लेक वाचवा लेक शिकवा निबंध मराठी । Lek Vachava Lek Shikva Marathi Nibandh
मित्रांनो, आज आपल्या सभोवताली मानवाचे अस्तित्व झाले आहे ते केवळ स्त्री आणि पुरुष या दोघांच्या मुळेच!!
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवीचे स्थान आहे. स्त्रीचे महत्व है अपार आहे ते शब्दात सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतील. सावित्रीबाई फुले, झाशी की राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ यांसारख्या महान स्त्रियांचे आपल्या देशासाठी दिलेले योगदान तर सर्वांनाच माहिती आहे.
त्यामुळे एखाद्या स्त्रीने जग पलटून टाकण्याचा निर्णय घेतला तर ती तसेच साध्य देखील करू शकते.
परंतु आपल्या देशावर झालेल्या विदेशी देशाच्या आक्रमणामुळे विदेशी लोकांनी आपल्या देशातील स्त्रियांचा अपमान केला त्यांचा छळ केला त्यांना शारीरिक मानसिक त्रास दिला. आपल्या देशातील स्त्रियांना “अबला नारी” ही सज्ञा देखील देण्यात आली. आणि तेव्हापासूनच आपल्या देशातील स्त्रियांचा दर्जा खालावला. विदेशी लोकांकडून तर भारतीय स्त्रियांवर अत्याचार होतच होता त्या सोबतच भारतातील पुरुष देखील आपापल्या स्त्रीयांवर अत्याचार करू लागले.
त्यामुळे आज देखील आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांना कमी लेखले जाते व त्यांच्यावर अत्याचार केला जातो एवढेच नसून जुन्या रुढी परंपरा पाळणारे लोक तर आजच्या काळामध्ये मुलींना जन्म द्यायला देखील नाकार देतात, त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले आहे.
तसेच काही घरांमध्ये मुली जन्माला आल्या तर त्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले जाते.
म्हणून आज आपल्या देशामध्ये “लेक वाचवा, लेक शिकवा” ही मोहीम राबवण्याची वेळ आली आहे. व समाजातील प्रत्येक व्यक्तीचा स्त्रियांकडे पाहणारा दृष्टिकोन बदलण्याची देखील गरज भासली आहे.
लेक वाचवा लेक शिकवा निबंध मराठी । Lek Vachava Lek Shikva Marathi Nibandh
आपल्या भारतीय धार्मिक ग्रंथात लिहिले आहे की, “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तंत्रज्ञ देवता”
म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान सन्मान केला जातो त्या ठिकाणी परमेश्वराचा वास असतो. परंतु आज आपल्या समाजामध्ये या संकल्पना केवळ पुस्तक यापुरताच मर्यादित राहिल्या आहेत वास्तविक जीवनामध्ये याचा कोणीही आदर करतो नाही.
वर्तमान काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे परंतु नदीच्या बाबतीमध्ये हा विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप मागे राहिला आहे. जन्म-मृत्यूचा अधिकार हा केवळ परमेश्वराच्या हातात आहे.परंतु आजच्या काळातील मानव स्वतःलाच परमेश्वर समजून मुलींच्या जगण्याचा हक्क हिसकावून घेत आहे. मुली गर्भात असतानाच त्यांना मारले जात आहे म्हणजेच स्त्री भ्रूणहत्या केली जात आहे. एवढे मोठे पाप करण्याची ताकद आजच्या मनुष्याला कसं काय होत असेल???
आहोहो!! ही मुलगी आहे म्हणून आपण आज सर्व जण आहोत हा विचार कोणी केलाच नाही केवळ मुलगी म्हणजे ओझं समजले जाते.
त्यामुळे आजच्या काळामध्ये लेक वाचावा लेक शिकवा ही मोहीम राबवण्याची गरज भासली आहे.
स्त्रियांना समाजामध्ये तुच्छ लेखनामागे विविध कारणे आहेत जसे की,
- स्त्रियांबद्दल लोकांचे विचार –
आज स्त्रीला खूप तुच्छ समजले जाते काहीजण तर तिला “पायातला वाहना” प्रमाणे वागणूक देतात.
तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार, ” मुलगा हा वंशाचा दिवा असतो, तो आपला वंश पुढे घेऊन जातो आणि मुलगी म्हणजे दुसऱ्या घरात जाणारी असते ती परक्याचे धन असते” असा समज आहे.
आजच्या पिढीला आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे पण लेक नको!!
त्यामुळे काही लोक मुलींना गर्भात असतानाच मारतात. तर काही लोकांचे विचार करण्याची धारणा वेगळीच असते त्यांच्या मते मुलगी म्हणजे मोठे संकट थोडक्यात त्रास होय.
तर काही लोकं समाजातील गरीबीमुळे मुलींची हत्या करतात. आपल्या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, बालविवाह यांसारख्या प्रथा आजही रुजलेल्या आहेत व आपल्या समाजातील बरेचसे लोक आजही या रूढी-परंपरांच्या वाटेवर चालतात.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे झाली तरी देखील आपल्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदभाव पहायला मिळतो. लोकांच्या याच विचार धारणेमुळे आज आपल्या देशामध्ये “लेक वाचवा” लेक शिकवा” (Lek Vachava Lek Shikva Marathi Nibandh ) ही मोहीम राबवण्याची गरज भासली आहे.
मुलगीही साड्या संसाराचे गाडे ओढताना मुलगी शिकली तर संपूर्ण समाज परिवर्तन होण्यास काहीही वेळ लागणार नाही. परंतु या गोष्टीचा विचार कोणीही करत नाही त्यामुळे समाजामध्ये मुलींना कमी दर्जा मिळतो.
- स्त्री पुरुष तुलना –
स्त्रियांना कमी दर्जा देण्यामागे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे समाजाकडून केली जाणारी स्त्री पुरुष तुलना होय. आज आपल्या समाजामध्ये स्त्री-पुरुष तुलना आणि भेदभाव वाढला आहे. पुरुषांना श्रेष्ठ स्थान देऊनच स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्यामुळे गर्भपात करून काही भागांमध्ये स्त्रियांची संख्या कमी केली जात आहे. 1991साली झालेल्या जनगणनेनुसार आपल्या देशामध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या खूपच कमी होती. त्यानंतर 2001 चाली झालेल्या राष्ट्रीय जनगणनेनुसार महिलांच्या संख्या मध्ये झालेली घट पाहण्यात आली. 1991 ते 2001 या दहा वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर 2011 च्या जनगणने आपल्या देशातील प्रत्येकी एक हजार पुरुषांच्या मागे 918 महिला असल्याचे आढळले.
त्यामुळे महिलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला समाजातील स्त्री पुरुष तुलना आणि भेदभाव पूर्णता नष्ट करायला हवा.
लेक वाचवा लेक शिकवा याचा मुख्य उद्देश :
स्त्रियांची वाढती हत्या आणि समाजामध्ये स्त्रियांच्या शिक्षणासाठी असलेल्या दुबळेपणा याचा विचार करून “लेक वाचवा, लेक शिकवा” ( Lek Vachava Lek Shikva Marathi Nibandh ) ही मोहीम संपूर्ण देशभरामध्ये राबवण्यात आली.
आपल्या समाजातील “लेक वाचवा, लेक शिकवा” ही लाजिरवाणी समस्या दूर करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी ” लेक वाचवा लेक शिकवा” अभियानाला सुरुवात केली.
स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण कमी करून समाजामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी व प्रत्येक मुलीला लिहिण्या वाचण्याचा अधिकार देण्यासाठी ” लेक वाचवा, लेक शिकवा” हे अभियान सुरू करण्यात आले.
लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाची आवशक्यता पडण्या मागचे कारण :
आपला भारत देश हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. तसेच आपल्या भारत देशामध्ये सर्वत्र पुरुषांचे वर्चस्व पाहायला मिळते म्हणजेच भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे.
त्यामुळेच भारत देशातील काही भागांमध्ये आज देखील स्त्री-पुरुष असा भेदभाव पाहायला मिळतो. स्त्रियांना दुय्यम स्थान देऊन पुरुषांना उच्च स्थान आहे. पूर्वीच्या काळामध्ये तर मुलींना शिक्षणाची देखील परवानगी नव्हती. मुलगी म्हणजे फक्त घर सांभाळण्यासाठी ओळखली जात होती. ” चूल आणि मूल” एवढ्यात तिचे अस्तित्व असायचे. म्हणून आपल्या देशातील बहुतांशी स्त्रिया या अशिक्षित राहायच्या.
त्यामुळे वर्तमान काळात देखील आपल्या देशातील स्त्रियांवर हा अत्याचार होऊ नये समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षणाचा हक्क मिळाला म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” लेक वाचवा, लेक शिकवा” या अभियानाची सुरुवात केली.
देशातील प्रत्येक मुलीला शिक्षण प्राप्त करून दिले. आणि आपल्या देशातील मुलींनी देखील सिद्ध करून दाखवले कि मुलगीदेखील मुलाप्रमाणे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावू शकते. म्हणूनच आज स्त्री प्रत्येक क्षेत्रांमध्ये मुलांच्या बरोबरीने काम करताना दिसत आहे. मुलगी ही चार भिंती मध्ये न राहता बाहेर घराच्या बाहेर पडून प्रत्येक क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी करत आहे.
मुलगी ही मुलापेक्षा अधिक प्रेमळ, आज्ञाकारक आणि कमी हिंसक असते. एक मुलगी ही तिच्या आयुष्यामध्ये केवळ मुलगी न राहता आई, बहिण, पत्नी, लेक आणि मैत्री अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बजावत असते.
आज शिक्षणामुळे मुलींमध्ये अनेक बदल घडून आला आहे आणि समाजातील जुन्या रूढी – परंपरा जसे की, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह आणि हुंडाबळी यांसारख्या कनिष्ठ प्रथांना देखील आळा बसला आहे.
मुलीं बाबत सरकारची महत्त्वाची धोरणे :
“लेक वाचवा, लेक शिकवा” ( Lek Vachava Lek Shikva Marathi Nibandh ) या अभियानाची सुरुवात करून समाजामध्ये मुलींना मुलांप्रमाणे शिकण्याची संधी प्राप्त करून आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रचार करून देणे हे “लेक वाचवा, लेक शिकवा” या अभियानाचे मुख्य धोरण होतो.
मुलीचा जन्म दर्जा जिल्ह्यामध्ये कमी आढळतो त्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात आले. प्रत्येक मुलीला प्राथमिक शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
तसेच मुलींच्या बाबतीत अमलात आणलेल्या सर्व धोरणाच्या आणि योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते का नाही याकडे विशेष लक्ष देणे.
निष्कर्ष ( Mulgi Vachava Mulgi Shikwa Marathi Nibandh )
आपल्या भारत देशात असलेल्या स्त्रियांचे हत्या करणाऱ्या राक्षस अन्वर आळा बसवण्यासाठी आणि प्रत्येक स्त्रीला शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी लेक वाचवा लेक शिकवा या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
देशातील प्रत्येक नागरिकाने मुलगी वाचवण्यासाठी आणि मुलींचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच समाजातील काही कनिष्ठ करता जसे की हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, बाल विवाह या सर्व प्रथांचा विनाश केला पाहिजे.
“लेक वाचवा, लेक शिकवा” ( Lek Vachava Lek Shikva Marathi Nibandh ) हे भारत सरकारने उचललेले एक महत्वाचे आणि योग्य पाऊल आहे. त्यामुळे आपण सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे की आपण समाजातील प्रत्येक मुलींना शिक्षणाचा हक्क देऊन भारत सरकारला मदत करावी.
तर मित्रांनो, ” लेक वाचवा लेक शिकवा निबंध मराठी । Lek Vachava Lek Shikva Marathi Nibandh “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
Read More :
- गणेश उत्सव मराठी निबंध । Ganesh Utsav Nibandh in Marathi
- मराठीमध्ये कोरड्या (सुका मेवा) फळांची नावे। Dry Fruits Names in Marathi and English
- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध । Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi
- केसर खाण्याचे फायदे आणि संपूर्ण माहिती । Kesar Benefits in Marathi
- बोटांची नावे मराठी आणि इंग्रजीमध्ये । Finger Names in Marathi
धन्यवाद!!!