छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या माती मध्ये जन्मलेले एक शूरवीर आणि महान पुरुष होते. स्वतंत्र सम्राटाचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक म्हणजेच “शिवाजी महाराज” होय.

छत्रपती शिवाजी महाराज हे थोर कर्तुत्वान पुरुष होते, त्यांनी अतिशय खडतर परिस्थिती मधून केलेली स्वराज्य निर्मिती हे सर्व जनतेसाठी प्रेरणादायी आहे.

आदर्शवत स्वराज्य कारभार करण्यात यशस्वी ठरलेले पहिले छत्रपति महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज होते.

अशा या शूर वीर आणि पराक्रम व जन्मताच स्वराज्य निर्मिती ची शपथ घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी जुन्नर तालुक्यात बसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. अशा या शूरवीर बालकाला जन्म देणाऱ्या माऊली चे नाव राजमाता जिजाऊ भोसले आणि शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते.

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

शहाजी राजे हे त्याकाळचे सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्या संस्कारा खाली गेले. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना राज्यव्यवस्था, युद्धकला, नीतिमत्ता, गनिमी कावा, आणि घोडेस्वार ची विद्या शिकवण्यात आली.

या व्यतिरिक्त शिवाजी महाराज हे त्यांच्या वयाच्या मावळ्यांसोबत खेळ म्हणून मावळे हेच शिवरायांचे पहिले सवंगडी आणि सोबती होते.

राजमाता जिजाऊ यांनीदेखील शिवरायांना लहान वयामध्ये चांगल्या गोष्टी शिकवण्याची भर घातली. जिजाऊंनी शिवरायांना रामायण-महाभारत तसेच इतर महान पुरुषांच्या कथा सांगायच्या त्यामुळे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मनावर दृढ परिणाम झाला.

लहानपणीच प्रजादक्ष आणि पराक्रम हे गुण शिवाजी महाराज यांच्या अंगी रुजले. माता जिजाऊ प्रमाणेच शहाजीराजे देखील वेळ मिळेल तेव्हा लहान शिवरायांना युद्धकला, घोडेबाजीचे आणि वाचन करायला शिकवीत. अशाप्रकारे आई-वडिलांच्या छत्रछायेखालीच भविष्याचा एक महान पुरुषा आणि स्वराज्य निर्मितीची इच्छा बाळगणारे छत्रपती शिवाजी महाराज मोठे होत होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे लग्न आहे लहान वयामध्ये झाले होते. जिजाऊंनी फलटणच्या नाईक निंबाळकर या घराण्यातील मुलगी सईबाई हिला भोसले घराण्याची सून आणि शिवरायांची पत्नी म्हणून पसंत केले. शिवराय जसे जसे मोठे होऊ लागले त्यांना परकीय सत्तांचा आपल्या जनतेवर, रयतेवर होणाऱ्या छळा चा अनुभव होऊ लागला. आपली जनता किती संकटातून जात आहे, जनतेवर किती छळ होत आहे याची कल्पना शिवरायांना झाली. व शिवरायांनी रायरेश्वरावर च्या मंदिरात स्वराज्य निर्मिती ची प्रतिज्ञा घेतली.

आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य यांच्या विरोधामध्ये महाराजांना लढावे लागणार होते याची सुरुवात त्यांनी तोरणा किल्ला जिंकून केली. अत्यंत लहान वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला व त्याचे नाव तोरणा असे ठेवले.

तोरणा किल्ला जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली होती.

त्यानंतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अतिशय धैर्याने तोंड देऊन शिवाजी महाराज यशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य आणि पराक्रम

” अफजलखानाचा वध” ” शाहिस्तेखानाची बोटे कापणे” या प्रसंगांमधून हा दिसून येतो.

शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आणि धाडसी वृत्तीने स्वकीय शत्रूंचा देखिला धडा शिकविला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीमध्ये झालेली औरंगजेबाची भेट आणि सुटका अशा बिकट परिस्थितीला देखील शिवाजी महाराजांनी संयमाने आणि धैर्याने तोंड दिले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मीतीच्या लढाईमध्ये त्यांच्यासोबत होते ते म्हणजे मावळे आणि योग्य साथीदार यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. प्रत्येक प्रसंगांमध्ये मावळे जिकरीने शिवाजी महाराजा यांच्या सोबतीला आले. शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण सुद्धा गमाविले.

तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारजी ते शूर वीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धरणी तीर्थ झाले.

इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला.

त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक राजा मिळाला. त्यानंतर महाराजांनी स्वराज्याचा कारभार सुरळीत आणि सुव्यवस्थित चालावा यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन चालू केले. तसेच आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड- किल्ले सुरक्षा अशा विविध पर्यावरणीय मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी राबवल्या.

शिवाजी राजे असताना त्यांच्या पाठीमागे स्वराज्य सांभाळण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश सुद्धा आले. स्वराज्याच्या शाखा संपूर्ण दक्षिण भारतात पसरवण्यात छत्रपती शिवाजीराजे सफल झाले होते. त्यामुळे परकीय सत्तांनी सुद्धा शिवरायांचे स्वराज्य अस्तित्व मान्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि गाथा सर्वत्र नावाजली जात होती.

अखेर 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर अशा या वीर पराक्रमी युगपुरुषाची प्राणज्योत मावळली.

असा हा प्रजादक्ष राजा, राष्ट्रपुरुष शिवाजी महाराज स्वतःच्या पराक्रमाने आणि कर्तुत्वाने ” छत्रपती” म्हणून अनंत काळासाठी आपले नाव इतिहासाच्या पानावर छापून प्रत्येक मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या माती मध्ये अजरामर झालेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी । Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi  हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…

हे पण अवश्य वाचा =

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *