुरुजी ग्रंथालयाचा प्रतिनिधी आहे दरवर्षी आमच्या ग्रंथालयासाठी तुमच्या शालेय आदर्श पुस्तक मार्ट मधून वेगवेगळ्या पुस्तकांची मागणी करत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या ग्रंथालयाला काही पुस्तकांची आवशक्यता आहे.

त्यामुळे माझी आपणास विनंती आहे की दरवर्षी प्रमाणे आपण योग्य दरामध्ये मला माझ्या ग्रंथालयासाठी पुस्तके पुरवावीत. मला ज्या पुस्तकाची अवशक्यता आहे त्या पुस्तकांची यादी मी या पत्रासोबत पाठवत आहे.

कृपया आपण मी दिलेल्या यादीतील सर्व पुस्तके त्वरित पाठवण्याची व्यवस्था करावी.

पुस्तकांची यादी :

अ.क्र. पुस्तकांची नावे.

  1. साने गुरुजींचे व्यक्तिमत्व
  2. स्वतंत्र भारताचा इतिहास
  3. गांधीजींचे चरित्र
  4. गीतारहस्य ग्रंथ
  5. मराठी बोधकथांचा संग्रह
  6. मराठी विनोदांचा संग्रह

मी आपला नियमित चा ग्राहक असून आपण मला काही प्रमाणात सूट द्यावी. आणि कृपया बिल सोबत पाठवावे जेणेकरून आम्ही पेमेंट लवकर करू हीच विनंती.

धन्यवाद!!!!

आपला विश्वासू,

दिनकर देशमुख,

आदर्श ग्रंथालय प्रतिनिधी


मागणी पत्र लेखन नमुना – 3

शालेय क्रीडा स्पर्धा साठी क्रिकेटच्या सामानाची मागणी करणारे पत्र.

सुनील मोहनराव गांधी,

विद्यार्थी प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले विद्यालय, नाशिक

दिनांक- 20/2/2022

प्रति,

माननीय संचालक,

सुदर्शन क्रीडा सामान मार्ट, नवी दिल्ली

विषय – शालेय क्रीडा स्पर्धा साठी क्रिकेटच्या सामानाची मागणी करण्याबाबत…..

सर्व प्रथम नमस्कार!!! मी सावित्रीबाई फुले विद्यालय नाशिक या शाळेमधील इयत्ता दहावीचा वर्ग प्रतिनिधी असून पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहे. यामध्ये क्रिकेट या खेळाचा देखील समावेश करण्यात आला आहे परंतु आमच्या शाळेमध्ये क्रिकेट खेळासाठी अवशक्यता असणारे सामान उपलब्ध नसल्याने सर्व शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या या सहमतीनुसार मी आपणास क्रिकेटच्या सामानाची मागणी करण्यासाठी पत्र लिहीत आहे.

कृपया आपण लवकरात लवकर क्रिकेटचे सामान पाठवून द्यावे ही विनंती!!!

सोबत आपल्या क्रीडा सामान मार्ट मध्ये योग्य दरामध्ये सामानाची विक्री केली जात असल्याने आम्ही आपल्या दुकानातून सामान खरेदी करत आहोत त्यामुळे आपण आम्हाला योग्य दरामध्ये सामान द्यावे ही विनंती!!!

आम्हाला सोबत आपण आपले बिल पाठवावेत जेणेकरून लवकरात लवकर पेमेंट करता येईल..

तसेच मिया पत्रासोबत आम्हाला आवश्यक आसणार्या क्रिकेटच्या सामानाची यादी देखील पाठवत आहे त्यानुसार आपण आम्हाला सामान पाठवावे.

क्रिकेट च्या सामानाची यादी :

अनुक्रमणिका. क्रिकेटचे सामान :

  1. बॅट-6
  2. बाॅल- 12
  3. स्टंप- 2
  4. ग्लब्ज – 14 जोडी
  5. हेल्मेट- 24
  6. लेग पॅड – 24 जोडी
  7. शूज – 24 जोडी

कृपया वरील सामान आपण लवकरात लवकर पाठवून द्यावे हीच विनंती!!! आपला विश्वासू, सुनील गांधी, विद्यार्थी प्रतिनिधी,

सावित्रीबाई फुले विद्यालय,

नाशिक


मागणी पत्र लेखन – 4

वृक्षारोपण यासाठी वेगवेगळ्या झाडाची मागणी करणारे पत्र.

सविता श्याम देशपांडे,

बजाज फायनान्स ट्रस्ट,

प्रतिनिधी, जळगाव

दिनांक- 20/2/2022

प्रति,

निसर्ग उद्यान ट्रस्ट,

आर. के. रोड, जळगाव

विषय – वृक्षारोपण साठी झाडांची मागणी करण्याबाबत….

सर्वप्रथम नमस्कार मी सविता देशपांडे बजाज फायनान्स ट्रस्ट यांच्या कडून आपणास पत्र लिहिते की, येणाऱ्या पर्यावरण आदिवशी आमचा ट्रस्ट तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने आम्हाला आपल्या निसर्ग उद्याना कडून काही झाडांची आवशक्यता आहे.

आपणास ही विनंती आहे की आपण आमच्या ट्रस्टला योग्य दरामध्ये झाडे उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून वृक्षारोपण हा कार्यक्रम योग्यरीत्या पार पडेल.

आम्हाला फुलांची फळांची आणि इतर झाडे मिळून एकूण साठ झाडांची आवशक्यता आहे तर आपण लवकरात लवकर झाडे आमच्या ट्रस्ट ला पाठवून द्यावी हीच विनंती!!!

आपली विश्वासू,

सविता देशपांडे,

बजाज फायनान्स ट्रस्ट प्रतिनिधी

मागणी पत्र लेखन मराठी । Magni Patra Lekhan in Marathi हे माहिती कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *