गणेश उत्सव मराठी निबंध । Ganesh Utsav Nibandh in Marathi

मित्रांनो आपण सर्वाना माहितीच आहे की आपल्या भारत देशाची संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी विविध सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. परंतु या सर्व सण आणि उत्साह मध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडतीचा उत्सव म्हणजे “गणेशोत्सव” होय.

गणेश उत्सव मराठी निबंध । Ganesh Utsav Nibandh in Marathi

गणेश उत्सव जाला “गणेश चतुर्थी” या नावाने देखील ओळखले जाते. मित्रांनो सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पाला हे मुख्य आणि प्रमुख स्थान दिले आहेत कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम गणपती बाप्पाची आराधना आणि पूजा केली जाते. दरवर्षी गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी गणेशोत्सव हा दहा दिवसांचा उत्सव खूप थाटामाटात मध्ये साजरा केला जातो.

आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा उत्सव म्हणजे “गणेशोत्सव मराठी निबंध” घेऊन आलोत.

हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू संस्कृती मध्ये गणपतिदेवाला प्रथम स्थान दिले जाते. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पाची पूजा केली जाते.

गणेश उत्सव केव्हा साजरा केला जातो?

श्री गणेशा चतुर्थी म्हणजेच गणेशोत्सव हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी ला साजरा केला जातो. गणेशोत्सव हा साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये साजरा केला जाणारा एक धार्मिक व्रत आहे.

गणेश उत्सव हा प्रामुख्याने दहा दिवसाचा संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. देशभरातील घराघरांमध्ये गणपतीची मूर्ती स्थापन केली जाते व दहा दिवस या मूर्तीची आरती, पूजा आणि अर्चना केली जाते. हे दहा दिवस गणपती बाप्पा जुना व आपल्या घरातील एक सदस्य प्रमाणेच विराजमान झालेले असतात.

गणेशोत्सव साजरा करण्यामागील पौराणिक कथा :

गणपती बाप्पा आहे माता पार्वती आणि भगवान शिव शंकर यांचे पुत्र. जेव्हा माता पार्वतीने गणपतीला बनवले आणि एके दिवशी पार्वती स्नान करायला गेले तेव्हा त्यांनी आपल्या रक्षणासाठी गणपतीला बाहेर पहारा देण्यास उभा केले. त्याच वेळी भगवान शिव शंकर माता पार्वती ला भेटायला आले असल्याने गणेश नी शंकराला दारामध्येच थांबवले.

तेव्हा देव शंकर अधिक क्रोधामध्ये येऊन त्यांनी गणेश चे तोंड धडापासून वेगळे केले. आणि देव देवी त्यांच्या साक्षी मध्ये आणि आज्ञेवरून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड लावून पुन्हा जिवंत करण्यात आले. त्यावेळी गणपतीला पुन्हा जिवंत पाहून सर्व देवी देवी काढली गणपतीला प्रथम स्थान देण्यात आले त्यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो.

अशाप्रकारे गणेशोत्सव हा सण साजरा केला जाऊ लागला. म्हणून आज देखील आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणि अकरा दिवस गणपती बाप्पा ची पूजा आरती करतो.

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात :

मित्रांनो तुम्ही पाहिलेच असेल की, गणपती उत्सवाच्या वेळी सार्वजनिक गणपती ची मूर्ती स्थापन करून विविध मंडळा दहा दिवस गणपती बाप्पाची आरती, पूजा करतात.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती उत्सव साजरा केला जातो. साधारणता दहा ते बारा दिवसाचा हा सण मोठ्या थाटामाटाने आणि आनंदाने साजरा केला जातो. भारतात गणेशोत्सवाच्या वेळी जागोजागी सार्वजनिक गणपतीची मूर्ती स्थापन गणेश उत्सव साजरा केला जातो.

सर्वप्रथम सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात ही लोकमान्य टिळक यांनी सन 1894 मध्ये केली होती. सर्व भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली. गणेश उत्सव या उत्सवा मधून टिळक आणि युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला होता.

गणेश उत्सव कसा साजरा करतात :

” गणपती बाप्पा मोरया ।

मंगलमूर्ती मोरया ।। “

या उच्चाराने संपूर्ण भारत देशामध्ये एखाद्या कार्याची सुरुवात केली जाते. त्यामुळे गणपतीला आदिदेव आणि विद्येची देवता या दोन्ही नावाने ओळखले जाते. भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सर्व सणात पैकी गणेशोत्सव हा एक प्रमुख सण आहे. साधारणता दहा दिवसांचा हा गणेश उत्सव असतो.

गणेश चतुर्थीच्या म्हणजेच या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होणार असतात त्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यात येते. ढोल-ताशांच्या आवाजामध्ये आणि पावसाच्या सरी मध्ये गणपती बाप्पाचे आगमन होते. त्यानंतर सर्वत्र गणपती बाप्पा च्या मुर्त्या स्थापन केल्या जातात. सुरुवातीच्या दिवशी गणपती बाप्पाला गोड आशा मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो व आरती केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळेला गणपती बाप्पाची आरती करण्यात येते.

गणपती बाप्पा येणार म्हटले की सर्वत्र रोशनाई आणि विविध संदेश देणारे डेकोरेशन केले जाते. त्यानंतर दोन दिवस गणपतीची पूजा केली जाते व तिसऱ्या दिवशी गौरी आवाहन असते.

या दिवशी घरोघरी गौरी म्हणजेच लक्ष्मी तुमचे आगमन होते. गणेश उत्सवाच्या चौथ्या दिवशी गौरी पूजन असते. या दिवशी सर्वांच्या घरोघरी गौरी उभारण्यात येतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. गौरी पूजनाच्या दिवशी सर्वत्र वेगवेगळी सजावट केलेली पाहायला मिळते.

गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी गौरी विसर्जन असते. या दिवशी सर्व बायका एकमेकांच्या घरी जाऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात, व संध्याकाळच्या वेळी गौरी विसर्जन होते.

गणेशोत्सवाचा हा सर्व ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

साधारणतः नऊ किंवा दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर दहाव्या किंवा अकराव्या दिवशी गणपती विसर्जनाचा उत्साह असतो. ज्याप्रमाणे अगदी धूम धाम आणि ढोल ताशा च्या आवाजामध्ये गणपती बाप्पा चे आगमन होते त्याचप्रमाणे ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाचे विसर्जन देखील होते. काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या वेळी शहरांमधील सर्व गणपतीची मिरवणूक निघते त्या गणपती समोर विविध नाटक, नृत्य आणि लेझिम यांसारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

” गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असे म्हणता सर्वजण गणपती बाप्पा चे शेवटचे दर्शन घेतात व गणपती बाप्पाचे विसर्जन करतात.

अशा प्रकारे दर वर्षी आपल्या भारत देशामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो.

हे ” गणेश उत्सव मराठी निबंध । Ganesh Utsav Nibandh in Marathi “निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *